Messi आणि Ronaldo सुद्धा असा गोल करू शकत नाही! होय! व्हिडीओ बघून तुम्हीही हेच म्हणाल
खेळ कोणताही असो, त्या खेळाची मजा तेव्हाच येते जेव्हा तो पाहण्यासाठी चाहता स्टेडियममध्ये पोहोचतो
आजकाल क्रीडाविश्वात सगळीकडे फिफा वर्ल्डकपची चर्चा रंगतेय. कतारकडूनही अनेक मजेदार व्हिडिओ येत आहेत. यात फक्त खेळाडूच नाही तर प्रेक्षकांचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. जे पाहिल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतोय. मात्र, हा व्हिडिओ बराच जुना आहे. ज्यामध्ये ती व्यक्ती कागदी विमान बनवून उडवताना दिसत आहे. लोक ते पाहत आहेत आणि त्या व्यक्तीला चिअर अप करतायत.
खेळ कोणताही असो, त्या खेळाची मजा तेव्हाच येते जेव्हा तो पाहण्यासाठी चाहता स्टेडियममध्ये पोहोचतो आणि आपल्या खेळाडूला आणि संघाला पाठिंबा देतो कारण एक गोष्ट स्पष्ट होते की स्टेडियममध्ये फुटबॉलचा सामना पाहण्याची जी मजा आहे ती टीव्हीवर पाहण्यात येत नाही.
अशाच एका व्यक्तीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. जिथे एक मुलगा प्रेक्षक गॅलरीत बसलाय आणि त्याने कागदी विमान उडवून गोल केलाय. हा व्हिडीओ खूप मजेदार आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एखादा माणूस प्रेक्षक गॅलरीत बसून कागदापासून विमान बनवतो आणि मग कॅमेऱ्यात हसत हसत मैदानाच्या दिशेने फेकतो, हे पाहून त्याचे साथीदार आधी हसतात, पण हेच किरकोळ विमान जेव्हा खेळणाऱ्या खेळाडूंवर घिरट्या घालत गोल पोस्टकडे वळते तेव्हा ते सगळे चकित होतात आणि मग काय आश्चर्य ते कागदी विमान चक्क गोल करतं. ते साधारण कागदी विमान नेटमध्ये शिरताच तिथे बसलेले लोक चिअर करू लागतात जणू काय एखादी मॅच जिंकलीये.
हा व्हिडिओ @DrJoyeeta नावाच्या अकाऊंटने ट्विटरवर शेअर केला आहे. २४ हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिलाय. १२०० हून अधिक लोकांनी व्हिडीओ पसंत केलाय.
Best Goal ever !! pic.twitter.com/MAerdtiL9O
— Joey (@DrJoyeeta) November 24, 2022
एका युझरने या व्हिडिओवर कमेंट करत लिहिले की, “व्वा! काय लक्ष्य आहे भाऊ. त्याचबरोबर आणखी एका युझरने या व्हिडिओवर कमेंट करत लिहिले की, ‘मेस्सी आणि रोनाल्डो असा गोल करू शकत नाहीत.’