हा पहा हा स्टंट! एवढंच बाकी होतं…
एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात दोन तरुण ट्रेनच्यावर उभे राहून स्टंट करत आहेत. हायटेन्शन लाईन रेल्वेवरून जात आहे. परंतु, तरुण आपला जीव धोक्यात घालून स्टंट बाजी करत आहेत.
नवी दिल्ली: आतापर्यंत तुम्ही कार आणि बाइकवरून स्टंट करतानाचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. पण ग्रेटर नोएडामधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात दोन तरुण ट्रेनच्यावर उभे राहून स्टंट करत आहेत. हायटेन्शन लाईन रेल्वेवरून जात आहे. परंतु, तरुण आपला जीव धोक्यात घालून स्टंट बाजी करत आहेत.
सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी, त्यांच्या व्हिडिओंवर लाइक्स आणि फॉलोअर्स वाढवण्यासाठी तरुणाई सतत वेगवेगळे डावपेच अवलंबते. असाच एक व्हिडिओ ग्रेटर नोएडामध्ये व्हायरल होत आहे. जारचा पोलिस स्टेशन परिसरातील एनटीपीसी प्लांटजवळचा हा व्हिडिओ असल्याचं सांगितला जात आहे.
काय आहे या व्हिडिओत
व्हिडिओमध्ये एक मालगाडी कालव्यावरून जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे. एका मालगाडीच्या डब्यावर दोन तरुण उभे असून, त्यांच्यावरून हायटेन्शन लाईनही जात आहे. पण आपल्या जीवाची चिंता न करता हे लोक स्टंट करण्यात मग्न असतात. तरुण मालगाडीच्या डब्यावर उभा राहून आपली बॉडी दाखवत आहे. हा स्टंट काहीसा फूल और कांटे या चित्रपटात अजय देवगण दोन बाईकवर चढल्यासारखा आहे.
Stupid way to enjoy with peer group.#GreaterNoida #Railwaysafety pic.twitter.com/mlKjRfzHSb
— Arvind Chauhan (@Arv_Ind_Chauhan) June 22, 2023
तरुणानेच हा व्हिडिओ सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून तो NTPC प्लांटजवळचा दिसत आहे. या व्हिडिओची तपासणी केली जात आहे. त्यात दिसणाऱ्या तरुणांची ओळख पटवून त्यांच्यावर योग्य त्या कलमान्वये कारवाई करण्यात येणार आहे.