Video : नाद करा पण ह्यांचा कुठं? बाईंचं थेट वाघासोबत बोटिंग, जंगल सफारीचा हा थरार पाहायलाच हवा!

वाघाला लांबून पाहिलं तरी आपल्या अंगावर काटा येतो. पण ही महिला या वाघाला घेऊन मस्त बोटिंग करताना दिसतेय. या महिलेच्या चेहऱ्यावर वाघसोबत असल्याची तसूभरही भीती दिसत नाही.

Video : नाद करा पण ह्यांचा कुठं? बाईंचं थेट वाघासोबत बोटिंग, जंगल सफारीचा हा थरार पाहायलाच हवा!
Follow us
| Updated on: May 17, 2022 | 1:18 PM

मुंबई : अमुक एका व्यक्तीसोबत आपली मैत्री हवी, अमुक एक प्राणी आपल्या घरात असावा, असं आपल्याला नेहमी वाटतं. जंगलातला सगळ्याच हिंस्र शिकारी वाघ अन् आपली मैत्री असावी असं कुणाला वाटणार नाही? पण वाघाशी दोस्ती करणं दिसतं तेवढं सोपं नाही. वाघ जर चिडला तर त्याच्या इतका आक्रमक केवळ तोच! पण एका तरूणीची सध्या वाघाची (Young girl and tiger viral video) चांगलीच गट्टी जमलीये. त्यांचा मैत्रीची व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच भाव (viral video) खातोय.

व्हायरल व्हीडिओ

सध्या एका महिलेचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. यात ती छोट्या बोटीवर बसून नदीत पॅडल बोट चालवत आहे. हिरव्यागार निसर्गात तिचा असा हा मुक्त संचार पाहताना निसर्ग प्रेमी भारावले आहेत. पण या महिलेसोबत एक विशेष बाब या बोटीत आहे. ती म्हणजे वाघ… वाघाला लांबून पाहिलं तरी आपल्या अंगावर काटा येतो. पण ही महिला या वाघाला घेऊन मस्त बोटिंग करताना दिसतेय. या महिलेच्या चेहऱ्यावर वाघसोबत असल्याची तसूभरही भीती दिसत नाही.

हे सुद्धा वाचा

सोशल मीडियावर लोक या व्हीडिओला खूप जास्त पसंती देताना दिसत आहेत. हा व्हीडिओ इन्स्टाग्रामवर mokshabybee_tigers नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हीडिओ शेअर करताना, ‘Adventure, Bonding, Life of Pi’, असं कॅप्शन देण्यात आलं आहे. यावर अनेकांनी कमेंट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका नेटकऱ्याने लिहिलंय की, ‘हे माझे स्वप्न आहे, मला असंच वाघासोबत मैत्री करायची आहे फिरायला जायचंय.’ तर दुसर्‍याने म्हटलंय की, ‘जबरदस्त व्हीडिओ आहे, दोस्ती असावी तर अशी!’

सध्या असाच एक चित्ता आणि तरूणीची मैत्री दाखवणारा व्हीडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. यात एक तरूणी चक्क एका चित्त्याला किस करताना दिसत आहे. याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होतोय. या व्हीडिओत तरूणी आणि चित्ता अगदी जवळजवळ आहेत. त्यानंतर ही तरूणी त्याला किस करते. मग हा चित्ताही तिला प्रतिसाद देतो तोही तिच्या गालावर किस करताना पाहायला मिळत आहे. हा व्हीडिओ इन्स्टाग्रामवर WORLD GEO SAFARIS या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. याला आतापर्यंत 50 हजारांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.