Viral : कारंज्याच्या रेलिंगवर सायकलिंग स्टंट करताना समोर आली मुलगी आणि…
जगभरात सायकलिंग (Cycling)स्टंटचा ट्रेंड खूप वाढलाय. विशेषत: तरुणांमध्ये त्याची क्रेझ जरा जास्तच पाहायला मिळते.स्टंटचे व्हिडिओही अनेकदा सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल होत असतात. एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल (Viral) होतोय.
स्टंट (Stunt) हा काही लहान मुलांचा खेळ नाही. कुठलाही स्टंट करायला खूप सराव करावा लागतो, मग त्यात कुठेतरी परफेक्शन येतं. थोडीशी चूक झाली तर तो स्टंट फसणार हे नक्की आणि त्याचवेळी दुखापतही होते. सध्या जगभरात सायकलिंग (Cycling)स्टंटचा ट्रेंड खूप वाढलाय. विशेषत: तरुणांमध्ये त्याची क्रेझ जरा जास्तच पाहायला मिळते.स्टंटचे व्हिडिओही अनेकदा सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल होत असतात. त्यातील काही अगदी परफेक्ट असतात आणि काही स्टंट्स फेल होतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल (Viral) होतोय. यात एक मुलगा स्टंट करण्याच्या प्रयत्नात फेल होतो, आणि सायकलवरून थेट मुलीवर पडतो.
कारंज्याच्या रेलिंगवर स्टंट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक तरुण पाण्याच्या कारंज्याच्या रेलिंगवर सायकल चालवतोय. तेवढ्यात एक मुलगी त्याच्या समोर येते आणि शूजची लेस लावण्यासाठी खाली वाकते. यावेळी तरुणाचं लक्ष तिच्यावर जातं. तो त्यावेळी सायकलिंगचा स्टंट करत असतो. मात्र या स्टंटमध्ये तो फसतो आणि थेट सायकलसह तरुणीवर पडतो. कारण मुलीला पाहताच त्याचा तोल जातो.
स्टंटबाजांमुळे अपघात मुलगा ज्या प्रकारे सायकलवरून मुलीच्या अंगावर पडतो, त्यामुळे साहजिकच मुलीला खूप दुखापत झाली असावी आणि मुलगा ज्या प्रकारे पडला त्यामुळे त्याला कमी दुखापत झाली असावी, असं वाटतं. स्टंटबाजांमुळे अपघात होत असले तरी या व्हिडिओत दिसणारा अपघात खूपच वेगळा होता. साहजिकच या स्टंटनंतर एखाद्या मुलीला पाहून मुलाचे लक्ष विचलित होणार नाही.
View this post on Instagram
इन्स्टाग्रामवर शेअर हा मजेशीर व्हिडिओ इन्स्टाग्रामवर mohd_junaid_ch77 या आयडीनं शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत हजारो वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी व्हिडिओला लाइकदेखील केलंय.