मुंबई : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. व्हायरल होणार व्हिडीओ हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. मात्र, अपघाताच्या व्हिडीओंची नेटकरी विशेषत्वाने दखल घेतात. सध्या अशाच प्रकारचा एक गंभीर व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जे घडलंय आहे, ते आश्चर्यकारक आहे. (young Man cross road for save little Girl video goes viral on social media)
रस्त्यावर चालत असताना कधी काय होईल हे सांगता येत नाही. साधेपणाने चालत असताना गंभीर अपघात झाल्याचे आपण अनेकवेळा पाहिले आहे. या व्हिडीओमध्येसुद्धा असंच काहीसं झालं आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी आणि एक मुलगी रस्ता ओलांडण्यासाठी आलेले दिसतायंत. ते रस्त्यावर उभे राहून वाहने संपण्याची वाट पाहात आहेत. वाहने संपल्यांतर ते रस्ता ओलांडणार असल्याचे दिसतेय. मात्र, याच वेळी उभ्या असलेल्या तरुणाच्या समोरून एक छोटी मुलगी रस्ता ओलांडत आहे.
या व्हिडीओमध्ये कोणत्याही वाहनांचा विचार न करता छोटी मुलगी रस्ता ओलांडत असल्याचे दिसतेय. हा सर्व प्रकार छोट्या मुलीच्या समोर उभा असलेल्या तरुणाच्या लक्षात आला आहे. समोरुन छोटी मुलगी येत असल्याचे दिसताच तरुणाने धाडस दावखून मुलीकडे झेप घेतली आहे. छोट्या मुलीकडे वेगाने वाहन येत असल्यामुळे तरुणाने जीवाची पर्वा न करता समोरच्या छोट्या मुलीला उचलले आहे. तरुणाच्या सतर्कतेमुळे व्हिडीओतील छोट्या मुलीचे प्राण वाचले आहेत.
पाहा व्हिडीओ
A little girl. And a stranger with no hesitation whatsoever.
Not all heroes wear capes… pic.twitter.com/EO22qLTfMF
— Rex Chapman?? (@RexChapman) June 4, 2021
हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत निश्चित माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, हा व्हिडीओ ‘Rex Chapman’ या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. अनेकजण या तरुणाची वाहवा करत आहेत. त्याने दाखवलेल्या धाडसामुळे अनेकांनी त्याचे अभिनंदन केले आहे. अनेकांना हा व्हिडीओ आपल्या अकाऊंटवरुन शेअरसुद्धा केलाय.
इतर बातम्या :
Viral Video : पक्ष्याने बांधलं एका पानावर घरटं, व्हिडीओ एकदा पाहाच
Video | जंगल सफारीमध्ये पर्यटक गुंग, अचानक सिंहाने केला हल्ला, पुढं जे झालं ते एकदा पाहाच !
VIDEO : हळद, वरात ते मिरवणुका, या तरुणाच्या डान्सला तोड नाही
(young Man cross road for save little Girl video goes viral on social media)