Video | बॉक्सवाल्या प्रँकची सोशल मीडियावर चर्चा, काय आहे खास ? व्हिडीओ एकदा पाहाच
सोशल मीडियावर रोज अशा प्रकारचे लाखो व्हिडीओ अपलोड केले जातात. सध्या तर एक अतिशय मजेदार असा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील प्रँक पाहून नेटकरी खळखळून हसत आहेत.
मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओंना पाहून आपण पोट धरून हसतो. तर काही व्हिडीओंमधील करामती पाहून आपण थक्क होऊन जातो. सोशल मीडियावर रोज अशा प्रकारचे लाखो व्हिडीओ अपलोड केले जातात. सध्या तर एक अतिशय मजेदार असा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील प्रँक पाहून नेटकरी खळखळून हसत आहेत.
बॉक्सचा प्रँक सोशल मीडियावर व्हायरल
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होता आहे. काही सेकंदाचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंदीस उतरला आहे. सुरुवातीला या व्हिडीओमध्ये एका माणसाच्या हातात काही बॉक्स असून ते एकावर एक ठेवलेले दिसत आहेत. हेच बॉक्स वर उचलून माणूस रस्त्यावर चालताना दिसतोय. हा माणूस नंतर दुसऱ्या लोकांसोबत चांगलाच प्रँक करतोय.
माणसाने नेमके काय केले ?
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये माणूस काही तरुण मुले तसेच मुली आणि महिलांकडे जात आहे. बसलेल्या तसेच चालत असलेल्या माणसांकडे जाताच माणूस हातातील बॉक्स खाली पडत असल्याचे नाटक करतोय. अंगावर बॉक्स पडत असल्याचे पाहून नंतर ही माणसे चांगीलच घाबरत आहेत. एका मुलीचा तर चांगलाच गोंधळ उडाल्याचे दिसतेय. मुलगी बॉक्स अंगावर पडतील या भीतीने थेट रस्त्यावर कोसळली आहे. विशेष म्हणजे रस्त्यावर कोसळल्यानंतर तिच्या हातातील पेयसुद्धा खाली पडले आहे.
पाहा व्हिडीओ :
View this post on Instagram
सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया
हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. काही नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहून मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी व्हिडीओवर आक्षेप नोंदवलाय. काही नेटकऱ्यांनी तर लोकांना असे घाबरवणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. हा व्हिडीओ कुठला आहे, याबद्दल माहिती मिळू शकलेली नाही. मात्र त्याला hepgul5 या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पाहता येईल.
इतर बातम्या :