दुर्मिळ आजारानं पछाडलेल्या 15 वर्षांच्या प्रसिद्ध YouTube स्टारनं घेतला जगाचा निरोप! चाहते हळहळले
YouTube star Adalia Rose : अत्यंत दुर्मिळ अशा आजारानं पछाडलेल्या अदालियानं आपल्या 15 वर्षांच्या आयुष्यात युट्युबवर कमाल कामगिरी केली होती. इंटरनेटच्या दुनियेत अल्पावधित प्रसिद्ध झालेल्या अदालिया रोज हीनं अखेर जगाचा निरोप घेतलाय.
अदालिया रोज. अत्यंत कमी काळात अदालियानं युट्युबवर आपलं एक विश्व उभं केलं होतं. अदालिया रोजला (YouTube star Adalia Rose) एक भयंकर आजार झाला होता. या आजाराचं नाव आहे प्रोजेरीया (Progeria condition). या अत्यंत दुर्मिळ अशा आजारानं पछाडलेल्या अदालियानं आपल्या 15 वर्षांच्या आयुष्यात युट्युबवर कमाल कामगिरी केली होती. इंटरनेटच्या दुनियेत अल्पावधित प्रसिद्ध झालेल्या अदालिया रोज हीनं अखेर जगाचा निरोप घेतलाय. वयाच्या पंधराव्या वर्षी तिचा मृत्यू झाला आहे. तिच्या निधनानं तिचे सोशल मीडियावरील (Social Media) सर्वच चाहत्यांना धक्का बसला हसून तिचं जाण्यानं अनेकांचे डोळे पाणावले आहेत. युट्युबवर वेगवेगळे व्हिडीओ तयार करुन अदालियानं अनेकांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं होतं. अमेरिकेतील टेक्सासमध्ये राहणारी अदालियानं 12 जानेवारीवा अखेरचा श्वास घेतला.
सोशल मीडिया गाजवला पोरीनं
प्रोजेरीया नावाच्या दुर्मिळ आजारानं पछाडलेल्या अदालिया रोज हीनं सोशल मीडिया गाजवला होता. अत्यंक कमी वयात तिनं आपले आपला चाहतावर्ग तयार केला होता. प्रोजेरीया हा आजार अदालिया रोजला जन्मापासून झाला होता. 2012 साली अदालियानं आपल्या युट्युब चॅनेलची सुरुवात केली होती. आतापर्यंत या चॅनेलला तब्बल 33 कोटी लोकांनी पाहिलंय. तर 29 लाखपेक्षाही जास्त सबस्क्राईबर्स तिच्या युट्युब चॅनेलचे होते. फेसबुकवरही तिचे कोट्यवधी फॉलोअर्स होते. तर इन्स्टाग्रामवरही अदालियाचे चार लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स होते. आपल्या झालेल्या दुर्मिळ आजारामुळे अदालियाचा शारीरीक विकास खुंटला होता. पण तरिही आपल्या वेगळ्या शैलीनं तिनं अनेकांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं होतं.
View this post on Instagram
काय असतो प्रोजेरीया आजार?
प्रोजेरीया हा एक अत्यंत दुर्मिळ असा आजार आहे. 40 लाख मुलांपैकी क्वचितच एका मुलामध्ये हा आजार आढळतो. जीन्समध्ये झालेल्या असमतोलामुळे हा आजार होता. या आजार झालेली व्यक्ती 13 वर्षांपेक्षा जास्त काळ जगू शकत नाही. अत्यंत दुर्मिळ जेनेटिक डिसऑर्डर असलेल्या या आजारावर एक सिनेमाही आला आहे. बेंजामिन बटन नावाचं कॅरेक्टर असलेल्या दी क्युरीअर केस ऑफ बेंजमिन बटनमुळे प्रोजेरीया आजाराला बेंजामिन बटण म्हणून ओळखलं जाऊ लागलं होतं.
पाहा व्हिडीओ –
संबंधित बातम्या :
Amazon Great Republic Day Sale : स्मार्टफोनवर 40% आणि इलेक्ट्रॉनिक्सवर 70% पर्यंत सूट