एक सरदारजी शेकडो पोलिसांवर भारी! पंजाब पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्ष, व्हिडिओ बघून वाटतं एखाद्या चित्रपटातलं दृश्य
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
पंजाब पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्ष: पंजाबच्या जिऱ्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये एकच सरदार संपूर्ण पोलिसांच्या ताफ्यावर चालून जाताना दिसतो. पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यातील झिरामध्ये दारू कारखान्याबाहेर शेतकरी आणि पोलिसांमध्ये चकमक सुरूच आहे. पोलिसांनी घेराव घातल्याने आंदोलन करणारे शेतकरी संतप्त झाले आहेत. शेतकऱ्यांना तिथून हटवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला . पण प्रत्युत्तर म्हणून शेतकरीही त्यांच्यावर लाठीमार करतील याची त्यांना कल्पना नव्हती . यादरम्यान एका सरदाराने लाठीचार्ज करून संपूर्ण पोलिस ताफ्याला पळून जाण्यास भाग पाडले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
आंदोलनस्थळी पोलिसांनी घेराव घातल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. यावेळी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शेतकऱ्यांवर लाठीमार केला.
पोलिसांनी घेरल्याचे पाहून शेतकऱ्यांनी पुढे जाऊन लाठ्या चालवण्यास सुरुवात केली. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, लाठीचार्ज सुरू असताना एक सरदार पोलिसांच्या मधोमध येतो आणि लगेच त्यांच्यावर हल्ला करतो. सरदारजींचा रौद्र रूप पाहून पोलिस तिथून पळून जातात. सरदार संपूर्ण पोलिस पलटणचा लांबपर्यंत पाठलाग करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शेतकरी संघटना गेल्या सोमवारी आंदोलन करतायत. शेतकऱ्यांनी सरकारला विरोध केला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला, त्यांनी बॅरिकेड्स टाकले. यानंतर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
पहले पंजाब पुलिस ने किसानों पर लाठीचार्ज किया। फिर किसानों ने पुलिस पर लाठीचार्ज किया। Ek mauka ? Nu ???? pic.twitter.com/tby2AyR2Bq
— Prahlad (@PrahladDalwadi) December 20, 2022
फिरोजपूर जिल्ह्यातील मन्सूरवाल गावात दारूच्या कारखान्याविरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. या प्लांटमुळे प्रदूषण पसरण्याबरोबरच परिसरातील अनेक गावांतील भूगर्भातील पाणीही प्रदूषित होत असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. ते बंद करण्यात यावे या मागणीसाठी शेतकरी जवळपास पाच महिन्यांपासून येथे धरणे आंदोलन करतायत.