Post Office Scheme : शेअर बाजारच नाही, पोस्टाची ही योजना पण करणार करोडपती! करा इतकी गुंतवणूक

Post Office Scheme : केवळ शेअर बाजारातील गुंतवणूकच मालामाल करते, असं नाही. इतर ठिकाणी पण योग्यरित्या गुंतवणूक केली तर तुम्हाला जोरदार परतावा मिळतो. पोस्ट ऑफिसची ही योजना अशीच फायदेशीर आहे.

Post Office Scheme : शेअर बाजारच नाही, पोस्टाची ही योजना पण करणार करोडपती! करा इतकी गुंतवणूक
व्हा करोडपती
Follow us
| Updated on: Mar 30, 2023 | 11:19 AM

नवी दिल्ली : जर तुम्हाला पैसा गुंतवणूक (Investment) करायचा आहे तर अनेक पर्याय समोर आहेत. सुरक्षितता आणि परताव्याची हमी हवी असेल तर मात्र तुम्हाला शेअर बाजाराचा (Share Market) रस्ता चुकवावा लागेल. शेअर बाजारात तुमचे स्टार चमकू ही शकतात. तुम्हाला तगडा परतावा पण मिळू शकतो. पण त्यासाठी मोठी जोखीम आहे. पण पोस्ट ऑफिसच्या (Post Office) या योजनेत तुम्ही योग्यरित्या गुंतवणूक केली तर तुम्हाला जोरदार परतावा मिळतो. पब्लिक प्रोव्हिडंट फंडात (Public Provident Fund-PPF) दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास जोरदार परतावा तर मिळेलच पण तुमची रक्कम ही सुरक्षित असेल. या योजनेवर निश्चित केलेला व्याजदर मिळतो. या योजनेवरील व्याजदर केंद्र सरकार निश्चित करते. दर तीन महिन्यांनी या व्याजदरांचा (Interest Rate) आढावा घेण्यात येतो.

एक गोष्ट गाठीशी बांधा की, पीपीएफ ही काही श्रीमंत होण्याची योजना नाही. ही एक सुरक्षित गुंतवणूक योजना आहे. यामध्ये एका दीर्घ कालावधीसाठी निश्चित रक्कम जमा केल्यास योग्य परतावा मिळतो. या योजनेत कुठलीही जोखीम नाही. पोस्ट ऑफिसमध्ये या योजनेचे खाते उघडता येते. या योजनेतील गुंतवणुकीवर केंद्र सरकारकडून सुरक्षेची हमी मिळते.

योजनेची वैशिष्ट्ये

हे सुद्धा वाचा

पब्लिक प्रोव्हिडंट फंडमध्ये दीर्घकालीन गुंतवणूकदाराला मोठा फायदा मिळतो. सध्या या योजनेत 7.1 टक्के वार्षिक व्याज मिळते. एका आर्थिक वर्षात या योजनेत जास्तीत जास्त 1.50 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. तर कमीत कमी 500 रुपये गुंतविता येतात. जर तुम्हाला अधिक परतावा हवा असेल तर प्रत्येक महिन्याला 12500 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.

PPF योजनेवर 7.1 टक्के वार्षिक व्याज मिळते. कित्येक बँकांच्या मुदत ठेवीवरील व्याजापेक्षा हा दर जास्त आहे. यामध्ये कंम्पाऊंडिंगचा फायदा मिळते. या योजनेत सिंगल अकाऊंट खाते उघडण्याची सोय आहे. लहान मुलांच्या नावे पण खाते उघडता येते.

कालावधी वाढविता येतो

15 वर्षांच्या कालावधीसाठी या योजनेतील गुंतवणूक चांगला परतावा देते. या सरकारी योजनेत गुंतवणुकीवर हमीपात्र परतावा मिळतो. पीपीएफ खात्यात 15 वर्षांपर्यंत गुंतवणूक करता येते. पण तुम्हाला हा कालावधी 5-5 वर्षांसाठी वाढविता येतो. या योजनेतील गुंतवणूक ही कर सवलत पात्र असते. तुम्हाला कर सूट मिळविता येते. एवढंच नाही तर खात्याला एक वर्ष झाल्यानंतर तुम्हाला कर्ज सुद्धा मिळविता येते.

असा होईल फायदा

पोस्ट ऑफिसमधील पीपीएफ खात्यात तुम्ही दर महिन्याला 12,500 रुपये जमा केल्यास, 15 वर्षानंतर तुम्हाला एकूण 40.68 लाख रुपये मिळतील. यामध्ये तुमची एकूण गुंतवणूक 22.50 लाख रुपये असेल तर या रक्कमेवर तुम्हाला 18.18 लाख रुपयांचा परतावा मिळेल. तुम्ही या योजनेत कालावधी वाढवल्यास आणि गुंतवणूक सुरु ठेवल्यास 25 वर्षानंतर तुम्हाला 1.03 कोटी रुपये मिळतील.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.