2000 Note : क्या आयडिया है सरजी! घरबसल्या 2000 रुपयांच्या नोटा बदलवा, या ई-कॉमर्स कंपनीवर ग्राहक फिदा
2000 Note : आता 2000 हजार रुपयांची नोट तुम्हाला घरबसल्या बदलवता येणार आहे. या ई-कॉमर्स कंपनीने ही जोरदार सेवा सुरु केली आहे. त्यामुळे ग्राहकांची मोठी सोय होणार आहे. ग्राहकांना एका महिन्यात 50,000 रुपयांपर्यंतची रक्कम बदलवता येईल.
नवी दिल्ली : तुमच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा (2000 Rupees Note) असतील आणि त्या तुम्ही अजूनही बदलल्या नसतील तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. बँकांमध्ये जाऊन नोटा बदलण्याची तुमची इच्छा नसेल तर आता ही ई-कॉमर्स कंपनी (E-Commerce Platform) थेट तुमच्या घरुन या गुलाबी नोटा घेऊन जाईल. ग्राहकांसाठी या कंपनीने ही जोरदार सेवा सुरु केली आहे. त्यामुळे बँकेत दगदग करण्याची, धावपळ करण्याची गरज नाही. या ई-कॉमर्स कंपनीचा एजंट तुमच्या घरी येईल. KYC पूर्ण केल्यावर या नोटा तुमच्या खात्यात जमा करेल अथवा इतर खरेदीसाठी वापरता येतील.
या कंपनीने सुरु केली सेवा Amazon या ई-कॉमर्स कंपनीने ही सेवा आणली आहे. गुलाबी नोटांचे टेन्शन कमी करण्यासाठी या कंपनीने पुढाकार घेतला आहे. सध्या 2000 रुपयांच्या नोटा घेण्यास कोणी तयार नाही. काही ठिकाणी या नोटा चालतात. पण त्यासाठी कमिशन घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. Amazon Pay च्या माध्यमातून 2000 रुपयांच्या नोटा बदलविता येतील.
ही दिली ऑफर ॲमेझॉनने नुकतेच हे फीचर सुरु केले आहे. त्यातंर्गत ग्राहकांना 2000 हजार रुपयांच्या नोटांआधारे शॉपिंग करता येईल. त्यांना ॲमेझॉनवरुन खरेदी करता येईल. ई-कॉमर्स कंपनीने ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे. ‘ॲमेझॉन पे कॅश लोड सिस्टम’ सुरु केली आहे. या फीचर अंतर्गत तुम्ही महिन्याला 50,000 रुपयांपर्यंत नोटा बदलवू शकता.
काय आहे ही सुविधा? ‘ॲमेझॉन पे कॅश लोड सिस्टम’ द्वारे तुम्ही 2000 रुपयांच्या नोटा सहज बदलवू शकता. त्यासाठी किचकट प्रक्रिया नाही. अगदी सोप्या पद्धतीने 2000 रुपयांच्या नोटा बदलता येतील. ॲमेझॉन तुमच्या नोटांच्या बदल्यात तेवढीच रक्कम तुमच्या ॲमेझॉन वॉलेटमध्ये टाकतील. ॲमेझॉन तुमच्या पैशांच्या बदल्यात डिजिटल पैसे देईल. त्याआधारे तुम्ही शॉपिंग, रिचार्ज वा इतर बँकिंग कामांसाठी या रक्कमेचा वापर करु शकता. ॲमेझॉन पे मधील ही रक्कम तुम्ही तुमच्या बँकेच्या खात्यात हस्तांतरीत करु शकता.
असा करा वापर
- सर्वात अगोदर तुम्हाला ॲमेझॉन प्लॅटफॉर्मवरुन काही सामानाची ऑर्डर द्यावी लागेल. त्याठिकाणी तुम्हाला कॅश लोडचा पर्याय दिसेल.
- चेक आऊट प्रक्रियेदरम्यान, कॅश ऑन डिलिव्हरी पर्याय निवडावा लागेल.
- त्यावेळी डिलिव्हरी एजेंट तुमचे सामान घेऊन घरी येईल. त्यावेळी Amazon Pay बॅलेन्समध्ये पैसे जमा करायचे आहे, असे तुम्हाला सांगावे लागेल.
- एजंटला पैसे द्या. केवायसी तपासल्यानंतर डिलिव्हरी एजंट तुमच्या Amazon Pay च्या खात्यात रक्कम जमा होईल.
- Amazon Payचे बँलन्स चेक केल्यानंतर तुम्हाला रक्कम जमा झाल्याचे दिसेल.