Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Crorepati Investment Tips : सोडा केवळ दोन ‘कट’, श्रीमंतीच्या चढा पायऱ्या पटापट

Crorepati Investment Tips : चहाचे दोन कट सोडल्यास तुम्ही श्रीमंत होऊ शकता. तुम्ही म्हणाल, असं कुठं होतं का राव. पण योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर त्याचा चांगला परतावा पण मिळू शकतो.

Crorepati Investment Tips : सोडा केवळ दोन 'कट', श्रीमंतीच्या चढा पायऱ्या पटापट
Follow us
| Updated on: Jul 06, 2023 | 3:42 PM

नवी दिल्ली : चहा भारतातच नाही तर जगभरातील अनेकांचे आवडते पेय आहे. अनेकांना दिवसांतून कित्येकदा चहा लागतो. जास्त चहा शरिरासाठी हानीकारक असतो. पण लोक ऐकतात कुठे? दिवसभरातील थकवा घालविण्यासाठी संध्याकाळी अनेकांना गरमा गरम चहा लागतोच. तर रात्रीची झोप उडविण्यासाठी सकाळी चहाचा घोट लागतो. पण दिवसभरात दोन कप चहा (Two Cup of Tea) सोडला तर तुम्ही लखपती, करोडपती होऊ शकता. तुम्ही म्हणाल, असं कुठं होतं का राव. पण योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर त्याचा चांगला परतावा पण मिळू शकतो. 25000-30000 रुपये महिना कमविणारा माणूस पण कोट्याधीश होऊ शकतो. काय आहे हा फॉर्म्युला..

पचनी पडलीच नसेल हसण्यावर नेले की नाही. ही गोष्ट अजूनही पचनी पडली नसेल, नाही का? तुम्हाला वाटतं असेल की, दोन कप चहा सोडून तर सगळेच श्रीमंत झाले असते. पण कधी कधी चमत्कार घडतात. तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर हा फॉर्म्युला अंमलात आणा. तुमचं काय नुकसान होणार आहे? बचत तर होईलच, पण दोन कप चहा सोडल्याचा शरीराला पण फायदा होईल.

चहा नशीब पालटवू शकतो चहा तुमचे नशीब पालटवू शकतो. एक कपासाठी सध्या 10 रुपये मोजावे लागतात. दोन कप चहासाठी 20 रुपये खर्च येतो. पण हा 20 रुपयांचा चहा तुमचं नशीब पालटवू शकतो. फक्त तुम्हाला योग्य ठिकाणी त्याची गुंतवणूक करण्याचे तंत्र आले पाहिजे.

हे सुद्धा वाचा

एसआयपीत करा गुंतवणूक हे 20 रुपये तुम्ही चहा ऐवजी SIP (Systematic Investment Plan) मध्ये गुंतवले तर त्याचा चांगला परतावा मिळतो. तुम्ही दर महा 300 रुपयांची बचत केली तरी कोट्यवधींचा फंड तयार करु शकता. तुम्ही वयाच्या 20 व्या वर्षापासून 20 रुपयांची बचत केली. दीर्घकाळ गुंतवणूक केली तर मोठा फायदा होतो. 60 व्या वर्षी तुम्ही तुमच्या बचतीवर कोट्याधीश होऊ शकता. महिन्याला साधारणपणे 600 रुपये वाचवून त्यावर करोडपती होता येते.

म्युच्युअल फंड सही है म्युच्युअल फंड सही है, ही जाहिरात तर तुम्ही पाहिली असेल. ज्यांना शेअर बाजाराची जोखीम नको आहे, त्यांच्यासाठी हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे. एसआयपी हा म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचा सोपा मार्ग आहे. दरमहा तुम्ही फंडात गुंतवणूक करता. आता तर काही म्युच्युअल फंड हाऊसने दर महाच नाही तर दर दिवशी पण एसआयपी रक्कम टाकण्याची सुविधा सुरु केली आहे. एसआयपीची रक्कम तुमच्या बँक खात्यातून दरमहा कपात होते. त्यासाठी एक तारीख निश्चित करावी लागते. दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास जोरदार परतावा मिळतो.

योग्य फंड निवडा म्युच्युअल फंडात अनेक प्रकार असतात. तुमच्या गरजेनुसार, तज्ज्ञाच्या सल्ल्यानुसार, तुम्ही पण याविषयीचा अभ्यास करुन एक योग्य फंड निवडल्यास, त्यात कायम गुंतवणूक केल्यास फायदा होईल. गुंतवणूक करतानाही काही बदल करावे लागतात. तर अधिक फायदा मिळतो.

जोरदार परतावा एसआयपीत 20 व्या वर्षी गुंतवणूक सुरु केल्यास कोट्याधीश होता येते. महिन्याला 600 रुपयांची एसआयपी सुरु करा. 480 महिन्यात एकूण 2,88,000 रुपये जमा होतील. त्यावर 15 टक्के परतावा गृहीत धरल्यास 1,88,42,253 रुपये मिळतील. 20 टक्के परतावा मिळाला तर ही रक्कम 10,18,16,777 रुपये मिळेल. अथवा यापेक्षा कमी जरी परतावा गृहीत धरल्यास लखपती तर नक्कीच होता येईल. कारण यामागे कपाऊंडिंगचे गणित आहे.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.