Investment Scheme : मुलीच्या लग्नाची नको चिंता, 64 लाख देईल ही सरकारी योजना!
Investment Scheme : मुलीच्या लग्नासाठी खर्चाची आता चिंता करण्याची गरज नाही. या सरकारी योजनेत तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास 64 लाख रुपयांचा परतावा मिळेल.
नवी दिल्ली : मुलांचे भविष्य उज्ज्वल असावे, यासाठी प्रत्येक पालक धडपडतो. त्यांना चांगले शिक्षण मिळावे, मोठ्या महाविद्यालयात प्रवेश मिळावे, त्यांनी चांगले शिक्षण घ्यावे. त्यांचे दोनाचे चार हात व्हावे यासाठी प्रत्येक पालक प्रयत्न करतो. परंतु, महागाई सातत्याने वाढत आहे. त्यामुळे बचत करणे आणि त्यातून चांगला परतावा प्राप्त करणे सोप्पे काम नाही. पण काही सरकारी योजनांमध्ये केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी मोठी फायदेशीर ठरु शकते. उच्च शिक्षण (Higher Education) दिवसागणिक महागडे होत आहे. एक सर्वसामान्य कुटुंबासाठी मुलांना चांगले शिक्षण देणे ही मोठी कसरत झाली आहे. मुलींसाठी केंद्र सरकारने एक लोकप्रिय योजना सुरु केली आहे. सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. त्यातील प्रदीर्घ गुंतवणूक तुम्हाला फायदेशीर ठरु शकते. या योजनेत मुलीचे शिक्षण आणि लग्न याच्या खर्चाची तरतूद करता येईल.
8% व्याज एप्रिल ते जून 2023 साठी सुकन्या समृद्धी योजनेत नवीन व्याजदर (Sukanya Samriddhi Yojana Interest Rate) लागू करण्यात आले आहे. हा व्याजदर 8 टक्के इतका आहे. सुकन्या समृद्धी व्याजदर दर 3 महिन्यांसाठी निश्चित होतो.
कोणत्या वर्षी उघडता येते खाते सुकन्या समृद्धी योजनेत पालक मुलीच्या नावे वयाच्या 10 वर्षांच्या आत खाते उघडू शकता. पालक मुलीच्या जन्मानंतर लागलीच हे खाते (SSY Account) उघडतील तर त्यांना या योजनेत 15 वर्षांपर्यंत रक्कम जमा करता येईल. मुलीचे वय 18 वर्ष झाले की मॅच्युरिटीच्या रक्कमेतून 50 टक्के रक्कम काढता येईल. उर्वरीत रक्कम मुलगी 21 वर्षांची झाल्यानंतर काढता येईल.
लग्नावेळी मिळतील 64 लाख सुकन्या समृद्धी योजनेत तुम्ही दरमहा 12,500 रुपये जमा केले तर एका वर्षांत 1.5 लाख रुपये जमा होतील. या रक्कमेवर कोणताही कर आकारण्यात येणार नाही. जर मॅच्युरिटीपर्यंत व्याजदर 7.6 टक्के जरी गृहीत धरला तरी, गुंतवणूकदारांना मॅच्युरिटीपर्यंत मुलीच्या नावे मोठा निधी जमा होईल. जर पालक मुलगी 21 वर्षांची झाल्यावर सर्व रक्कम काढतील तर ही रक्कम 63 लाख 79 हजार 634 रुपये होईल. सुकन्या समृद्धी योजनेत दरमहा 12,500 रुपये जमा केल्यावर मुलगी 21 वर्षांची झाल्यावर जवळपास 64 लाख रुपये मिळतील.
कर नाही लागणार
- सुकन्या समृद्धी योजनेत एका वर्षांत 1.50 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते
- या गुंतवणुकीवर आयकर सवलत (Income Tax Exemption) मिळते
- SSY मध्ये एका वर्षांत जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा करता येते
- ही योजना EEE फायद्यासह मिळते, 3 ठिकाणी गुंतवणूकदारांना सवलत मिळते
- या योजनेत गुंतवलेली रक्कम, व्याज आणि मॅच्युरिटीवरील रक्कमेवर कोणताच कर द्यावा लागत नाही