7th Pay Commission Updates: केंद्र सरकारचे केंद्रीय कर्मचाऱ्यांना ‘महाग’डे गिफ्ट ! 1 कोटींहून अधिक कर्मचा-यांना होणार फायदा

केंद्रीय कर्मचा-यांना महागाई भत्ता हा फार जिव्हाळ्याचा विषय असतो. चार-पाच महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने महागाई भत्त्यात दुप्पटीच्या आसपास वाढ करत कर्मचा-यांना खूष केले होते. आता लवकरच महागाई भत्याची थकबाकी केंद्र सरकार अदा करणार आहे. त्यामुळे एकदाच कर्मचा-यांच्या हातात दीड ते दोन लाख रुपये मिळतील.

7th Pay Commission Updates: केंद्र सरकारचे केंद्रीय कर्मचाऱ्यांना 'महाग'डे गिफ्ट ! 1 कोटींहून अधिक कर्मचा-यांना होणार फायदा
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Feb 05, 2022 | 7:58 AM

नवी दिल्ली: केंद्र सरकारने गेल्या वर्षी दिवाळीपूर्वी कर्मचा-यांना महागाई भत्त्यात (DA) दणक्यात वाढ केली होती. त्यामुळे महागाईशी दोन हात करण्यासाठी कर्मचा-यांना बळ मिळाले होते. ऑक्टोबर महिन्यात महागाई भत्ता 17 टक्क्यांवरुन 31 टक्के करण्यात आला होता. नुकताच देशाचा अर्थसंकल्प (Budget) सादर करण्यात आला. आता सरकार केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त कर्मचा-यांना (Central Employees and Pensioners) मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. महागाईमुळे कर्मचा-यांचे जगणे मुश्किल झाले आहे. कोरोना काळात सरकारने तीन वेळा महागाई भत्ता गोठोवला होता. या अन्यायाची भरपाई सरकार त्यांना करुन देणार आहे. सरकार महागाई भत्याची थकबाकी लवकरच कर्मचा-यांच्या खात्याच जमा करेल. रिपोर्ट्सनुसार, सरकार गेल्या 18 महिन्यांतील प्रलंबित डीएची थकबाकी एकाच वेळी देण्याच्या तयारीत आहे. हा निर्णय झाल्यास येत्या काळात केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना एकावेळी दोन लाख रुपयांपेक्षा अधिकची रक्कम एकादाच मिळेल. एवढेच नाही तर यंदा महागाई भत्यात पुन्हा 3 टक्के वाढ होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे महागाईमुळे कंबरडे मोडलेल्या केंद्रीय कर्मचा-यांना वेतनाच्या 34 टक्के महागाई भत्ता मिळेल.

कोरोनाने हिरावला होता हक्क

सरकारच्या या निर्णयाचा फायदा सुमारे 48 लाख केंद्रीय कर्मचारी आणि सुमारे 60 लाख पेन्शनधारकांना होऊ शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नॅशनल कौन्सिल ऑफ जॉइंट कन्सल्टेटिव्ह मशिनरी (JCM) चे सचिव (Staff Side) शिव गोपाल मिश्रा यांनी माहिती दिली की, परिषदेने डीएची थकबाकी एकाच वेळी देण्याची विनंती पुढे ढकलली आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अर्थ मंत्रालयाने मे 2020 ते जून 2021 पर्यंत डीए दरवाढ बंद केली होती.नंतर डीए आणि डी.आर. वाढ पूर्ववत करण्यात आली. पण जुनी थकबाकी देण्यात आली नाही.

आता एवढा होणार डीए, लवकरच घोषणा शक्य

रिपोर्ट्सनुसार, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत लवकरच निर्णय होऊ शकतो. साधारणत: वर्षातून दोनदा डीए वाढवला जातो. यावेळी जानेवारीतील डीए वाढ अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. याआधी केंद्र सरकारने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये डीए 17 टक्क्यांवरून 31 टक्के केला होता. जानेवारी 2022 साठी डीएमध्ये 3 टक्के वाढीची शक्यता आहे, त्यामुळे डीए 34 टक्क्यांपर्यंत वाढेल.

18 महिन्यांच्या थकबाकीचा निर्णय

वाढत्या महागाईशी दोन हात करता यावे आणि कर्मचारी महागाईच्या चिंतेने त्रस्त राहू नयेत यासाठी केंद्र सरकार कर्मचारी आणि निवृत्त कर्मचारी यांना महागाई भत्ता देते. त्यांना दरवाढीचा वर्षातून दोनदा लाभ दिल्या जातो. 18 महिन्यांची थकबाकी देण्याचा निर्णय येत्या बैठकीत झाल्यास श्रेणीनुसार, काही कर्मचा-यांना 11 हजार 880 ते 37 हजार 554 रुपये तर काही कर्मचा-यांना 1,44,200 ते 2,18,200 रुपये महागाई भत्ता मिळू शकतो.

इतर बातम्या:

Gold Price Today : सोन्याच्या भावात घसरण, मुंबईतले दर 450 रुपयांनी गडगडले; जाणून घ्या आजचे भाव

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर ! 14 टक्के योगदानावर करकपातीचा लाभ 

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.