महागाई गॅसवर तरीही आकडेवारी ‘उज्वल’! उज्वला योजनाचे आतापर्यंत 80.5 लाख लाभार्थी

पंतप्रधान उज्वला योजना भारतातील गोर-गरीब महिलांना धुराच्या त्रासापासून मुक्त करण्यासाठी आणण्यात आली. या योजनेची पंचवार्षिकी पूर्ण झाली असून, योजनेतंर्गत 14.2 किलो वजनाचा गॅस देण्याची तरतूद आहे. डोंगराळ भागात पाच पाच किलो वजनाचे दोन गॅस सिलिंडर देण्याच्या सूचना आहेत. पंतप्रधान उज्वला योजनेच्या दुस-या टप्प्यात आतापर्यंत 80.5 लाख महिलांना लाभ झाला आहे.

महागाई गॅसवर तरीही आकडेवारी 'उज्वल'! उज्वला योजनाचे आतापर्यंत 80.5 लाख लाभार्थी
Follow us
| Updated on: Dec 24, 2021 | 9:18 AM

नवी दिल्ली :  पाच वर्षांपूर्वी गाजावाजा करत सुरू करण्यात आलेली प्रधानमंत्री उज्वला योजना (PMUY) सध्या एलपीजी सिलिंडरच्या (LPG Cylinder)  वाढत्या किंमतीमुळे वादाच्या फे-यात अडकली आहे. राज्यात औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील सिल्लोड(Sillod) तालुक्यामधील पहिल्या लाभार्थी महिलेने या योजनेवर टिका करत गॅसची किंमत वाढल्याने पुन्हा चुलीकडे मोर्चा वळविला होता. असे असले तरी या योजनेच्या लाभार्थ्यांची ट्रेन सुसाट धावत आहे. या योजनेच्या दुस-या टप्प्याचे चार महिन्यांपूर्वी पंतप्रधानांनी (Pradhan Mantri) उद्धघाटन केले होते. 1 मे 2016 मध्ये पहिल्यांदा ही योजना अंमलात आली. त्यानंतर उत्तरप्रदेशातीलच (Utter Pradesh) महोबा (Mahoba) येथून दुस-या टप्याचे लोकार्पण 10 ऑगस्ट 2021 रोजी करण्यात आले होते. तेव्हापासून या दुस-या टप्यात जवळपास 80.5 लाख महिलांना घरगुती गॅस कनेक्शन (LPG Connection) दिल्याचे सरकारने दिलेल्या आकडेवारीवरुन समोर आले आहे.

या योजनेसाठी कोण आहेत पात्र 

उज्वला गॅस योजनेतील लाभार्थी या फक्त महिला असतील.  गरीब कुटुंबातील दारिद्र रेषेखालील महिलांना या योजनेसाठी प्राधान्य देण्यात आले आहे.  त्यांना त्यासाठी नोंदणी करावी लागेल. अर्ज करणाऱ्या महिलेचे वय कमीत कमी 18 वर्षे असले पाहिजे.  एका घरामध्ये केवळ एकाच व्यक्तीला या योजनेसाठी पात्र ठरविण्यात येते.  एकापेक्षा अधिक घरगुती गॅस कनेक्शन देता येत नाहीत.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

उज्ज्वला योजनेसाठी केवायसी  अपडेट करणे आवश्यक आहे.  दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना या योजनेत सहभागी व्हायचे असेल तर त्यांच्याकडे केशरी रेशन कार्ड असणे गरजेचे आहे.  लाभार्थी कुटुंबातील सदस्यांकडे ओळखपत्र असायला हवे. आधारकार्ड अनिवार्य आहे. योजनेत सहभागी होणा-या महिलेच्या नावे बँक खाते असावे. संबंधित बँकेतील खातेक्रमांक आणि IFSC Code देणे अनिवार्य आहे.

असा करावा ऑनलाईन अर्ज

सर्वात अगोदर या योजनेच्या संकेतस्थळाला (website)  भेट द्या

pmujjwalayojana.com या संकेतस्थळावर क्लिक (Click) करा

संकेत स्थळावरील होमपेज (Homepage) वरील (Download Form) डाऊनलोड फॉर्म वर जा आणि त्यावर क्लिक करा

डाउनलोड वर क्लिक केल्यानंतर पीएम उज्वला योजनेचा फॉर्म  (Open) ओपन होईल

या अर्जात तुमचे नाव, ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक आणि खाली दर्शवलेला कॅप्चा त्यात भरा

आता ओटीपी (OTP) जनरेट करण्यासाठी संबंधित बटणावर क्लिक करा

त्यानंतर फॉर्म डाऊनलोड करा

फॉर्म जवळच्या एलपीजी गॅस एजन्सीकडे जमा करा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.