एकाच झूम कॉलवर 900 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी, भारतीय वंशांच्या CEO वर जगभरातून टीकेची झोड

| Updated on: Dec 07, 2021 | 12:04 PM

अमेरिका स्थित एका कंपनीच्या सीईओने (CEO) तब्बल 900 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना एकाचवेळी काढून टाकले आहे. विशेष म्हणजे झुमवर सुरू असलेल्या मिटिंगमध्ये या सीईओने हा निर्णय घेतला.

एकाच झूम कॉलवर 900 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी, भारतीय वंशांच्या CEO वर जगभरातून टीकेची झोड
बेटर डॉट कॉमचे सीईओ विशाल गर्ग
Follow us on

वॉग्शिंटन : अमेरिका स्थित एका कंपनीच्या सीईओने (CEO) तब्बल 900 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना एकाचवेळी काढून टाकले आहे. विशेष म्हणजे झुमवर सुरू असलेल्या मिटिंगमध्ये या सीईओने हा निर्णय घेतला. मॉर्गेज लेंडर बेटर डॉट कॉम असे या कंपनीचे नाव असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. याबाबत बोलताना कंपनीचे सीईओ विशाल गर्ग यांनी सांगितले की, कंपनीने नऊ टक्के मनुष्यबळ कपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

कर्मचारी कपातीचा निर्णय

कंपनीतील ज्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे, त्या सर्व कर्मचाऱ्यांसोबत कंपनीच्या सीईओंनी सर्वप्रथम झूमच्या माध्यमातून मिटिंग आयोजित केली होती. याच मिटिंगमध्ये त्यांना कंपनीतून काढून टाकण्यात आल्याचे सांगण्यात आले. यावेळी बोलताना कंपनीचे सीईओ विशाल गर्ग म्हणाले की, खरतर हा जे या झूम मिटिंगला उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी दुर्भाग्यपूर्ण दिवस आहे. काराण या सर्व कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. हा तुमचा या कंपनीसोबतचा शेवटचा दिवस असेल. कंपनीने नऊ टक्के मनुष्यबळ कमी कण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये शॉटलिस्ट झालेल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात येत आहे.

विशाल गर्ग यांचो तो व्हिडीओ:

 

 

कर्मचारी कपातीची ही दुसरी वेळ 

दरम्यान मॉर्गेज लेंडर बेटर डॉट कॉम या कंपनीची कर्मचारी कपात करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी देखील कोरोना काळात कंपनीकडून कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कोरोना काळात जगभरात लॉकडाऊन लावण्यात आले होते. याचा अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम झाला. लॉकडाऊन काळात उत्पादन आणि सेवा सर्व ठप्प असल्याने आर्थिक आवक मंदावली होती. त्यामुळे अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपातीचा कटू निर्णय घेतला. याच काळात अमेरिकेसारख्या देशाच्या बेरोजगारीमध्ये देखील 14. 7 टक्क्यांची वाढ झाली होती.

संबंधित बातम्या 

अखेर प्रतिक्षा संपली; 15 डिसेंबरपासून होणार ओला ई-स्कूटरचे वितरण

31 डिसेंबपर्यंत दाखल करता येणार ‘आयटीआर’; आयकर विभागाकडून जनजागृती

देशात सेमिकंडक्टरचा तुटवडा; वाहन निर्मितीवर परिणाम