तुमच्या श्रमाला आता मोत्याचा दाम! असे तयार करा E-Sharm Card
E-Sharm Card | केंद्र सरकारने ई-श्रम पोर्टलची सुरुवात कोरोना काळात केली होती. असंघटित क्षेत्रातील कामगार, मजुरांसाठी ही योजना सुरु केली होती. त्यामुळे सरकारी योजनांचा थेट लाभ या कामगारांना मिळत आहे. त्यांचा डाटाबेस पण तयार होत आहे. असंघटित कामगारांना हे ई-श्रम कार्ड असे तयार करता येईल.
नवी दिल्ली | 19 डिसेंबर 2023 : केंद्र सरकारने देशातील असंघटित कामगारांसाठी ई-श्रम पोर्टलची सुरुवात करण्यात आली आहे. कोरोना काळात मजुरांसाठी हे पोर्टल सेवेत आणण्यात आले. असंघटीत क्षेत्रातील कामगारांची नोंद व्हावी. त्यांचा डेटाबेस तयार व्हावा आणि थेट कामगारांपर्यंत सरकारच्या योजनांचा लाभ पोहचावा हा त्यामागे उद्देश होता. असंघटीत कामगारांसाठी प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना आणण्यात आली आहे. तर ई-श्रम कार्डद्वारे इतरही अनेक योजनांचा फायदा मिळणार आहे. हे कार्ड तयार करणे सोपे आहे.
हे कामगार या कार्डसाठी पात्र
ई-श्रम कार्ड तयार करण्यासाठी काही निकष आहेत. 16 ते 59 वर्ष वयोगटातील असंघटीत कामगार वा मजूर हे ई-श्रम कार्डसाठी पात्र आहे. ज्यांना ईपीएफओ/ ईएसआयसी आणि एनपीएसचा फायदा मिळत नाही, त्या सर्व कामगारांना ई-श्रम कार्डसाठी अर्ज करता येईल.
ई-श्रम कार्डसाठी ऑनलाईन नोंदणी
असंघटीत क्षेत्रातील कोणतीही व्यक्ती सहज या ई-श्रम कार्डसाठी अर्ज करु शकते. ई-श्रम पोर्टलवर जाऊन कामगारांना ऑनलाईन नोंदणी करता येईल. त्यासाठी आधार कार्ड, मोबाईल क्रमांक आणि बँक खात्याची गरज आहे. ही नोंदणी पूर्णपणे मोफत आहे. केंद्र सरकार त्यासाठी कोणतेही शुल्क आकारणार नाही. एकदा आधारद्वारे पडताळणी झाली की ई-श्रम पोर्टलवर नोंदणी होईल.
कोणती कागदपत्रे आवश्यक?
ई-श्रम पोर्टलवर तुम्ही आधार, पासपोर्ट साईज फोटो, कँसल चेक, बँक पासबूकची यांची फोटोकॉपी, झेरॉक्सची गरज असेल. अर्ज भरल्यानंतर तो एकदा पुन्हा तपासून पाहावा. त्यात स्पेलिंगची चूक नको. आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक योग्य लिहिला की नाही हे तपासा. एखादी त्रुटी असेल तर ती दूर करा.
लागलीच ई-श्रम कार्ड हातात
ई-श्रम पोर्टलवर एकदा नोंदणी झाली की ई-श्रम कार्ड जनरेट होईल. हे कार्ड युनिक असेल. यामध्ये त्या कामगाराची माहिती नोंदवलेली असेल. तसेच ई-श्रम कार्ड आणि आधार कार्ड हे लिंक असतील. त्याद्वारे केंद्र सरकारच्या विविध योजनांचा त्यांना लाभ घेता येईल. पण अगोदर त्यांना ई-श्रम कार्डसाठी नोंदणी करावी लागेल.