Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

House Or SIP : स्वतःचा इमला की एसआयपी? 10 वर्षांत कोण करेल बरं मालामाल

House Or SIP : पूर्वीपेक्षा गुंतवणुकीचे अनेक पर्याय असल्याने आता गुंतवणूकदार चोखंदळ झाला आहे. मग घरासाठी पैसा खर्च करावा की त्याऐवजी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करावी, असा ही प्रश्न काहींना पडतो. 10 वर्षांत कोणती गुंतवणूक तुम्हाला श्रीमंत करेल बरं?

House Or SIP : स्वतःचा इमला की एसआयपी? 10 वर्षांत कोण करेल बरं मालामाल
Follow us
| Updated on: Jun 18, 2023 | 2:38 PM

नवी दिल्ली : पूर्वीपेक्षा गुंतवणुकीचे अनेक पर्याय असल्याने आता गुंतवणूकदार चोखंदळ झाला आहे. मग घरासाठी पैसा खर्च करावा की त्याऐवजी म्युच्युअल फंडात (Mutual Fund) गुंतवणूक करावी, असा ही प्रश्न काहींना पडतो. अनेकांना वाटतं, कर्जाचा बोजा डोईवर घेण्यापेक्षा भाड्याच्या घरात दिवस काढून आरामशीर उतारवयात जागा विकत घेऊन घर बांधावं (Dream Home) अथवा आलिशान फ्लॅट बुक करावा. आपल्या घरासाठी बँकेचे घर कशाला भरायचं, असा रोकडा सावल पण काही जण विचारतात. तर हा प्रश्न कोंबडी आधी की अंड नंतर असा काही अवघड नाही. याचं उत्तर आपल्याला शोधता येते. 10 वर्षांत कोणती गुंतवणूक तुम्हाला श्रीमंत करेल हे या फॉर्म्युलाने कळते..

प्रॉपर्टी रिटर्न घर ही केवळ गुंतवणूक नाही. एक भावनिक खेळ आहे. स्वतःचे घर असावे ही भावना दृढ असते. हा एक सामाजिक प्रतिष्ठेचा पण विषय असतो. त्यात अजून प्रॉपर्टी रिटर्न जोरदार मिळतो, असा एक तर्क सांगण्यात येतो. पण खरंच मालमत्ता खरेदीतून चांगला परतावा मिळतो का? हा दावा खरंच योग्य आहे का?

घर खरेदीचे बजेट काय देशातील मेट्रो सिटी असो वा निमशहरातील चांगल्या अमेनिटिज असलेला 2BHK फ्लॅट, सदनिका जवळपास 40 लाख रुपयांना मिळते. या किंमती कमी-जास्त असू शकतात. पण सरासरी ही किंमत गृहीत धरुयात. या रक्कमेवर 15 टक्के डाऊन पेमेंट द्यावे लागते. म्हणजे जवळपास 6 लाख रुपये लागतात. रजिस्ट्रीचा खर्च, घरातील फर्निचर इतर खर्चही जवळपास 10 लाख रुपयांच्या घरात येतो. म्हणजे घर खरेदी करताना तुमच्याकडे जवळपास 10 लाख रुपयांची रक्कम असणे आवश्यक आहे.

हे सुद्धा वाचा

इतके कर्ज डोक्यावर 30 लाख रुपयांचं कर्ज घ्यावे लागेल. तुम्ही 20 वर्षांसाठी हे कर्ज घेता. सध्याचा व्याजदर, 9 टक्क्यांच्या घरात आहे. म्हणजे जवळपास 25,000 रुपयांचा हप्ता दर महिन्याला भरावा लागेल. आता सोप्या शब्दात हा हिशोब समजून घेऊयात. 20 वर्षांसाठी 30 लाख रुपयांचं कर्ज घेतल्यास त्यावर व्याजापोटी तुम्हाला 30 लाख रुपये अधिक चुकते करावे लागतील. म्हणजे संपूर्ण रक्कम जवळपास 60 लाखांच्या घरात जाईल.

इतका होईल खर्च म्हणजे 40 लाख रुपयांच्या 2BHK फ्लॅटसाठी तुम्हाला 60 लाख रुपये चुकते करावे लागतील. एवढेच नाही तर त्याअगोदर तुम्हाला डाऊन पेमेंट इतर खर्च मिळून 10 लाख खर्च करावे लागतात. म्हणजे 20 वर्षानंतर हे घर विक्री करायचं तर तुम्हाला कमीत कमी 88 लाखांत हे घर खरेदी करणारा मिळायला हवा.

SIP किती करेल फायदा सिस्टमॅटिक इन्व्हेसटमेंट प्लॅन (SIP) सध्या जोखिमयुक्त असला तरी गुंतवणुकीचा लोकप्रिय पर्याय आहे. तुमच्याकडे जमा असलेले 10 लाख रुपये तुम्ही एकरक्कमी चांगल्या म्युच्युअल फंडात गुंतवले तर काय होईल ते पाहुयात. या गुंतवणुकीवर तुम्हाला जर सरासरी 15 टक्क्यांचा परतावा मिळाला तर 10 लाख रुपयांचे पुढील 10.5 वर्षांत जवळपास 40 लाख रुपये होतील. म्हणजे चारपट परतावा मिळेल. हीच गुंतवणूक 20 वर्षांसाठी केली तर 80 लाख रुपये मिळतील. अशावेळी तुम्ही घर खरेदी केले तर तुम्हाला ईएमआय भारावा लागणार नाही.

हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. चांगल्या परताव्यासंबंधी म्युच्युअल फंडच्या कामगिरी आधारे हा वर्तविलेला अंदाज आहे. योग्य गुंतवणूकदार सल्लागाराचे मार्गदर्शन घेतल्यास यापेक्षा चांगला फायदा पण मिळू शकतो. अभ्यास न करता गुंतवणूक करणे नुकसानदायक ठरु शकते.

बलात्कारी, दंगेखोरांचा पुळका कशाला? मुख्यमंत्र्यांचा थेट सवाल
बलात्कारी, दंगेखोरांचा पुळका कशाला? मुख्यमंत्र्यांचा थेट सवाल.
संजय राऊतांना राजकीय नेते मंडळींकडून शिवीगाळ, 'हारामXXX अन्...'
संजय राऊतांना राजकीय नेते मंडळींकडून शिवीगाळ, 'हारामXXX अन्...'.
जयकुमार गोरे प्रकरणात सुप्रिया सुळे, रोहित पवारांचा हात?
जयकुमार गोरे प्रकरणात सुप्रिया सुळे, रोहित पवारांचा हात?.
भुजबळ संपूर्ण सभागृह डोक्यावर घ्यायचे पण..,विरोधकांना फडणवीसांचा चिमटा
भुजबळ संपूर्ण सभागृह डोक्यावर घ्यायचे पण..,विरोधकांना फडणवीसांचा चिमटा.
साहब के बारे में क्या बोला तूने, शिवसैनिकाची कामराला धमकी,ऑडिओ व्हायरल
साहब के बारे में क्या बोला तूने, शिवसैनिकाची कामराला धमकी,ऑडिओ व्हायरल.
कोरटकरच्या सुनावणी दरम्यान कोर्टात काय झालं? इनसाईड स्टोरी
कोरटकरच्या सुनावणी दरम्यान कोर्टात काय झालं? इनसाईड स्टोरी.
हातात कोल्हापूरी अन् चिल्लर, कोरटकर विरोधात शेकडो शिवप्रेमी आक्रमक
हातात कोल्हापूरी अन् चिल्लर, कोरटकर विरोधात शेकडो शिवप्रेमी आक्रमक.
सेना-भाजप युतीवरून राऊतांनी घेतली फडणवीसा बाजू
सेना-भाजप युतीवरून राऊतांनी घेतली फडणवीसा बाजू.
संजय राऊत अन् कुणाल कामरा एकाच बापाचे..., शिवसेना आमदाराचा हल्लाबोल
संजय राऊत अन् कुणाल कामरा एकाच बापाचे..., शिवसेना आमदाराचा हल्लाबोल.
कार्यकर्त्यांची रेलचेल अन् संभाषणासाठी वापरायला पोलिसांचे मोबाईल..
कार्यकर्त्यांची रेलचेल अन् संभाषणासाठी वापरायला पोलिसांचे मोबाईल...