Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Home Loan : हीच खरी आयडियाची कल्पना! गृहकर्जाचा बोजा असा उतरेल झटपट

Home Loan : गृहकर्जाच्या ओझ्याने रडकुंडीला येऊ नका, ही आयडीयाची कल्पना पळवा, तुम्हाला होईल फायदा, कर्ज चुकते करण्यासाठी ही युक्ती कामी येऊ शकते.

Home Loan : हीच खरी आयडियाची कल्पना! गृहकर्जाचा बोजा असा उतरेल झटपट
Follow us
| Updated on: May 06, 2023 | 4:44 PM

नवी दिल्ली : गृहकर्ज (Home Loan) हे दीर्घकालीन कर्ज आहे. तसेच यामध्ये मोठी रक्कम तुम्हाला अदा करावी लागते. कर्जाच्या रक्कमपेक्षा अधिक व्याज मोजावे लागते. कर्जाचा हप्ता (Loan Installment) पण मोठा असतो. पण अचानक आलेल्या खर्चांमुळे कर्जाचा हप्ता चुकता करताना कधी कधी नाकीनऊ येतात. अशावेळी ही आयडियाची कल्पना वापरल्यास तुमचा मोठा फायदा होऊ शकतो. तुमची कर्जाची चिंता दूर होऊ शकते. त्यासाठी एक छोटेसे नियोजन करावे लागते. हे नियोजन केल्यास मोठ्या हप्त्यात सूटका होऊ शकते. अशावेळी केंद्रीय भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO ) तुमच्या मदतीला धाऊन येऊ शकते.

PF येईल मदतीला तुम्ही कर्जाच्या ओझ्याखाली दबला असाल तर ही युक्ती तुमच्यासाठी, त्यामुळे तुम्ही लवकर कर्जाच्या झंझटीतून सूटका करुन घेऊ शकता. कर्जातून मुक्त होण्यासाठी पीएफ फंडची मदत घेता येऊ शकते. ईपीएफओने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याविषयीची माहिती शेअर केली आहे. त्यामध्ये प्रोव्हिडंड फंडची रक्कम कशी गृहकर्ज फेडण्यासाठी वापरता येऊ शकते, याची माहिती EPFO ने दिली आहे.

हे सुद्धा वाचा

ॲडव्हान्स पीएफ EPFO ने याविषयीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये गृहकर्जाची रक्कम परत फेड करण्यासाठी पीएफ ॲडव्हान्स, आगाऊ रक्कमेसाठी अर्ज करता येऊ शकतो, याची माहिती दिली आहे. त्यासाठी पूर्ण अथवा अर्धी रक्कम काढून गृहकर्जाच्या खात्यात ती रक्कम जमा करु शकता आणि गृहकर्जाचा बोजा कमी करु शकता अथवा त्यातून पूर्णपणे बाहेर पडू शकता.

हा आहे नियम EPF चा नियम 68BB नुसार, तुम्ही कर्ज चुकविण्यासाठी तुमच्या PF ची रक्कम वापरु शकता. त्यासाठी एक नियम आहे. घर तुमच्या नावे असावे अथवा संयुक्तपणे हे घर तुमच्या नावावर नोंद असावे. तसेच पीएफ खात्यात कमीत कमी 10 वर्षांचे योगदान असावे.

कशी काढणार रक्कम गृहकर्जाची भरपाई करताना तुम्हाला काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. यामधील पहिली गोष्ट म्हणजे, जर गृहकर्जाचे व्याज EPF च्या व्याजापेक्षा जास्त असेल तर EPF कॉर्पसचा उपयोग करता येतो. त्यासाठी तुम्ही ईपीएफओच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन Advance PF वर दावा करु शकता. दाव्यानंतर काही दिवसातच तुमच्या खात्यात रक्कम येते.

असा बसला फटका गेल्या आठ महिन्यात नागरीक वाढत्या महागाईने बेजार झालेले आहेत. कर्जदारांना तर मोठा फटका सहन करावा लागला आहे. आठ महिन्यांत 30 लाखांच्या गृहकर्जासाठी आता जवळपास 4200 रुपये अधिक मोजावे लागत आहेत. एप्रिल 2022 च्या तुलनेत जानेवारी 2023 मध्ये गृहकर्जाच्या ईएमआयमध्ये जवळपास 18 टक्क्यांची वृद्धी दिसून येत आहे. जर होम लोन तुम्ही 30 वर्षांसाठी घेतले असेल तर त्यासाठी कर्जदारांचा ईएमआय जवळपास 24 टक्क्यांनी वाढला आहे.

नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल
नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल.
ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान
ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान.
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती.
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका.
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'.
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'.
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप.
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र.
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात.
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला.