Income Tax : मोदी सरकारचा मोठा दिलासा! करदात्यांना नवीन कर रचनेत मिळतील दोन फायदे

Income Tax : मोदी सरकारने करदात्यांना मोठा दिलासा दिला. नवीन कर रचनेत तर सात लाख रुपयांपर्यंत्या करपात्र उत्पन्नावर त्यांना सवलत मिळते. पण अजूनही एक सवलत त्यांना मिळाली आहे.

Income Tax : मोदी सरकारचा मोठा दिलासा! करदात्यांना नवीन कर रचनेत मिळतील दोन फायदे
Follow us
| Updated on: Apr 25, 2023 | 5:30 PM

नवी दिल्ली : प्राप्तिकर रिटर्न भरण्याची (ITR Filing) अनेकांनी लगबग केली. काहींना नेहमीप्रमाणे उशीर झाला. काहींची प्रक्रिया सुरु आहे. तर आयटीआर भरण्यासाठी सवडीने जो तो प्रयत्न करत आहे. यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात (Union Budget) नवीन कर प्रणालीची ओळख करुन देण्यात आली. मोदी सरकारने आता यापुढे या कर प्रणालीला महत्व दिले. पण याचा अर्थ जुनी कर प्रणाली बंद करण्यात आली, असा नाही. गुंतवणुकीवर तुम्हाला लाभ पदराता पाडून घ्यायचा असेल तर जुनी कर प्रणाली (Old Tax Regime) तुमच्यासाठी आदर्श आहे. पण उत्पन्नावर कर सवलतीचा मामला असेल तर नवीन कर प्रणाली फायदेशीर ठरु शकते.

दोन नवीन फायदे मोदी सरकारने नवीन कर प्रणालीची घोषणा या केंद्रीय अर्थसंकल्पात केली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर करताना याची घोषणा केली. तुमचे उत्पन्न करपात्र मिळकतीपेक्षा अधिक असेल तर त्यावर कर द्यावा लागतो. त्यासाठी इनकम टॅक्स रिटर्न दाखल करावा लागतो. केंद्र सरकार आयटीआर दाखल करण्यासाटी कर सवलत देते. नवीन कर रचनेत दोन नवीन फायदे मिळतात.

काय मिळतो फायदा मोदी सरकारने नवीन कर प्रणाली सुरु केली. केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ही महत्वपूर्ण घोषणा केली आहे. त्यानुसार, निर्मला सीतारमण यांनी नवीन कर प्रणालीत केवळ उत्पन्नावरच नाही तर मानक वजावटीवर पण सूट दिली आहे. त्यामुळे करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हे सुद्धा वाचा

इतका कर माफ बजेट 2023 सादर करताना केंद्रीय अर्थमंत्र्यांनी नवीन कर रचनेत मोठा दिलासा दिला. कर मर्यादेत मोठी वाढ केली. करदाते नवीन कर रचनेच्या माध्यमातून आयटीआर दाखल करणार असतील तर त्यांना वार्षिक 7 लाख रुपयांपर्यंत एक छदामही कर चुकविण्याची गरज उरली नाही. तर एखाद्या करदात्याची वार्षिक कमाई सात लाख रुपयांपेक्षा अधिक असेल तर त्याला सात लाखांपर्यंतच्या मर्यादेचा मोठा फायदा होतोच.

मानक वजावट केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात एक आणखी मोठी घोषणा केली. पहिल्यांदा नवीन कर प्रणालीत मानक वजावटीचा (Standard Deduction) करदात्यांना फायदा मिळत नव्हता. परंतु, अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारमण यांनी मानक वजावटीची सवलत लागू केली. नवीन कर रचनेत पगारदार, निवृत्तीवेतनधारक यांना 50 हजार रुपयांच्या स्टँडर्ड डिडक्शनचा लाभ मिळतो.

वेळेत भरा आयटीआर आयटीआर भरताना तो वेळेच्या आत भरण्याची काळजी घ्या. त्यामुळे तुमचा वेळ तर वाचेलच, पण मनस्तापही होणार नाही. दंड आणि व्याज यांचा तुम्हाला फटका बसणार नाही. तसेच पुन्हा नव्याने त्यासाठी प्रक्रिया करावी लागणार नाही.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.