नव्या आर्थिक वर्षात होणार मोठे फेरबदल; घरे, औषधांच्या दरामध्ये होणार वाढ; PF चे नियम देखील बदलणार
एक एप्रिल म्हणजेच उद्यापासून नव्या आर्थिक वर्षाला (Fiscal year) प्रारंभ होणार आहे. नव्या आर्थिक वर्षामध्ये अनेक गोष्टी बदलणार आहेत. या गोष्टींचा थेट तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ शकतो. एक एप्रिल 2022 अर्थात नव्या आर्थिक वर्षामध्ये अनेक गोष्टी महाग होणार असून, त्याचा मोठा आर्थिक फटका तुम्हाला बसू शकतो.
एक एप्रिल म्हणजेच उद्यापासून नव्या आर्थिक वर्षाला (Fiscal year) प्रारंभ होणार आहे. नव्या आर्थिक वर्षामध्ये अनेक गोष्टी बदलणार आहेत. या गोष्टींचा थेट तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ शकतो. एक एप्रिल 2022 अर्थात नव्या आर्थिक वर्षामध्ये अनेक गोष्टी महाग होणार असून, त्याचा मोठा आर्थिक फटका तुम्हाला बसू शकतो. चालू आर्थिक वर्षामध्ये घराच्या किमती वाढणार (house prices hike) आहेत. घर बांधण्यासाठी वापरात येणारा कच्चा माल (Raw material) महागल्याने घराच्या दरांमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. जर तुम्हाला घर खरेदी करायचे असेल तर तुम्हाला आता अधिक पैसे मोजावे लागू शकतात. सोबतच 800 जीवनावश्यक औषधींच्या दरामध्ये देखील वाढ होणार आहे. औषधीचे दर वाढल्याने तुमचा मेडिकल खर्च वाढणार आहे. यासोबतच चालू आर्थिक वर्षात अनेक बदल होणार आहेत. नेमक्या कोणत्या गोष्टी बदलणार आहेत ते पाहुयात.
काय बदलणार?
- घरे महागणार : बांधकामासाठी लागणारा कच्चा माल प्रचंड महाग झाला आहे. आता पूर्वीच्या दरात घरे विकणे परवतड नसल्याचे बिल्डर सांगतात. कच्च्या माला सोबतच मजुरी देखील वाढली आहे. त्यामुळे घरांच्य दरामधे वाढ अटळ मानली जात आहे. येत्या आर्थिक वर्षामध्ये घराच्या किमती महाग होण्याची शक्यता आहे.
- औषधांच्या किंमती वाढणार – उद्यापासून नव्या आर्थिक वर्षाला प्रारंभ होत आहे. नव्या आर्थिक वर्षात जवळपास 800 जीवनावश्यक औषधांचे दर वाढणार आहेत. औषधांचे दर वाढल्याने याचा मोठा परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर होऊ शकतो. वैद्यकीय खर्चामध्ये वाढ होईल.
- प्रोव्हिडंट फंड (PF) पुढील आर्थिक वर्षामध्ये पीफच्या नियमांमध्ये देखील बदल होणार आहे. जर तुमचे पीएफ खात्यात 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक योगदान असेल तर तुम्हाला मिळणाऱ्या व्यााजावर टॅक्स भरावा लागणार आहे.
- क्रिप्टो करन्सी : क्रिप्टो करन्सीसंदर्भात सरकारने अनेक कठोर निर्बंध घातले आहेत. य नियमांची अंमलबजावणी येत्या आर्थिक वर्षापासून होऊ शकते. क्रिप्टो करन्सीवर 30 टक्के टॅक्स आकारण्यात येणार आहे. तसेच क्रिप्टोबाबतचे नियम आणखी कठोर होण्याची शक्यता आहे.
- पॅन- आधार लिंक – आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. जर आज आधार – पॅन लिंक न केल्यास तुमचे पॅन कार्ड चालूच राहणार आहे. मात्र उद्यापासून आधार, पॅन लिंकिंगसाठी पाचशे रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तर 30 जूननंतर दंडाच्या रकमेत वाढ केली जाणार असून, त्यानंतर आधार, पॅन लिंक करण्यासाठी एक हजारांचा दंड आकारण्यात येईल.