Mutual Fund : अल्पबचतीचा असा ही फायदा, म्हणता म्हणता व्हा लखपती

Mutual Fund : दरमहा केवळ 1000 रुपयांची गुंतवणूक तुम्हाला मालामाल करु शकते. पण किती काळासाठी आणि कुठे ही गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल ते महत्वाचे असते. जर दीर्घकाळ गुंतवणूक केली तर तुम्हाला करोडपती होता येईल.

Mutual Fund : अल्पबचतीचा असा ही फायदा, म्हणता म्हणता व्हा लखपती
Follow us
| Updated on: Mar 07, 2023 | 4:49 PM

नवी दिल्ली : गुंतवणुकीपेक्षा पैसा वाढतो, असे म्हणातात. तो जर तिजोरीतच ठेवला तर पैसा वाढत नाही, उलट तो हळूहळू कमी होतो. त्यामुळे बचत (Saving), गुंतवणूक(Investment) करुन पैसा मोठा करता येतो. अर्थात तुम्हाला फायदा होतो. जर तुम्ही दरमहा काही रक्कम वाचवत असाल तर त्यातील काही रक्कमेची गुंतवणूक नक्की करा. दरमहा केवळ 1000 रुपयांची गुंतवणूक तुम्हाला मालामाल करु शकते. पण किती काळासाठी आणि कुठे ही गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल ते महत्वाचे असते. जर दीर्घकाळ गुंतवणूक केली तर तुम्हाला करोडपती होता येईल. अर्थात त्यासाठी परंपरागत गुंतवणूक योजनेपेक्षा इतर योजनांचा पर्याय निवडावा लागेल. परंपरागत बचत योजना तुम्हाला परतावा देतील. त्यात जोखीम नसेल. पण त्यात मोठी रक्कम उभारता येणार नाही.

सध्या गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड हा चांगला पर्याय समजण्यात येतो. शेअर बाजारावर आधारीत असला तरी या योजनेत तुम्हाला कमी जोखीम आणि अधिकचा परतावा मिळतो. तुम्ही SIP च्या माध्यमातून म्युच्युअल फंडात केवळ 500 रुपयांनी पण गुंतवणुकीची सुरुवात करु शकता. म्युच्युअल फंडात कम्पाऊंडिंगचा फायदा मिळतो. म्हणजेच मूळ रक्कमेत व्याज तर मिळतेच. पण त्या व्याजावर पण व्याज मिळते. साधारणपणे म्युच्युअल फंड कमीत कमी 12 टक्के परतावा हमखास देतो.

म्युच्युअल फंडातही विविध प्रकार आहेत. बचत, कर सवलत, डेट, इक्विटी, हायब्रीड आणि इतर अनेक प्रकार आहेत. त्यातही उपप्रकार आहेत. विविध म्युच्युअल फंड हाऊसेस त्यांच्या योजना बाजारात उतरवितात. त्यानुसार, तुम्हाला तुमच्या गरजेचा फंड निवडून त्यात गुंतवणूक करता येते. कमाई करता येते. काही म्युच्युअल फंड 15 ते 20 टक्क्यांपर्यंत परतावा देतात. तुम्हाला अधिकचा फायदा हवा असेल तर दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर ठरते. जर तुम्ही 15 ते 20 वर्षांपर्यंत गुंतवणूक केली तर ही अल्पबचत तुम्हाला जोरदार फायदा मिळवून देते. लखपतीच नाहीतर करोडपती करते.

हे सुद्धा वाचा

जर तुम्ही दरमहा एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक केली तर करोडपती होऊ शकता. पण त्यासाठी नियमीत बचत करणे, गुंतवणूक करणे आवश्यक आहे. दरमहा 1000 रुपयांची गुंतवणूक केल्यास तुम्ही वर्षाला 12 हजार रुपये गुंतवणूक कराल. जर तुम्ही ही गुंतवणूक सातत्याने 20 वर्षे सुरु ठेवली तर तुम्ही एकूण 2,40,000 रुपये गुंतवणूक कराल. त्यावर 12 टक्के व्याज दर गृहित धरला तर तुम्हाला या बचतीवर 7,59,148 रुपयांचे व्याज मिळेल. पुढील 20 वर्षांत तुम्हाला एकूण 9,99,148 रुपये म्हणजेच 10 लाख रुपये मिळतील.

जर या म्युच्युअल फंडाने 14 टक्के दराने परतावा दिला तर म्यॅच्युरिटीनंतर गुंतवणूकदाराला 13,16,346 रुपये मिळतील. 15 टक्क्यांच्या हिशोबाने म्यॅच्युरिटीवर 15,15,955 रुपये मिळतील. SIP च्या माध्यमातून 1000 रुपयांची मासिक गुंतवणूक करुन तुम्ही 20 वर्षांत कमीत कमी 10 लाख अथवा त्यापेक्षा अधिकचा परतावा मिळू शकतात.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.