Aadhaar Card : आधार करु शकते का घात? बँक खाते होऊ शकते का साफ

Aadhaar Card : आधार भारतीय नागरिकांचा आधार झाला आहे. अनेक ठिकाणी पुरावा म्हणून, योजनांचे लाभ घेण्यासाठी, शैक्षणिक क्षेत्रात, नोकरी आणि अनेक क्षेत्रात आधार कार्डचा वापर होतो. पण खरंच आधार कार्डचा वापर करुन बँक खाते हॅक होऊ शकते का?

Aadhaar Card : आधार करु शकते का घात? बँक खाते होऊ शकते का साफ
Follow us
| Updated on: Aug 27, 2023 | 10:29 AM

नवी दिल्ली | 27 ऑगस्ट 2023 : आधार (Aadhaar Card) हीच भारतीयांची ओळख झाली आहे. आधार कार्डशिवाय आता अनेक ठिकाणी कामे होत नाहीत. आधारच हा भारतीयांच्या ओळखीचा जणू परवाना झाला आहे. बँकेत खाते (Bank Account) उघडण्यापासून ते शेअर बाजारात प्रवेशापर्यंत आधार कार्ड लागते. जन्म दाखल्यासोबतच आता आधार कार्डची मागणी करण्यात येते. नोकरी असो वा अनेक ठिकाणी हाच ओळखीचा पुरावा आहे. अनेक क्षेत्रात आधार जवळपास अनिवार्य झाले आहे. आर्थिक घडामोडीत ही त्याचा वापर होतो. बँक खाते आधार कार्डशी लिंक करणे अनिवार्य झाले आहे. आधार कार्ड लिंक नसेल तर रक्कम काढताना अडचण येते. अनेक आर्थिक उलाढालीत आधाराचा वापर वाढल्याने, त्यापासून धोका तर नसेल ना? आधार कार्ड क्रमांका आधारे हॅकर बँक खाते हॅक (Bank Account Hack) तर करणार नाहीत ना, खात्यातील रक्कम तर कोणी साफ करणार नाही ना, असे अनेक प्रश्न नागरिकांच्या मनात आहे. काय आहेत त्याची उत्तरं

आधार क्रमांकाने खाते होऊ शकते का हॅक

ईटी रिपोर्टनुसार, इंडसंईड बँकेचे अनिल राव यांनी याविषयी माहिती दिली आहे. आधार क्रमांक आता अनेक ठिकाणी वापरण्यात येतो. बँकेच्या खात्याशी पण तो जोडलेला असतो. पण याचा अर्थ तो थेट त्या व्यक्तीच्या बँक खात्यापर्यंत पोहचतो, असे होत नाही. जोपर्यंत ओटीपी, स्कॅनर डिव्हाईसवर बायोमॅट्रिक, फेस आयडी वा आयरिसचा वापर करत नाही, तोपर्यंत ग्राहकांचे खाते सुरक्षित असते.

हे सुद्धा वाचा

पण याचा घेतला गैरफायदा

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार सायबर गुन्हेगारांनी त्यासाठी एक शक्कल लढवली. मालमत्ता खरेदी-विक्री करताना लोकांच्या हाताच्या बोटांचे ठसे घेण्यात येतात. त्याआधारे काही जणांनी फसवणूक केल्याचे आणि रक्कम काढल्याचा घटना समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. 2022 हा प्रकार समोर आला होता. पण त्यासंबंधी पुढील माहिती हाती लागली नाही.

जावे चोराच्या वाटा

सायबर गुन्हेगारांचे फंडे, त्यांचे तंत्रज्ञान, त्यांची काम करण्याची, फसवणुकीचे तंत्र याचा अभ्यास करण्यात आला. सायबर गुन्हेगार सुरक्षेला कसा चकवा देतात याचाच सातत्याने अभ्यास सुरु आहे. त्यातून काही तांत्रिक अपडेट करण्यात आल्या आहेत. सुरक्षा प्रोटोकॉल अपडेट करण्यात आले आहे. जर ग्राहकाने चूक केली नाही तर सायबर भामट्यांना तुमच्या खात्यातून रक्कम चोरता येत नाही.

फिंगरप्रिंटवर पण शोधला उपाय

आधार कार्डच्या डाटामध्ये भारतीयांच्या डोळ्यांची ठेवण, आयरिश आणि हातांचे ठसे घेण्यात आले आहे. या ठशांचा गैर वापर होणार नाही यासाठी UIDAI ने एक खास इन-हाऊस आर्टिफिशिअल इंटेलिजेन्सची सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे अशी फसवणूक लगेच समोर येते.

बायोमॅट्रिक माहिती कशी करणार अपडेट

UIDAI नुसार, तुम्ही आधार कार्डचा उपयोग करत नसाल तर आधार कार्ड लॉकचा पर्याय देण्यात आला आहे. त्याचा वापर करता येईल. ज्यावेळी आधार कार्डचा उपयोग करायचा आहे, त्यावेळी ते अनलॉक करता येते. त्यामुळे त्याचा दुरुपयोग होत नाही.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.