Aadhaar Update : घरातील या व्यक्तीच्या परवानगीशिवाय आधारच्या पत्त्यात होणार नाही बदल, आधार अपडेट करण्यासाठी आला खास नियम

Aadhaar Update : आधार अपडेट करण्यासाठी घरातील या व्यक्तीची परवानगी लागणार आहे.

Aadhaar Update : घरातील या व्यक्तीच्या परवानगीशिवाय आधारच्या पत्त्यात होणार नाही बदल, आधार अपडेट करण्यासाठी आला खास नियम
तरच होईल पत्त्यात बदलImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jan 03, 2023 | 7:22 PM

नवी दिल्ली : आधार कार्डमधील (Aadhaar Card Update) पत्ता अपडेट करण्यासाठी आता घरातील कुटुंब प्रमुखाची (Head of Family) परवानगी घेणे आवश्यक आहे. घरातील ज्येष्ठाच्या परवानगीनेच ऑनलाईन पत्ता अपडेट करता येईल. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) याविषयीचा नियम जाहीर केला आहे. कुटुंब प्रमुखाच्या सहमतीशिवाय यापुढे आधार कार्डमधील पत्ता अपडेट करता येणार नाही. पत्ता अपडेट करण्यासाठी अर्जदारांना 50 रुपये शुल्क द्यावे लागेल. ही संपूर्ण प्रक्रिया एका महिन्याच्या आत पूर्ण होऊन आधारवरील पत्त्यात बदल होईल.

UIDAI ने याविषयीचे अधिकृत निवेदन जाहीर केले आहे. त्यानुसार, अर्जदार आणि त्याच्या कुटुंबातील प्रमुख (HOF) या दोघांचे नाव आणि त्यांच्यातील नातेसंबंध स्थापित होईल असे कागदपत्रं सादर करावे लागतील. त्यानंतर पुढील प्रक्रियेद्वारे आधारचा पत्ता अपडेट करता येईल.

अर्जदाराने पत्ता अद्ययावत करण्यासाठी रेशनकार्ड, गुणपत्रिका, विवाह प्रमाणपत्र, पासपोर्ट यासारखी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण होईल. या कागदपत्रांचा पडताळा झाल्यानंतर कुटुंब प्रमुखाच्या मोबाईलवर ओटीपी (OTP) पाठवण्यात येईल. त्याचे प्रामाणिकरण केल्यानंतर पत्ता अद्ययावत होईल.

हे सुद्धा वाचा

पत्ता अद्ययावत करण्यासाठी हा पर्याय देण्यात आला आहे. कुटुंब प्रमुख अर्जासोबत त्याच्या स्वाक्षरीसह पत्ता बदलण्यासाठी अनुमती देऊ शकतो. प्राधिकरणाच्या निर्णयामुळे देशातील कानाकोपऱ्यात राहणाऱ्या नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने पत्ता बदलता येणार आहे.

आधार पत्ता अपडेट करण्यासाठी निर्धारीत प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. जनतेच्या सुविधेसाठी प्राधिकरणाने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, 18 वर्षावरील कोणत्याही व्यक्तीला कुटुंब प्रमुख म्हणून मान्यता देण्यात आली आहे. विहित प्रक्रियेनुसार नातेवाईकांसोबत पत्ता शेअर करता येतो.

  1. ऑनलाईन पत्ता अपडेट करण्यासाठी अगोदर MY Aadhaar पोर्टल वर जा
  2. पत्ता अपडेट करण्यासाठीचा पर्याय निवडा
  3. कुटुंब प्रमुखाचा आधार क्रमांक टाका
  4. प्रमाणित कागदपत्रे अपलोड करुन त्याचा पडताळा करा
  5. आता अर्जासोबत 50 रुपयांचे शुल्क जमा करा
  6. त्यानंतर SRN कुटुंब प्रमुखांसोबत शेअर करण्यात येईल
  7. कुटुंब प्रमुखाला याविषयीचा एसएमएस पाठविण्यात येईल
  8. 30 दिवसांच्या आत कुटुंब प्रमुखाला परवानगी देता येईल
  9. त्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण होईल

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.