AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aadhaar Card Update: आधारबाबत मोठी बातमी, उरले शेवटचे काही दिवस, नंतर मोजावे लागणार पैसे

Aadhaar Card News: आधार कार्डधारकांसाठी अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी आहे. आधारमध्ये महत्त्वाचे बदल करण्यासाठी शेवटचे काही तास शिल्लक आहेत. त्यानंतर मात्र खिसा रिकामा करावा लागणार आहे.

Aadhaar Card Update: आधारबाबत मोठी बातमी, उरले शेवटचे काही दिवस, नंतर मोजावे लागणार पैसे
aadhar card update last date news
Follow us
| Updated on: Dec 10, 2024 | 12:17 AM

आधार कार्ड प्रमुख आणि महत्त्वाचं ओळखपत्र आहे. जन्मानंतर ते मृत्यपर्यंत प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड जवळपास बंधनकारक आहे. प्रत्येक ठिकाणी ओळखपत्र म्हणून आधार कार्डाची मागणी केली जाते. तसेच बँकेत खातं उघडण्यासाठी आणि शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड पाहिजे म्हणजे पाहिजेच. यावरुन आपल्याला आधार कार्ड किती महत्त्वाचं आहे, हे लक्षात येतं. आधार कार्डबाबत सरकारकडून सातत्याने काही न काही निर्णय घेतले जातात. याच आधार कार्डधारकांसाठी  ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे.

आधार कार्ड अपडेट करुन घेण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक आहे. आधार कार्डधारकांना पुढील काही तासांत मोफत अपडेट करुन घेता येणार आहे. मात्र सरकारने सांगितलेल्या मुदतीनंतर आधार कार्डात अपडेट करण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे नंतर पैसे खर्च करायचे नसतील, तर आताच या संधीचा फायदा घ्या.

नियमांनुसार, दर 10 वर्षानंतर आधार कार्ड अपडेट करावं लागतं. ज्या नागरिकांनी 10 वर्षांपूर्वी आधार कार्ड काढलं होतं, ते आता मोफत अपडेट करु शकतात. नावात आणि फोटोत बदलही मोफत करुन मिळणार आहे. यूआडीएने दिलेल्या माहितीनुसार, 14 डिसेंबरपर्यंत मोफत आधार कार्ड अपडेट करुन घेता येणार आहे. मात्र त्यानंतर नियमांनुसार ठरलेली रक्कम द्यावी लागणार आहे.

नागरिक ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने सोयीनुसार आधार कार्ड अपडेट करु शकतात. नागरिक, फोटो,पत्ता, नाव, लिंग, जन्मतारीख बदलू शकतात. तसेच मोबाईल नंबर आणि इमेल आयडीही अपडेट करु शकतात.

आधार अपडेसाठी डॉक्युमेंट्स

आधार कार्डात तुम्हाला आवश्यक असलेले बदल घर बसल्या करु शकता. तसेच कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊनही बदल करता येतील. मात्र आधार कार्डात बदल करून घेण्यासाठी काही आवश्यक कागदपत्र लागू शकतात. शिधापत्रिका, मतदार ओळखपत्र, पारपत्र आणि अन्य ओळखपत्रांची गरज लागू शकते.

ऑनलाई असा करा बदल

  • यूआईडीएच्या myaadhaar.uidai.gov.in या वेबसाईटवर जा
  • ओटीपी टाकून लॉगिन करा.
  • त्यानंतर प्रोफाईल या टॅबवर क्लिक करा. तुम्हाला हवी असलेली माहिती अपडेट करा.
  • त्यानंतर मागितलेले ओळखपत्र सबमिट करा. ओळखपत्र हे पीडीएफ, पीएनजी आणि जेपीईजी फॉर्मेटमध्ये असायला हवी. तसेच
  • फाईलची साईज किमान 2 एमबी इतकी असावी.
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?.
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश.
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?.
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?.
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.