Aadhaar Card Update : मोफत करा आधारमध्ये बदल! UIDAI ने वाढवली मुदत

Aadhaar Card Update : नागरिकांना फ्रीमध्ये आधार कार्ड अपडेट करता येईल. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने ही सोय केली आहे. त्यासाठी पुन्हा मुदत वाढविण्यात आली आहे. आता या तारखेपर्यंत नागरिकांना आधार कार्डमध्ये मोफत बदल करता येतील. त्यासाठी त्यांना रक्कम खर्च करावी लागणार नाही.

Aadhaar Card Update : मोफत करा आधारमध्ये बदल! UIDAI ने वाढवली मुदत
Follow us
| Updated on: Sep 07, 2023 | 7:02 PM

नवी दिल्ली | 7 सप्टेंबर 2023 : आधार कार्डमध्ये मोफत बदल करण्याची सुविधा केंद्र सरकारने दिलेली आहे. या 14 सप्टेंबर, 2023 पर्यंत ही सोय करण्यात आली होती. 10 वर्षे पूर्ण झालेल्या आधार कार्ड धारकांना या योजनेतंर्गत त्यांचे आधार (Aadhaar Card Update) मोफत अपडेट करता येणार आहे. यापूर्वी केंद्र सरकारने त्यासाठी एक कालमर्यादा निश्चित केली होती. 14 जून पर्यंत आधार अपडेट करण्याची मुदत होती. ती सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली. नागरिकांनी ही मुदत वाढविण्याची पुन्हा मागणी केली. त्यानंतर आता भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने ही मुदत वाढवली आहे. 14 सप्टेंबर नंतर पण नागरिकांना त्यांच्या आधार कार्डमध्ये मोफत बदल करता येतील. आधार कार्डला 10 वर्षे पूर्ण झाले असेल तर नागरिकांनी आधारमधील पत्ता आणि डेमोग्राफिक (Demographic) तपशील अपडेट करणे आवश्यक आहे. अशा नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेणे आवश्यक आहे.

 या तारखेपर्यंत करा मोफत अपडेट

यापूर्वी 14 जून पर्यंत आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची सुविधा देण्यात आली होती. ही मुदत वाढवण्यात आली. ही मुदत या 14 सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली होती. त्यानंतर आता 14 डिसेंबर, 2023 रोजीपर्यंत नागरिकांना myAadhaar पोर्टलच्या माध्यमातून फ्री अपडेट करण्यास परवानगी देण्यात आली आहे. नागरिकांनी या योजनेला जोरदार प्रतिसाद दिला. विनंती केल्याने मुदत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. नागरिकांना myAadhaar वेबसाईटवर आधार दस्तावेजांच्या आधारे मोफत अपडेट करता येईल.

हे सुद्धा वाचा

10 वर्षें उलटल्यास करा बदल

आधार कार्ड अत्यंत आवश्यक पुरावा मानण्यात येतो. अनेक सरकारी आणि गैर सरकारी कामासाठी आधार कार्ड दाखवावे लागते. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण वेळोवेळी आधार कार्ड अपडेटविषयी निर्देश देते. सध्या आधार कार्डला 10 वर्षांपेक्षा अधिकचा कालावधी झाला असेल तर आधार कार्डमध्ये अपडेट मोफत करता येते.

myAadhaar पोर्टलवर अपडेट

myAadhaar पोर्टलवर आधार कार्ड अपडेट करता येते. ऑनलाईन पद्धतीने आधार कार्डमधील माहिती अद्ययावत करता येईल. यापूर्वी 15 मार्च ते 14 जून 2023 त्यानंतर 14 सप्टेंबरपर्यंत आणि आता 14 डिसेंबरपर्यंत अशी मुदत वाढ देण्यात आली आहे.

असे करा आधार कार्ड अपडेट

  • UIDAI च्या https://myaadhaar.uidai.gov.in/ वर जा
  • अथवा https://ssup.uidai.gov.in/ssup/ यावर लॉगिन करा
  • 12 अंकांचा आधार कार्ड क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकून लॉगिन व्हा
  • ओटीपीचा पर्याय निवडा, पुढील प्रक्रिया करा
  • आधार संबंधीत मोबाईल क्रमांकावर हा ओटीपी येईल
  • ओटीपी टाकून ‘अपडेट आधार ऑनलाइन’ हा पर्याय निवडा
  • ‘प्रोसीड टू अपडेट आधार’ हा पर्याय निवडा, माहिती भरा
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.