…तर तुमचं आधारकार्ड बनावट असू शकतं, UIDAI कडून महत्त्वाच्या सूचना जारी
Aadhar Card | तुम्ही UIDAI च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुमचा 12 अंकी आधार क्रमांक खरा किंवा खोटा आहे, याची पडताळणी करु शकता. याशिवाय, व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही MAadhaar App चा वापरही करु शकता.
मुंबई: सध्याच्या काळात अगदी सीमकार्ड, रेशनकार्डपासून ते जवळपास प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी आधारकार्ड ही अनिवार्य गोष्ट आहे. आधार कार्डाचे महत्त्व वाढल्याने त्यामध्ये फसवणुकीचे प्रमाणही वाढले आहे. या पार्श्वभूमीवर UIDAI कडून काही महत्त्वपूर्ण सूचना जारी करण्यात आल्या आहेत. तुमच्या आधार कार्डावर केवळ 12 अंकी क्रमांक नमूद केला आहे म्हणून समाधानी राहू नका. हा क्रमांकही बनावट असू शकतो. त्यामुळे आधार कार्डाच्या माध्यमातून कोणतीही फसवणूक टाळण्यासाठी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.
तुम्ही UIDAI च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुमचा 12 अंकी आधार क्रमांक खरा किंवा खोटा आहे, याची पडताळणी करु शकता. याशिवाय, व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही MAadhaar App चा वापरही करु शकता.
आधार कार्डाची पडताळणी कशी कराल?
* सर्वप्रथम uidai.gov.in/verify या थेट लिंकवर लॉगिन करा. * पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला समोर टेक्स्ट बॉक्स दिसेल. त्यामध्ये तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाका. * त्यानंतर कॅप्चा कोड टाका. * यानंतर व्हेरिफाई बटणावर क्लिक करा. * तुमचा आधार क्रमांक योग्य असल्याचा एक मेसेज पेजवर डिस्प्ले होईल. त्यामध्ये नमूद केलेल्या आधार क्रमांकाची पडताळणी करुन घ्या. * याशिवाय, तुमचा खासगी तपशीलही या पेजवर दिसेल.
पॅनकार्ड कसे जोडाल आधार कार्डशी?
– आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइट incometaxindiaefiling.gov.in वर लॉगिन करा.
– इथे तुम्हाला आधार लिंक करण्याचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
– त्यानंतर तुमचा पॅन नंबर, आधार क्रमांक, तुमचे नाव खाली असलेल्या बॉक्समध्ये भरा.
– यानंतर कॅप्चा कोड काळजीपूर्वक पाहा आणि बॉक्समध्ये भरा.
– सर्व माहिती भरल्यानंतर आधारशी लिंक अशा पर्यायावर क्लिक करा.
इतर बातम्या :
महागाईचा भडका, इंधनदरवाढीपाठोपाठ खाद्यतेलाच्या किंमती गगनाला, दर काय?
लाखभर पगार असूनही बचत शून्य, जाणून घ्या गुंतवणूकीच्या सोप्या टिप्स
मॅनेजमेंट बदलताच ‘या’ कंपनीचे शेअर होल्डर्स मालामाल, एका शेअरची किंमत 100 रुपयांहून कमी