पीएफ खात्यातून अ‍ॅडव्हान्स पैसे काढायचा विचार करताय, जाणून घ्या निर्णय योग्य की अयोग्य?

PF Account | कोरोना संकटामुळे सध्या अनेकांची आर्थिक अवस्था बिकट झाली आहे. नोकऱ्या कशाबशा वाचलेले कर्मचारीही वाढीव खर्चामुळे मेटाकुटीस आले आहेत. अशावेळी कोरोना किंवा अन्य कोणत्या आजारामुळे रुग्णालयात दाखल व्हायची वेळ आली तर हा खर्च कसा भागवायचा, असा प्रश्न उभा राहतो.

पीएफ खात्यातून अ‍ॅडव्हान्स पैसे काढायचा विचार करताय, जाणून घ्या निर्णय योग्य की अयोग्य?
पीएफ खाते
Follow us
| Updated on: Sep 17, 2021 | 7:48 AM

नवी दिल्ली: कोरोना विषाणूच्या संकटादरम्यान, EPFO ​​ने पीएफ खात्यामधील पैसे काढण्याशी संबंधित नियम बदलले आहेत. यापूर्वी पीएफधारक केवळ अत्यंत निकडीच्या प्रसंगीच पीएफ खात्यातून पैसे काढू शकत होते. हे पैसे खात्यात येण्यासही बराच वेळ लागत असे. आता ईपीएफओने काही नियम बदलले आहेत, त्यानंतर पीएफधारक इतर परिस्थितींमध्येही पैसे काढू शकतात आणि त्यांचा दावाही लवकरच निकाली काढला जातो.

EPFO ने खातेधारकांना PF अॅडव्हान्स काढण्याचा पर्याय दिला आहे. जेणेकरून त्यांना कोरोना कालावधीत खात्यातून सहज पैसे काढता येतील. ही सुविधा ज्यांच्या कुटुंबातील कोरोना संक्रमित आहे किंवा कोरोनामुळे ज्यांच्यावर आर्थिक संकट ओढावले आहे, अशा लोकांसाठी आहे . अशा परिस्थितीत, जाणून घ्या कोणत्या परिस्थितीत पीएफ अॅडव्हान्स काढता येईल आणि खातेदार किती पैसे काढू शकतो.

काय आहे पीएफ अ‍ॅडव्हान्स

कोरोना संकटामुळे सध्या अनेकांची आर्थिक अवस्था बिकट झाली आहे. नोकऱ्या कशाबशा वाचलेले कर्मचारीही वाढीव खर्चामुळे मेटाकुटीस आले आहेत. अशावेळी कोरोना किंवा अन्य कोणत्या आजारामुळे रुग्णालयात दाखल व्हायची वेळ आली तर हा खर्च कसा भागवायचा, असा प्रश्न उभा राहतो. यासाठी आता भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात EPFO कर्मचाऱ्यांच्या मदतीला धावून आली आहे.

त्यामुळे तुम्ही आता आजारपणाच्यावेळी गरज लागल्यास PF खात्यामधून आगाऊ रक्कम काढू शकता. विशेष म्हणजे यासाठी रुग्णालयाचे बिलही सादर करण्याची गरज नाही. केवळ एक विनंतीचा अर्ज सादर करून तुम्ही हे पैसे मिळवू शकता. या अर्जात आजार आणि रुग्णालयाची संपूर्ण माहिती नमूद करावी लागेल. पीएफ खातेधारक स्वत:साठी आणि कुटुंबातील व्यक्तींसाठी पैसे घेऊ शकतो. यापूर्वी रुग्णालयाचे बिल दाखवल्यानंतरच पीएफ खात्यामधून आगाऊ रक्कम काढता येत होती. मात्र, आता केवळ एक अर्ज दिल्यानंतर काही तासांमध्ये तुमच्या खात्यात पैसे ट्रान्सफर होतात. या सुविधेमुळे पीएफ खातेधारकांना मोठा दिलासा मिळाला होता.

पीएफ खात्यामधून अ‍ॅडव्हान्स काढणे योग्य आहे का?

जाणकारांच्या सल्ल्यानुसार, पैशांची खूपच गरज असेल तर पीएफ खात्यामधून अ‍ॅडव्हान्स काढावा.जर तुम्हाला उपचारासाठी पैसे हवे असतील तर तुम्ही पैसे काढू शकता. परंतु, जर तुम्हाला यावेळी पैसे काढायचे असतील आणि ते इतरत्र गुंतवायचे असतील तर तो चुकीचा निर्णय ठरू शकतो. एकदा तुम्ही खात्यातून पैसे काढले की तुम्हाला सेवानिवृत्तीपर्यंत खूप नुकसान होते.

संबंधित बातम्या:

आजारपणाच्यावेळी खर्चासाठी PF खात्यातील पैसे काढण्याची मुभा, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

नोकरदारासांठी मोठी बातमी, EPFO 6 कोटी खातेधारकांना ‘या’ कारणामुळे पैसे पाठणार

नोकरदारांसाठी महत्वाची बातमी; सरकारच्या निर्णयामुळे PF खातेधारकांना होणार मोठा फायदा

मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.