Fuel Price: पेट्रोल-डिझेल झालं, मग CNG ही झाला, आता विमानाचं इंधनही महागलं

Fuel Price | या इंधन दरवाढीमुळे आता विमानाच्या प्रत्येक फेरीच्या खर्चात वाढ होणार आहे. भारतात ATF चे दर वाढल्यास ते परदेशातून आयात केले जाते. मात्र, सध्या कोरोना निर्बंधांमुळे आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास बंद असल्यामुळे हा पर्यायही आपसूकच बंद झाला आहे.

Fuel Price: पेट्रोल-डिझेल झालं, मग CNG ही झाला, आता विमानाचं इंधनही महागलं
एअर इंडिया
Follow us
| Updated on: Jul 24, 2021 | 12:09 PM

मुंबई: एकीकडे पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले असताना विमान इंधनाचाही भडका उडाला आहे. गेल्या महिनाभरात एव्हिएशन टर्बाइन फ्युएलचे (ATF) दर जवळपास 9.30 टक्क्यांनी वाढले आहेत. परिणामी विमान प्रवास आणखी महागण्याची शक्यता आहे. जून महिन्यात विमानाच्या इंधनाचा दर 62,279 रुपये किलोलीटर इतका होता. जुलै महिन्यातील 15 तारखेपर्यंत हा दर 68064 रुपये किलोलीटर इतका झाला. जानेवारी महिन्यात इंधनाचा दर 49084 रुपये किलोलीटर इतका होता.

या इंधन दरवाढीमुळे आता विमानाच्या प्रत्येक फेरीच्या खर्चात वाढ होणार आहे. भारतात ATF चे दर वाढल्यास ते परदेशातून आयात केले जाते. मात्र, सध्या कोरोना निर्बंधांमुळे आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास बंद असल्यामुळे हा पर्यायही आपसूकच बंद झाला आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार यामध्ये हस्तक्षेप करणार किंवा विमान कंपन्यांकडून तिकीटांच्या दरात वाढ केली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सीएनजीच्या दरातही वाढ

गेल्याच आठवड्यात मुंबईत सीएनजी गॅसच्या दरात वाढ झाली होती. हानगर गॅसकडून सीएनजी गॅसच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार CNG च्या दरात प्रतिकिलो 2 रुपये 58 पैसे आणि घरगुती गॅसच्या दरात प्रतियुनिट 55 पैशांची वाढ करण्यात आली आहे. महानगर गॅसच्या एक किलो सीएनजीसाठी आता 51.98 रुपये मोजावे लागतील. तर पाईप गॅसच्या स्लॅब 1 साठी 30.40 रुपये प्रतियुनिट आणि स्लॅब 2 साठी 36 रुपये प्रतियुनिट इतकी किंमत असेल.

पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत सीएनजी हे इंधन स्वस्त आहे. मुंबईत सध्या एका लीटर पेट्रोलसाठी 107.20 रुपये आणि डिझेलसाठी 97.29 रुपये मोजावे लागत आहेत. पेट्रोलच्या तुलनेत सीएनजी 67 टक्के तर डिझेलच्या तुलनेत 47 टक्के स्वस्त आहे.

संबंधित बातम्या:

देशातील पेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्याकडे जाणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?

…म्हणून मोदी सरकार इंधनावरील कर कमी करण्यासाठी अनुत्सुक?

पेट्रोल-डिझेल पाठोपाठ आता सीएनजीच्या किंमतीही भडकल्या, पाहा किलोमागे किती रुपयांची वाढ…

(Aeroplane ATF fuel price increases in India)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.