मार्केट ट्रॅकर : नव्या वर्षातला पहिला आयपीओ बाजारात, इश्यू प्राईस ते लिस्टिंग जाणून घ्या!

कंपनीने अँकर गुंतवणुकदारांद्वारे 204 कोटी रुपये उभारले. एजीएस ट्रान्झॅक्ट टेक्नॉलॉजीच्या आयपीओचे उद्दिष्ट बाजारातून 680 कोटी रुपये उभारणीचे आहे. सध्या शेअर प्रीमियम वर सुरू आहे.

मार्केट ट्रॅकर : नव्या वर्षातला पहिला आयपीओ बाजारात, इश्यू प्राईस ते लिस्टिंग जाणून घ्या!
IPO - आयपीओ
Follow us
| Updated on: Jan 19, 2022 | 7:28 PM

नवी दिल्ली – गेलयावर्षी प्रमाणे यंदाही गुंतवणूक विश्वात आयपीओची बूम राहण्याची शक्यता आहे. यंदाच्या वर्षीचा पहिला आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी (IPO SUBSCRIPTION) खुला करण्यात आला आहे. एजीएस ट्रान्झॅक्ट टेक्नॉलॉजीचा (AGS TECHNOLOGY) आयपीओ 21 जानेवारीला बंद होईल. गुंतवणुकदारांचा चांगला प्रतिसाद आयपीओला मिळाला आहे. काही तासांतच 66 टक्क्यांचे उद्दिष्ट आयपीओनं गाठलं आहे. एजीएस ट्रान्झॅक्टचे शेअर्सची किंमत 166 ते 175 रुपये आहे. येत्या 1 फेब्रुवारीला शेअर बाजारात सूचीबद्ध (लिस्ट) होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) कंपनीने अँकर गुंतवणुकदारांद्वारे 204 कोटी रुपये उभारले. एजीएस ट्रान्झॅक्ट टेक्नॉलॉजीच्या आयपीओचे उद्दिष्ट बाजारातून 680 कोटी रुपये उभारणीचे आहे. सध्या शेअर प्रीमियम वर सुरू आहे. इश्यू किंमतीपेक्षा 10 रुपयांहून अधिक किंमतीला सध्या व्यवहार सुरू आहे. रिटेल सबस्क्रिप्शनमध्ये (RETAIL SUBSCRIPTION) तब्बल 92 टक्के सबस्क्रिप्शन पूर्ण झाले आहेत.

महानगर ते दुर्गम विस्तार:

एजीएसद्वारे कॉर्पोरेट आणि बँकांना कॅश व डिजिटल सेवांबाबतची मदत पुरविली जाते. महानगरापासून ते दुर्गम भागातील एटीएममध्ये एजीएसद्वारे पैसे टाकले जातात. देशभरात एजीएस ट्रान्झॅक्ट टेक्नॉलॉजी लिमिटेडने 2 लाख 7 हजार 335 पेमेंट टर्मिनल उभारले आहेत. एटीएम आणि कॅश रिसायकलर मशीन (सीआरएम) आऊटसोर्सिंग आणि कॅश मॅनेजमेंट सारख्या कस्टमाईज्ड प्रॉडक्ट्स आणि सेवांचा समावेश आहे.

वर्ष 2022 आयपीओचं!

वर्ष 2021 नंतर 2022 मध्ये आयपीओची सर्वोत्तम कामगिरी राहण्याची शक्यता आहे. कोटक महिंद्रा कॕपिटलने आगामी वर्षात 2 लाख कोटी गोळा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. एका अहवालानुसार, पुढील वर्षात आयपीओचे 15 अरब डॉलरचे प्रस्ताव यापूर्वीच सेबीकडे दाखल झाले आहेत. तर 11 अरब डॉलरचे लवकर प्राप्त होण्याची शक्यता आहे.

गुंतवणुकदारांचा ‘सर्वोच्च’ प्रतिसाद!

एका अहवालानुसार, वर्ष 2021 मध्ये 59 कंपनीच्या आयपीओ पैकी 36 कंपन्यांना दहा पट सबस्क्रिप्शन मिळाले आहे. त्यापैकी 6 कंपन्यांच्या आयपीओला 100 पटी पर्यंत सबस्क्रिप्शन मिळाले. 8 आयपीओला तीन पट आणि उर्वरित 15 कंपन्यांच्या आयपीओला तीन पटीपर्यंत सबस्क्रिप्शन मिळाले आहे. सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आयपीओला रिटेल गुंतवणूकदारांची सर्वाधिक पसंती दिली आहे. एकूण इश्यू मध्ये रिटेलचा हिस्सा 10 पटीहून अधिक आहे.

आयपीओ म्हणजे काय?

आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक आॕफर. मार्केटमध्ये पैसे गोळा/उभारण्याचा मार्ग आहे. कंपनीला पैशाची आवश्यकता असते. तेव्हा शेअर बाजारपेठेत लिस्ट केले जातात. आयपीओ द्वारे मिळणारी रक्कम कंपनी स्वतःच्या निर्णयानुसार खर्च करतात. या रकमेचा वापर कंपनी लोन भरण्यासाठी किंवा कंपनीच्या फायद्यासाठी वापरली जाऊ शकते.स्टॉक एक्स्चेंज वर शेअर्स लिस्टिंगमुळे कंपनीला आपल्या शेअरला योग्य किंमत मिळविण्यासाठी मदत होते.

संबंधित बातम्या :

Gold Price Today : दिल्लीत सोन्याची घौडदोड, पन्नास हजारांचा टप्पा पार, महाराष्ट्रातील प्रमुख शहरात काय भाव ?

शेअर बाजारात घसरणीचे सत्र: सेन्सेंक्समध्ये 656 अंकांची घसरण, निफ्टी 18 हजारांखाली

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.