Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Akshya Tritiya 2022: अशी सोन्यासारखी संधी पुन्हा नाही; Google Pay वर खरेदी-विक्री करा सोने

साडेतीन मुहुर्तांपेकी एक असलेल्या अक्षय तृतीयाच्या मुहुर्तावर तुम्हाला सोने खरेदीची सुवर्ण संधी मिळत आहे, ती ही घरबसल्या. गुगल पेच्या साहाय्याने तुम्ही डिजिटल सोने खरेदी करु शकता. हे सोने 99.99 टक्के शुद्ध असते ाणि 24 कॅरेट इतके शुद्ध मिळते. काही प्रक्रिया पूर्ण करुन तुम्ही संधीचे सोन्यात रुपांतर करु शकता

Akshya Tritiya 2022: अशी सोन्यासारखी संधी पुन्हा नाही; Google Pay वर खरेदी-विक्री करा सोने
सोन्यात गुंतवणूक कशी करावी?Image Credit source: wallpaperflare.com
Follow us
| Updated on: Apr 27, 2022 | 10:13 AM

साडेतीन मुहुर्तांपेकी एक असलेल्या अक्षय तृतीयाच्या (Akshya Tritiya) मुहुर्तावर तुम्हाला सोने खरेदीची (Gold Buy) सुवर्ण संधी मिळत आहे, देशात दसरा, दिवाळी आणि अक्षय तृतीयेला सोने खरेदीला शुभ मानण्यात येते. भारतीय संस्कृतीत या सणांना अनन्यसाधारण महत्व आहे. या दिवशी सोन्याची केलेली खरेदी ही धन वृद्धी करणारी मानण्यात येते. त्यामुळे वर्षातून निदान या सणाच्या काळात सोन्यात थोडी का असेना वाढ करण्याचा प्रयत्न भारतीय करतात. कोरोनाच्या काळात ऑनलाईन खरेदीला (Online Shopping) महत्व प्राप्त झाले आहे. गुगल पेच्या (Google Pay) साहाय्याने तुम्ही डिजिटल सोने (Digital Gold) खरेदी करु शकता. हे सोने 99.99 टक्के शुद्ध असते ाणि 24 कॅरेट इतके शुद्ध मिळते. काही प्रक्रिया पूर्ण करुन तुम्ही संधीचे सोन्यात रुपांतर करु शकता

मोबाईल वॅलेटमधून ही तुम्ही सोन्याची खरेदी करु शकता

डिजिटल गोल्ड तुम्ही ऑनलाईन खरेदी करु शकता. जशी खरेदी करु शकता तसेच ऑनलाईन पद्धतीनेच त्याची विक्री करता येते. डिजिटल सोन्यामध्ये गुंतवणूकदार 24 कॅरेट शुद्ध सोन्याची खरेदी करतो. हे सोने सुरक्षित ठेवण्यात येते आणि त्याला विम्याचे संरक्षणही असते. डिजिटल सोन्यातील गुंतवणूकही 1 रुपयापासून सुरू करता येईल. डिजिटल सोने खरेदी केल्यावर, खरेदीदाराला वैयक्तिक सुरक्षा वॉलेट मिळते ज्याचा विमा देखील काढता येतो. विशेष बाब म्हणजे बाजारभावानुसार या डिजिटल सोन्याचे रोखीत अथवा ख-या सोन्यात कधीही परतावा मिळविता येतो.

गुगल पेच्या (Google Pay) साहाय्याने तुम्ही डिजिटल सोने (Digital Gold) खरेदी करु शकता. हे सोने 99.99 टक्के शुद्ध म्हजे 24 कॅरेट इतके शुद्ध असल्याचा दावा गुगल पे करते. हे सोने एमएमटीसी-पीएएममार्फत (https://www.mmtcpamp.com) खरेदी -विक्री करण्यात येते. ते या संस्थेकडे सुरक्षित ठेवण्यात येते. तसेच त्यावर योग्य परतावा पण मिळतो. तर चला जाणुन घेऊयात या सोन्याची खरेदी-विक्री कशी करतात ते…

कशी कराल सोन्याची खरेदी

-गुगल पे अॅप्लिकेशन उघडा -नवीन मेेन्यूवर क्लिक करा -सर्चमध्ये गोल्ड लॉकर असे टाईप करा, तो शब्द शोधा -गोल्ड लॉकर हा पर्याय निवडा -खरेदी करा हा पर्याय निवडा. या ठिकाणी सोन्याचा सध्याचा बाजारभाव करांसहित तुमच्या समोर दिसेल

खरेदी करताना ही किंमत 5 मिनिटांकरीता स्थिर राहते. या व्यासपीठावर सोन्याच्या किंमतीत सातत्याने दिवसभर चढउतार होत असतात. जेवढे तुम्ही सोने खरेदी कराल, त्याला भारतीय रुपयांत चिन्हांकित करता येते. त्यानंतर रक्कम अदा करण्यासाठी चलनाची निवड करुन पुढील प्रक्रिया पुर्ण करा. व्यवहार पूर्ण झाल्यानंतर काही मिनिटातच सोने तुमच्या लॉकरमध्ये जमा झालेले दिसेल. अशीच प्रक्रिया तुम्हाला सोन्याची विक्री करताना पूर्ण करावी लागेल.

भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर
भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर.
आसावरी जगदाळेंनी शरद पवारांना सांगितला थरारक अनुभव
आसावरी जगदाळेंनी शरद पवारांना सांगितला थरारक अनुभव.
..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव
..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव.
पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक
पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक.
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या.
हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट
हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट.
आमच्या भावना, संवेदना सरकार सोबत; पहलगामवर संजय राऊतांची प्रतिक्रिया
आमच्या भावना, संवेदना सरकार सोबत; पहलगामवर संजय राऊतांची प्रतिक्रिया.
शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन
शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन.
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक.
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल.