अ‍ॅमेझॉन देत आहे 10 हजार रुपयांपर्यंत गिफ्ट व्हाऊचर; बस्स.. तुम्हाला फक्त ‘ही’ किरकोळ प्रक्रिया करावी लागेल

जर 30 ऑगस्ट 2021 पर्यंत लोन जारी केले जात असेल तर ग्राहकाला अ‍ॅमेझॉनकडून मोफत गिफ्ट व्हाऊचर दिले जाईल, हे गिफ्ट व्हाऊचर 10 हजार रुपयांपर्यंतचे असेल. हे अ‍ॅमेझॉनकडून देण्यात येणारे एक हटके आणि शानदार गिफ्ट व्हाऊचर आहे.

अ‍ॅमेझॉन देत आहे 10 हजार रुपयांपर्यंत गिफ्ट व्हाऊचर; बस्स.. तुम्हाला फक्त 'ही' किरकोळ प्रक्रिया करावी लागेल
अ‍ॅमेझॉन देत आहे 10 हजार रुपयांपर्यंत गिफ्ट व्हाऊचर
Follow us
| Updated on: Jul 17, 2021 | 5:23 PM

नवी दिल्ली : लिमिटेड आणि एक्सक्लुसिव्ह ऑफरच्या अधीन अ‍ॅमेझॉन 10 हजार रुपयांपर्यंत गिफ्ट व्हाऊचर मोफत देत आहे. या ऑफरची मुदत 22 जुलैपर्यंत आहे. तुम्हाला जर या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर बजाज हाऊसिंग फायनान्सच्या वेबसाइटवर जावे लागेल. तिथे होम लोनसाठी अप्लाय करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला मोफत गिफ्ट व्हाऊचर मिळू शकेल. जर 30 ऑगस्ट 2021 पर्यंत लोन जारी केले जात असेल तर ग्राहकाला अ‍ॅमेझॉनकडून मोफत गिफ्ट व्हाऊचर दिले जाईल, हे गिफ्ट व्हाऊचर 10 हजार रुपयांपर्यंतचे असेल. हे अ‍ॅमेझॉनकडून देण्यात येणारे एक हटके आणि शानदार गिफ्ट व्हाऊचर आहे. (Amazon is offering gift vouchers up to Rs 10,000, only do this process)

ग्राहकाला सर्वात आधी बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या वेबसाइटवर जावे लागेल. तिथे होम लोनसाठी अर्ज करणे बंधनकारक आहे. या ऑफरचा फायदा घेण्यासाठी कर्ज अर्जासाठी दोन प्रकारच्या अटीसुद्धा ठेवण्यात आल्या आहेत. पहिल्या अटीनुसार, कर्जासाठी केले जाणारा अर्ज 21 जून 2021 ते 22 जुलै 2021 या कालावधीत करणे गरजेचे आहे. दुसरी अट म्हणजे कर्जाचे वितरण 30 ऑगस्ट 2021 पूर्वी करणे आवश्यक आहे.

50 लाख रुपयांच्या कर्जावर मिळणार 5000 रुपयांचे गिफ्ट व्हाऊचर

ग्राहकाने जर 50 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतले असेल, तर त्या ग्राहकाला 5000 रुपयांपर्यंतचे गिफ्ट व्हाऊचर मिळू शकेल. जर कोणी 50 लाखांहून अधिक रुपयांपर्यंत गृह कर्ज घेतले असेल तर त्या ग्राहकाला 10 हजार रुपयांचे गिफ्ट व्हाऊचर मिळेल. तसेच बजाज हाऊसिंग फायनान्सच्या होम लोनवर किमान व्याजदर 6.75 टक्के असेल.

एआयच्या मदतीने आपल्यासाठी निवडा सर्वोत्तम गृह कर्ज

स्वतःचे हक्काचे घर खरेदी करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते. या स्वप्नपूर्तीसाठी बँक व इतर आर्थिक पुरवठा संस्थांकडून मिळणाऱ्या कर्जाची गरज लागतेच. अशावेळी आपल्या स्वप्नाच्या घर खरेदीसाठी सर्वात उत्तम गृह कर्जाचा पर्याय निवडणे हे एक अत्यंत जटिल काम असते. जर तुम्हीसुद्धा गृह कर्जासंबंधी विविध प्रश्नांनी चिंतेत असाल तर इकडे आवर्जून लक्ष द्या. आपणाला याबाबत चिंता करण्याची गरज नाही. ईजीलो नावाची फिनटेक स्टार्ट-अप यात तुम्हाला मोठी मदत करीत आहे. या फिनटेक स्‍टार्ट-अपने अलीकडेच एक खास अँप लॉन्‍च केले आहे.

या माध्यमातून तुम्हाला हाउसिंग फायनान्सची आवश्यक अशी खूप माहिती अगदी सहजरित्या मिळू शकेल. स्‍टार्टअपचा दावा आहे कि संपूर्ण हाउसिंग फायनान्स इंडस्‍ट्रीमध्ये आपले अँप एक विशिष्ट प्रकारचे पहिले अँप आहे. या हटके प्लॅटफॉर्मवर आर्टिफिशियल इंटेलीजेंस टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून घर खरेदीदारांची चांगली मदत केली जात आहे. या प्लॅटफॉर्मवर केवळ घर खरेदीदारच नव्हे तर विकासक आणि घर विक्रेत्यांसाठीही अनेक प्रकारच्या सुविधा आहेत. (Amazon is offering gift vouchers up to Rs 10,000, only do this process)

इतर बातम्या

Ducati Multistrada V4 भारतात लाँचिंगसाठी सज्ज, बुकिंग्स सुरु

प्रत्येक भेटीत राजकारण का काढता?; पवार-मोदी भेटीवर संजय राऊतांचा सवाल

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.