आता बिटकॉईन वापरुन ऑनलाईन शॉपिंग करा; Amazon कडून लवकरच क्रिप्टोकरन्सीतील व्यवहारांना सुरुवात

Amazon bitcoin | ऑनलाईन विश्वाला क्रिप्टोकरन्सीसारख्या वैश्विक चलनाची गरज आहे. आमचं लक्ष हे बिटकॉईन असेल. कारण या माध्यमातून जगातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचता येईल, असे ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी यांनी म्हटले होते.

आता बिटकॉईन वापरुन ऑनलाईन शॉपिंग करा; Amazon कडून लवकरच क्रिप्टोकरन्सीतील व्यवहारांना सुरुवात
अ‍ॅमेझॉन
Follow us
| Updated on: Jul 26, 2021 | 7:19 AM

मुंबई: बिटकॉईन आणि अन्य क्रिप्टोकरन्सीचा वाढता वापर पाहता अ‍ॅमेझॉन कंपनीकडून आता ग्राहकांना बिटकॉईन किंवा तत्सम क्रिप्टोकरन्सीचा वापर करून व्यवहार करण्याची मुभा देण्यात येणार आहे. अ‍ॅमेझॉनकडून सध्या पेमेंट टीमसाठी डिजिटल करन्सी आणि ब्लॉकचेन एक्सपर्टची भरती केली जात आहे. कंपनीचे यासंबंधीचे धोरण विकसित करण्यासाठी अ‍ॅमेझॉन सध्या या क्षेत्रातील जाणकार नेतृत्वाच्या शोधात आहे.

यापूर्वी अ‍ॅपल कंपनीने मे महिन्यात डिजिटल करन्सीचे ज्ञान असलेल्या बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर या पदासाठी भरती सुरु केली होती. या व्यक्तीने डिजिटल वॉलेट, बीएनपीएल, फास्ट पेमेंटस, क्रिप्टोकरन्सी आणि तत्सम पर्याय विकसित करण्यासाठी काम करणे अपेक्षित होते. याशिवाय, ट्विटर आणि टेस्ला या कंपन्यांनी क्रिप्टोकरन्सी हे भविष्य असल्याचे संकेत दिले आहेत. ऑनलाईन विश्वाला क्रिप्टोकरन्सीसारख्या वैश्विक चलनाची गरज आहे. आमचं लक्ष हे बिटकॉईन असेल. कारण या माध्यमातून जगातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचता येईल, असे ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी यांनी म्हटले होते.

आरबीआय लवकरच आणतेय डिजीटल चलन

रिझर्व्ह बँकही आपले स्वत:चे डिजिटल चलन बाजारात आणणार आहे. आरबीआय हे चलन टप्प्याटप्प्याने पद्धतीने लाँच करणार आहे. देशातील परकीय चलन विनिमय नियम आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील बदल लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवारी रात्री आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर टी रविशंकर यांनी याबाबत माहिती दिली. आरबीआयच्या योजनेबाबत माहिती देताना ते म्हणाले, सार्वभौम हमीचे डिजिटल चलन आल्यानंतर अर्थव्यवस्थेतील रोख रकमेचे प्रमाण कमी होईल. यासह सामान्य लोकदेखील खाजगी चलनाद्वारे होणारे नुकसान टाळू शकतील.

आरबीआयच्या वार्षिक अहवालात उल्लेख

यंदा रिझर्व्ह बँकेने चलन आणि फायनान्ससंबंधी आपल्या वार्षिक अहवालात डिजीटल चलनाचा उल्लेख केला होता. केंद्रीय बँकेच्या नेतृत्वाखाली डिजीटल चलन लॉन्च केले जाऊ शकते. जेणेकरून थेट हस्तांतरणाद्वारे बिगरआर्थिक व्यवहार आणि आर्थिक समन्वयाचे काम पूर्ण केले जाऊ शकते. या अहवालात असे म्हटले होते की, व्याज दरयुक्त डिजिटल फिएटच्या मदतीने धोरणात्मक व्याजदराच्या आघाडीवर अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत मिळेल. विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये चलन स्वरूपात मोठ्या प्रमाणात भांडवलाची गुंतवणूक अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते. यामुळे केंद्रीय बँकेच्या सरकारी सिक्युरिटीजवरील ताणही कमी होईल.

Raj Kundra Controversy : बिटकॉईन घोटाळ्यापासून ते आयपीएल मॅच फिक्सिंगपर्यंत, राज कुंद्राभोवती नेहमीच वादाचं वलय!

इतर बातम्या:

चालू आर्थिक वर्षात सोन्याच्या आयातीत 3.3 टक्के घट, व्यापार तूट कमी करण्यास मदत

Gold: अबब! कोरोनाच्या संकटकाळातही भारतात इतक्या टन सोन्याची आयात

Gold: देशात एप्रिल-मे महिन्यात सोन्याची प्रचंड आयात; भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका

Non Stop LIVE Update
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.