नोकरी बदलली तरी जुने सॅलरी अकाउंट सुरुच, ही बातमी तुमच्यासाठी, अन्यथा बसेल भुर्दंड

तीन महिन्यांपर्यंत पगाराची रक्कम सॅलरी अकाउंटमध्ये जमा न झाल्यास त्याचे रुपांतर हे सेव्हिंग अकाउंटमध्ये होत असते. नियमांनुसार, सेव्हिंग अकाउंटमध्ये महिन्याला सरासरी 500 ते 10 हजारांपर्यंत शिल्लक असणे आवश्‍यक असते.

नोकरी बदलली तरी जुने सॅलरी अकाउंट सुरुच, ही बातमी तुमच्यासाठी, अन्यथा बसेल भुर्दंड
प्रातिनिधीक फोटोImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 8:40 AM

नवी दिल्ली : आयटीसह तत्सम अनेक क्षेत्रांमध्ये पगारवाढ किंवा अशा अनेक कारणांसाठी नोकरी बदलली जात असते. अनेकदा नोकरी बदलल्यावर आपण जुने सॅलरी अकाउंट (salary account) बंद करीत नाही. काही महिन्यानंतर आपण पुन्हा त्या बँकेत आपले खाते तपासण्यासाठी गेले असताना आपल्याला बँकेत काही रक्कम भरायला सांगितली जाते. असे अनेकांसोबत होते, परंतु यामागे बँकेचे काय नियम आहे, हे एका उदाहरणाने समजून घेउया… आयटी अभियंता अजय हैदराबादहून तीन वर्षांनी पुन्हा गुरुग्रामला परतला, त्यानंतर जुन्या खात्याची माहिती घेण्यासाठी बँकेत पोहोचला. व्यवस्थापकाने त्याला सहा हजार रुपये (Six thousand) जमा करण्यास सांगितल्यावर तो गोंधळात पडला. त्याचा पगार आता या बँकेत जाणार आहे. आणि त्यात दुसरे खाते उघडता येत नाही. ही समस्या केवळ अजयची नाही. जे वारंवार नोकरी बदलतात (change job) आणि जुने सॅलरी अकाउंट बंद करत नाहीत, त्यांना अशा प्रकारच्या समस्येला सामोरे जावे लागते. अजयला समजत नाही की गुरुग्राम सोडताना त्याच्या खात्यात 1200 रुपये जमा झाले होते, मग बँक आणखी सहा हजार रुपये का मागत आहे.

सिबील रेकॉर्ड खराब होऊ शकतं

बँकेत खाते उघडण्यासाठी वेगळे शुल्क लागत नसले तरी अनेक बँका त्यांच्या डेबिट कार्डवर काही शुल्क आकारतात. हे शुल्क वार्षिक 100 ते 1000 रुपयांपर्यंत असू शकतात. तुम्ही तुमचे खाते वापरत नसले तरीही तुम्हाला डेबिट कार्ड फी भरावी लागेल. बँका तुमच्या फोनवर एसएमएस पाठवण्यासाठी शुल्क देखील आकारतात, जे प्रति तिमाही 30 रुपये इतके जास्त असू शकते. या रकमेवर 18 टक्के जीएसटी स्वतंत्रपणे आकारला जातो. अशा प्रकारे, बँक तुमच्या खात्यातून विविध वस्तूंमध्ये पैसे कापत राहतात. खात्यात जमा झालेली रक्कम शून्य झाली की, दंडाचा भुर्दंड तुमच्यावर पडत राहतो. तुम्ही ही रक्कम जमा न केल्यास बँक तुम्हाला डिफॉल्टर घोषितही करू शकते. अशा परिस्थितीत तुमचा ‘सिबील’ रेकॉर्ड खराब होऊ शकतो.

12 महिने व्यवहार न झाल्यास खातं निष्क्रिय

तुम्ही तुमच्या बँक खात्यात सलग 12 महिने कोणताही व्यवहार न केल्यास, बँक तुमचे खाते निष्क्रिय खाते मानेल. पुढील 12 महिन्यांत कोणताही व्यवहार न झाल्यास हे खाते निष्क्रिय खात्याच्या श्रेणीत येते. बँका निष्क्रिय खात्यात व्यवहार करण्यास मनाई करत नसली तरी, तुम्ही निष्क्रिय खात्यातून नेट बँकिंग, एटीएम व्यवहार किंवा मोबाइल बँकिंग करू शकत नाही. बँका देखील तुम्हाला तुमचे डेबिट कार्ड, चेकबुक आणि पत्ता बदलण्यास मनाई करू शकतात.

कर आणि गुंतवणूक तज्ज्ञ बलवंत जैन सांगतात, की व्यवहारात, दंडाचा शुल्क आकारण्यापूर्वी बँकांनी ग्राहकांना माहिती दिली पाहिजे. गृहकर्ज आणि वैयक्तिक कर्जाच्या बाबतीत असे अगोदर सांगितले जाते. खात्यात जमा झालेली रक्कम शून्य झाल्यास ती बंद करावी. मात्र कमाईच्या लालसेमुळे बँका नैतिकता डावलून जनतेला भुर्दंड बसत असतो. त्यामुळे नागरिकांनी बँक खाते वापरत नसल्यास ते त्वरित बंद करावे, हेच योग्य असल्याचे  जैन सांगतात.

इतर बातम्या:

रोहित पाटील यांनी मैदान मारलेली कवठेमहांकाळची निवडणूक वादात; विरोधकांची न्यायालयात धाव, नेमकं प्रकरण काय?

NCB चे माजी विभागीय संचालक समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ, ठाण्यात गुन्हा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.