रेपो रेट वाढताच बँकांकडून एफडीच्या व्याजात भरघोस वाढ; जाणून घ्या कोणती बँक किती व्याज देते

आरबीआयने रेपे रेटमध्ये वाढ करताच अनेक बँकांनी आपल्या एफडीवरील व्याज दरात देखील वाढ केली आहे. जाणून घेऊयात कोणत्या बँकेने व्याज दरात नेमकी किती वाढ केली.

रेपो रेट वाढताच बँकांकडून एफडीच्या व्याजात भरघोस वाढ; जाणून घ्या कोणती बँक किती व्याज देते
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: May 20, 2022 | 7:33 AM

मुंबई : देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. महागाई (Inflation) गेल्या 9 वर्षातील उच्चस्थरावर आहे. वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या आरबीआयकडून रेपो रेटमध्ये (Repo Rate) वाढ करण्यात आली आहे. रेपो रेट वाढल्याने जवळपास सर्वच प्रकारची कर्ज (Loan) महाग झाली आहेत. याचा मोठा फटका हा सामान्य नागरिकांना बसत आहे. मात्र दुसरीकडे दिलासादायक गोष्ट म्हणजे रेपो रेट वाढल्यानंतर अनेक बँकांकडून फिक्स्ड डिपॉजिटच्या व्याज दरात देखील वाढ करण्यात आली आहे. एफडीच्या दरात वाढ करण्यात आल्याने गुंतवणूकदारांना मोठा फायदा मिळणार आहे. एफडीमधून मिळणाऱ्या परताव्यात वाढ होणार आहे. आज आपण अशाच काही बँकांबाबत माहिती जाणून घेणार आहोत, ज्यांनी आपल्या फिक्स्ड डिपॉझिटच्या दरात वाढ केली आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया

स्टेट बँक ऑफ इंडियाकडून एफडीच्या व्याज दरात वाढ करण्यात आली आहे. नव्या दरानुसार ज्यांची स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एफडी आहे. त्यांना वेगवेगळ्या कालावधीसाठी असलेल्या एफडीवर 2.90 ते 5.50 टक्क्यांपर्यंत व्याज मिळत आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना बँकेकडून एफडीवर अतिरिक्त व्याज देण्यात येत असून, त्यांच्या एफडीवर बँकेच्या वतीने 3.40 से 6.30 टक्क्यांपर्यंत व्याज दिले जात आहे.

आयडीबीआय बँक

रेपो रेट वाढवल्यानंतर आयडीबीआय बँकेने देखील आपल्या एफडीच्या दरात वाढ केली आहे. नव्या दरानुसार आयडीबीआय बँक सध्या सामान्य ग्राहकांना त्यांच्या एफडीवर 2.50 से 5.60 टक्क्यांपर्यंत व्याज देते. तर ज्येष्ठ नागरिकांना 3.40 ते 6.30 टक्क्यांपर्यंत व्याज देण्यात येत आहे. स्टेट बँकेच्या तुलनेत आयडीबीआयचा व्याज दर हा अधिक आहे. आयडीबीआय प्रमाणेच पंजाब नॅशनल बँकेने देखील आपल्या व्याज दरात वाढ केली आहे. पंजाब नॅशनल बँकेकडून सामान्य नागरिकांना एफडीवर 3 ते 5.25 टक्क्यांपर्यंत व्याज देण्यात येत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी एफडीवर अतिरिक्त व्याज देण्यात येत असून, त्यांना एफडीवर 3.50 ते 5.75 टक्क्यांपर्यंत परतावा देण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

कॅनरा बँक

मध्यवर्ती बँक आरबीआयने रेपो रेट वाढवताच कॅनरा बँकेने देखील आपल्या एफडीच्या व्याज दरात वाढ केली आहे. कॅनरा बँकेकडून एफडीवर 2.90 ते 5.75 टक्क्यांपर्यंत व्याज देण्यात येत आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी इतर बँकांप्रमाणेच कॅनरा बँक देखील एफडीवर अतिरिक्त व्याज देत असून, ज्येष्ठ नागरिकांना बँकेच्या वतीने एफडीवर 2.50 ते 6.50 टक्क्यांपर्यंत व्याज मिळत आहे. रेपो रेटमुळे एफडीवरील व्याज दरात वाढ झाली. मात्र दुसरीकडे ईएमआय देखील वाढल्याने सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.