रेपो रेट वाढल्याने ईएमआयमध्ये होणार वाढ; जाणून घ्या किती वाढणार तुमच्या गृहकर्जावरील हप्ता!

महागाई वाढत असतांनाच, आरबीआय येत्या काही दिवसांत रेपो दरात आणखी वाढ करण्याचा निर्णय घेऊ शकते, त्याचा परिणाम तुमच्या होम लोनवरील ईएमआयवर होणार असून, तुमची EMI आणखी महाग होऊ शकते. जाणून घ्या, लोननुसार किती वाढणार ईएमआय.

रेपो रेट वाढल्याने ईएमआयमध्ये होणार वाढ; जाणून घ्या किती वाढणार तुमच्या गृहकर्जावरील हप्ता!
प्रातिनिधिक छायाचित्र Image Credit source: Tv9
Follow us
| Updated on: May 08, 2022 | 5:06 PM

RBI च्या रेपो दरात वाढ करण्याच्या निर्णयानंतर बँकांनी कर्जे महाग (Bank loans are expensive) करायला सुरुवात केली आहे. आणि महागड्या कर्जाचा सर्वात मोठा फटका अशा लोकांना सहन करावा लागेल ज्यांनी अलीकडच्या काळात बँक किंवा हाउसिंग फायनान्स कंपनीकडून गृहकर्ज घेऊन घर विकत घेतले आहे. RBI ने रेपो रेट 40 बेसिस पॉईंटने (Repo rate by 40 basis points) वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, जो आता 4.40 टक्के झाला आहे. नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बँक किंवा हाउसिंग फायनान्स कंपनीने व्याजात फारशी वाढ करू नये असे ठरविले असले तरी, जुन्या गृहकर्ज घेणार्‍यांचा ईएमआय महाग होईल हे निश्चित. दिवसागणिक महागाई वाढत असतांना, घराचा ईएमआय वाढल्याने, सर्वसामान्यांच्या खिशावर अजूनच बोझा पडणार आहे. जाणून घ्या, कीती गृहकर्जावर कीती ईएमआय वाढणार (EMI will increase) आणि तुमच्या खिशावर किती परिणाम होईल.

20 लाख गृहकर्ज

समजा, तुम्ही 20 वर्षांसाठी 6.85 टक्के व्याजदराने 20 लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले असेल, तर सध्या तुम्हाला 15, 236 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. परंतु रेपो रेटमध्ये वाढ झाल्यानंतर नवीन दर 7.25 टक्के होईल, त्यानंतर तुम्हाला 15, 808 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. म्हणजेच दरमहा 572 रुपये अधिक आणि वर्षभरात 6864 रुपये अतिरिक्त भार पडणार आहे.

40 लाखांचे गृहकर्ज

जर तुम्ही 15 वर्षांसाठी 6.95 टक्के व्याजदराने 40 लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले असेल, तर तुम्हाला सध्या 35, 841 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. पण रेपो रेट वाढवल्यानंतर व्याजदर 7.35 टक्क्यांपर्यंत वाढेल, त्यानंतर तुम्हाला 36,740 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. म्हणजे दरमहा 899 रुपये अधिक. आणि जर तुम्ही ते संपूर्ण वर्षात जोडले तर तुम्हाला 10,788  रुपयांनी अधिक ईएमआय भरावा लागेल.

 60 लाख गृहकर्ज

तुम्ही 60 लाख रुपयांचे गृहकर्ज घेतल्यास बँक त्यावर जास्त व्याज आकारते. म्हणजेच, जर तुम्ही 7.25% व्याजदराने 20 वर्षांसाठी 60 लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले असेल, तर तुम्हाला 47,423 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. पण RBI रेपो रेटमध्ये वाढ केल्यानंतर व्याज दर 7.65 टक्के होईल, त्यानंतर 48,887 रुपयांचा EMI भरावा लागेल. म्हणजेच दर महिन्याला तुम्हाला 1464 रुपयांनी अधिक ईएमआय भरावा लागेल आणि एका वर्षात 17568 रुपये अधिक भरावे लागतील.

रेपो रेट अधिक वाढण्याची शक्यता

RBI ने सध्या रेपो रेटमध्ये 40 बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. पण तज्ज्ञांच्या मते, त्याची वाढ होण्याची प्रक्रिया इथेच थांबणार नाही. रशिया-युक्रेन युद्ध अजून संपलेले नाही. महागाई वाढत आहे, अशा परिस्थितीत येत्या काही दिवसांत आरबीआय रेपो दरात आणखी वाढ करण्याचा निर्णय घेऊ शकते, त्यानंतर तुमचा ईएमआय आणखी महाग होऊ शकतो.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.