Investment : योग्य वयात दाखवा समजूतदारपणा, मोठा परतावा देईल ही गुंतवणूक योजना

Investment : योग्य वेळी गुंतवणूक केली तर पुढील अनेक जबाबदाऱ्या पेलताना हाती मोठे धन असते. त्यामुळे वाढत्या वयात येणारा ताण कमी होतो. पण त्यासाठी तरुणपणीच गुंतवणुकीचा समजूतदारपणा दाखवता येणे आवश्यक आहे.

Investment : योग्य वयात दाखवा समजूतदारपणा, मोठा परतावा देईल ही गुंतवणूक योजना
Follow us
| Updated on: Jun 29, 2023 | 6:14 PM

नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांपासून शेअर बाजाराकडे (Share Market) बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला आहे. शेअर बाजार हा जुगार नाही. योग्य अभ्यास करुन, तज्ज्ञाच्या सल्ल्याने केलेली गुंतवणूक तुम्हाला फायदा मिळवून देते. पण त्यासाठी सयंम बाळगणे आवश्यक आहे. डिजिटलयाझेशनमुळे शेअर बाजारात गुंतवणूक करणे अत्यंत सोपे झाले आहे. कोरोना काळात तर शेअर बाजारात सर्वाधिक डिमॅट खाते उघडले गेले. पण ज्यांना अभ्यास न करता लागलीच दुप्पट कमाई हवी होती, ते सर्व निराश होऊन परतले. तर ज्यांनी गुंतवणुकीचे योग्य नियोजन केले, तो मोठा वर्ग आजही शेअर बाजारात गुंतवणूक करत आहे. काही जण सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट योजना म्हणजे एसआयपी(SIP) माध्यमातून गुंतवणूक करत आहे. त्यातून त्यांना फायदा पण होत आहे.

होऊ शकता करोडपती शेअर बाजारात हौसे, नवसे, गवसे सर्व प्रकारचे गुंतवणूकदार असतात. त्यांना वाटते बाजारात पैसा ओतला की लागलीच दहा पट नफा कमावता आला पाहिजे. किंवा एखाद्या गुंतवणुकीतून कोट्यवधी रुपयांचा परतावा मिळाला पाहिजे. पण त्यासाठी शेअर बाजारात सातत्य, सखोल अभ्यास, तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. अनेक गुंतवणूकदारांनी मोठा नफा कमावला आहे. तुम्ही जर योग्य वयात गुंतवणूक केली तर त्याचा फायदा मिळतो.

20 ते 30 वयात किती करावी गुंतवणूक तरुण वयात योग्य गुंतवणूक करणे आवश्यक आहे. 20 ते 30 वयात किती करावी असा प्रश्न अनेकांना पडतो. तज्ज्ञांच्या मते या वयात इक्विटीत 100 टक्के गुंतवणूक करणे आवश्यक आहे. पण दीर्घकाळासाठी ही गुंतवणूक असावी, असे तज्ज्ञ म्हणतात. दीर्घ कालावधीत अधिक फायदा मिळतो. जास्तीचा परतावा मिळतो. गुंतवणूकदारांचा अधिक फायदा होतो. तरुण वयातच गुंतवणूक करत असल्याने पुढे 20 ते 30 वर्षांपर्यंत गुंतवणूक करता येते.

हे सुद्धा वाचा

30 ते 45 वयोगटातील गुंतवणूक जर तुमचे वय 30 ते 45 वर्षे असेल आणि शेअर बाजारात तुम्हाला 5-7 वर्षांचा अनुभव गाठिशी असेल तर चांगला परतावा मिळू शकतो. पण त्यासाठी पोर्टफोलिओत बदल करणे आवश्यक आहे. तुम्ही जर या वयात सर्वच पैसा इक्विटी फंडात गुंतवत असाल तर तुम्ही हा पॅटर्न बदलणे आवश्यक आहे. काही पैसा डेट स्कीम्समध्ये गुंतवणे आवश्यक आहे. वाढत्या वयानुसार, तुम्ही इक्विटीत कमी गुंतवणूक करुन ती इतर फंडाकडे वळवून फायदा मिळवू शकता. त्यासाठी तज्ज्ञाचा सल्ला आवश्य घ्या.

वयाच्या 50 वर्षानंतर अनेकांना या वयात निवृत्तीचे वेध लागतात. त्यामुळे या वयात केलेली गुंतवणूक ही उतार वयासाठी केलेली तरतूद असते. थकलेल्या शरिरात बळ नसते. गुंतवणूकदार मोठी रिस्क, जोखीम घेऊ शकत नाही. अशावेळी तुम्ही 65-75 रक्कम डेट म्युच्युअल फंडात आणि इतर रक्कम इक्विटी फंडात गुंतवू शकता. त्यातून उतार वयात मोठा फायदा मिळू शकतो.

हा कोणताही गुंतवणुकीचा सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी तुमचा स्वतःचा अभ्यास, मत महत्वाचे आहे. तसेच गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञाचा सल्ला घेणे जोखीम कमी करुन चांगल्या परताव्यासाठी आवश्यक ठरु शकतो.

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.