Bank: तिढा खासगीकरणाचा: राष्ट्रीय बँक कर्मचारी संपावर, शिष्टाई अयशस्वी?

केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणाविरोधात बँक कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांचा संप पुकारला आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या संपाचा सरकारी बँकांच्या कामकाजावर बंदचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

Bank: तिढा खासगीकरणाचा: राष्ट्रीय बँक कर्मचारी संपावर, शिष्टाई अयशस्वी?
केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणाविरोधात दोन दिवसांचा संप
Follow us
| Updated on: Dec 16, 2021 | 1:15 AM

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील राष्ट्रीय बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधात बँक कर्मचारी संघटनांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे. केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणाविरोधात दोन दिवसांचा संप पुकारला आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या संपाचा सरकारी बँकांच्या कामकाजावर बंदचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. संपादरम्यान स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि आरबीएल बँकांच्या कामकाजावर मोठा परिणाम दिसून येऊ शकतो. दरम्यान, बँक व्यवस्थापनांनी कामकाजावर होणारा परिणाम टाळण्यासाठी सर्व शाखांमध्ये पर्यायी कामकाजाची व्यवस्था निर्माण केली आहे.

संपाचे हत्यार कशासाठी?

सरकारी बँकांच्या खासगीकरणाला बँक संघटनांचा मोठा विरोध आहे. बँकांच्या खासगीकरणामुळे अर्थव्यवस्थेच्या प्राथमिक क्षेत्रांना गंभीर परिणामांना सामारे जावे लागेल. ग्रामीण भागातील कर्ज वितरणावर थेट परिणाम होण्याची भीती बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी वर्तविली आहे. अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेच्या झेंड्याखाली देशातील विविध बँक क्षेत्रातील कर्मचारी एकवटले आहेत.

संपाचा व्हावा पुनर्विचार

स्टेट बँक ऑफ इंडिया सहित अन्य राष्ट्रीय बँकांनी कर्मचाऱ्यांना संप न करण्याचे आवाहन केले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने सामान्य नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी संपाचा पुनर्विचार करण्याचे व संपात सहभागी न होण्याचे आवाहन संघटनांना केले आहे. कोविड प्रकोपामुळे यापूर्वीच बँकांचे कामकाजावर परिणाम झाला होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बँकेच्या व्यवहारांवर परिणाम होऊन कोट्यावधी रुपयांचे नुकसान होण्याची भीती कॅनरा आणि युनियन बँक ऑफ इंडिया सारख्या राष्ट्रीय बँक व्यवस्थापनांनी वर्तविली आहे.

मध्यममार्गी तोडगा

विविध माध्यमांनी दिलेल्या रिपोर्टनुसार बँकांचे प्रमुख, बँक असोसिएशन आणि बँक कर्मचारी युनियन यांच्यात चर्चा सुरु आहे. बँक व्यवस्थापन सातत्यानं संप रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 2021 च्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी बँकांच्या खासगीकरणासंदर्भात बनवलेल्या कमिटीसंदर्भात बोलताना दोन बँकांचं खासगीकरण करणार असल्याचं म्हटलं होतं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी लोकसभेत बोलताना 2021-22 या आर्थिक वर्षात सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांचं खासगीकरण करण्यात येणार असल्याचं म्हटलं होतं. कोणत्या बँकांचं खासगीकरण करायचं यासंदर्भातील निर्णय देखील बँक खासगीकरण समिती घेणार आहे. (Bank employees went on a two-day strike against the central government’s privatization policy)

इतर बातम्या

Cidco Lottery | 2022 | घर घेण्याचं स्वप्न होणार साकार, सिडको स्वस्तात घर विकणार?

Alia Bhatt: आलिया भट्ट क्वारन्टाईनचे नियम तोडून दिल्लीला रवाना, मुंबईत परतताच कारवाईची शक्यता

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.