Holiday | नोव्हेंबरमध्ये सुट्यांचा मांडव! इतक्या दिवस तर बँका बंद
Holiday | नोव्हेंबर महिना सुरु होण्यास आता अवघे दोन दिवस उरले आहेत. महिन्याच्या सुरुवातीलाच सणांची रेलचेल आहे. भारतीय संस्कृतीमध्ये दिवाळी हा सण सर्वात मोठा मानल्या जातो. पाच दिवस धूम असते. या कालावधीत बँकांना सुट्टी असेल. महत्वाची ऑफलाईन कामे करण्यासाठी सुट्यांचा हा तक्ता जरुन बघा. नाहीतर नाहक एक फेरी होईल.
नवी दिल्ली | 29 ऑक्टोबर 2023 : नोव्हेंबर महिन्यात सणासुदीची धूम असेल. या महिन्यात सुट्यांचा सुकाळ आहे. सुट्यांच्या यादीवर नजर टाकली तर लक्षात येते की अनेक दिवस बँकांना ताळे असेल. सणासुदीत घर, कार अथवा इतर काही कर्ज प्रकरणांची फाईल पुढे सरकवायची असेल अथवा इतर काही ऑफलाईन कामे करायची असतील तर सुट्यांची ही यादी जरुर नजरेखालून घाला. नाहीतर कामाच्या गडबडीत सुट्टीच्या दिवशी बँकेकडे नाहक चक्कर होईल. काम पण होणार नाही. अर्थात संपूर्ण देशात एकाच दिवशी सर्व बँकांना सुट्टीचे प्रमाण तसे कमीच आहे. ठराविक दिवशीच संपूर्ण देशात बँकांना एकाच दिवशी ताळे असतात.
अशा जाहीर होतात सुट्या
भारतीय रिझर्व्ह बँक तीन श्रेणीत सुट्यांची यादी जाहीर करते. परक्राम्य संलेख अधिनियम (negotiable instrument act), तात्काळ पैसे पाठविणे (real time gross settlement) आणि बँक खाते व्यवहाराचा लेखाजोखा मांडण्यासाठी (Bank closing Account) याअंतर्गत बँकेच्या सुट्या असतात. तर राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर बँकांना सुट्टी जाहीर होते. या सुट्या शनिवारी आणि रविवार व्यतिरिक्त दिल्या जातात. दसरा, दिवाळी आणि इतर सणाच्या दिवशी देशभरातील बँकांना सुट्टी असते.
ऑनलाईन बँकिंग दिमतीला
सुट्टीच्या दिवशी ग्राहकांना बॅंकेच्या शाखेत जाऊन त्यांचे पैसे जमा करता येणार नाहीत किंवा शाखेतून पैसे काढता येणार नाहीत. परंतु एटीएममध्ये अशा सेवा उपलब्ध राहतील. ऑनलाईन बँकिंग सेवा, एटीएम आणि मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून व्यवहार करता येईल. क्रेडिट, डेबिट कार्ड आणि युपीआयचा वापर करुन ऑनलाईन पेमेंट करता येईल.
या दिवशी सुट्टी
- 1 नोव्हेंबर : कर्नाटक, मणिपूर आणि हिमाचल प्रदेशात बँका बंद असतील. करवा चौथ हा सण.
- 5 नोव्हेंबर : रविवारची सुट्टी
- 10 नोव्हेंबर : वांगला उत्सवामुळे मेघालय राज्यात बँक बंद
- 11 नोव्हेंबर : महिन्यातील दुसरा शनिवार, सुट्टी
- 12 नोव्हेंबर : रविवारची सुट्टी, या दिवशी दिवाळी
- 13 नोव्हेंबर : गोवर्धन पूजा, त्रिपुरा, उत्तराखंड, सिक्कीम, मणिपूर, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील बँका बंद
- 14 नोव्हेंबर : बलि प्रतिपदा, गुजरात, कर्नाटक, सिक्कीम आणि महाराष्ट्रात बँका बंद
- 15 नोव्हेंबर : भाऊबीजेनिमित्त सिक्कीम, मणिपूर, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि हिमाचल प्रदेशमध्ये सुट्टी
- 19 नोव्हेंबर : रविवारमुळे बँकेला ताळे
- 20 नोव्हेंबर : छठ पूजा बिहारसह राजस्थानमध्ये बँकेला टाळे
- 23 नोव्हेंबर : उत्तराखंड आणि सिक्कीम राज्यात सुट्टी
- 25 नोव्हेंबर : चौथा शनिवार
- 26 नोव्हेंबर : रविवारची सुट्टी
- 27 नोव्हेंबर : गुरु नानक जयंती, कार्तिक पौर्णिमामुळे त्रिपूरा, मिझोरम, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा, चंदीगड, उत्तराखंड, तेलंगाणा, राजस्थान, जम्मू अँड काश्मीर, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, नवी दिल्ली, बिहार, झारखंड आणि हिमाचल प्रदेशात सुट्टी
- 30 नोव्हेंबर : कर्नाटकातील बँका बंद