Bank Holiday in September 2023 : सणांचा मुहूर्त! सप्टेंबरमध्ये इतक्या दिवस बँका राहतील बंद

Bank Holiday in September 2023 : सप्टेंबर महिन्यापासून सणांचा काळ सुरु होतो. या महिन्यात इतक्या दिवस बँका बंद असतील. अर्थात राज्यानुसार, या सुट्यांमध्ये फरक असतो. एखाद्या राज्यात असली तरी दुसऱ्या राज्यात त्या दिवशी बँकेचे कामकाज सुरु असते.

Bank Holiday in September 2023 : सणांचा मुहूर्त! सप्टेंबरमध्ये इतक्या दिवस बँका राहतील बंद
Follow us
| Updated on: Aug 26, 2023 | 6:02 PM

नवी दिल्ली | 26 ऑगस्ट 2023 : आपले अनेक आर्थिक व्यवहार बँकेशी संबंधित असतात. आता डिजिटल आणि ऑनलाईन जगतात बँकेत जाण्याचे काम कमी झाले असले तरी बँकेत जावेच लागते. व्यवहार ऑनलाईन झाले असले तरी कर्ज प्रकरण अथवा इतर अनेक कामे बँकेत जाऊनत करावी लागतात. आता सणासुदीचा काळ सुरु होत आहे. सुट्यांसोबत आनंदाचा काळ आहे. सप्टेंबर महिन्यात गुलाबी नोटा बदलण्याची शेवटची संधी आहे. त्यासाठी बँकेत जावे लागेल. त्यामुळे सुट्टी कधी आहे, हे पाहूनच बँकेत गेल्यास नाहकची चक्कर टळेल. सुट्यांचा अंदाज घेत, लवकरात लवकर काम पूर्ण करा. भारतीय रिझर्व्ह बँकेने ग्राहकांच्या सोयीसाठी वार्षिक सुट्यांची यादी (Bank Holidays in September 2023) जाहीर केली आहे. सप्टेंबर महिन्यात सुट्यांची दखल घेत काम उरकून घ्या.

सुट्याच सुट्याच

सप्टेंबर महिन्यात एकूण 16 दिवस बँकांना टाळे राहील. यामध्ये राष्ट्रीय आणि राज्यातील सुट्यांचा समावेश आहे. अर्थात राज्यानुसार, या सुट्यांमध्ये फरक असतो. एखाद्या राज्यात असली तरी दुसऱ्या राज्यात त्या दिवशी बँकेचे कामकाज सुरु असते. श्रीकृष्ण जन्माष्टमी, गणेश चतुर्थी, ईद-ए-मिलाद-उल-नबी या दिवशी काही राज्यांमध्ये बँकांचे कामकाज होणार नाही. त्यामुळे बँकेचे काम लवकरात लवकर पूर्ण करुन घ्या.

हे सुद्धा वाचा

या दिवशी राहतील बँका बंद

  1. 3 सप्टेंबर 2023 : रविवार असल्याने बँकेचे शटर डाऊन असेल
  2. 6 सप्टेंबर 2023 : श्रीकृष्ण जन्माष्टमी (भुवनेश्वर, चेन्नई, हैदराबाद, पाटणा)
  3. 7 सप्टेंबर 2023 : जन्माष्टमी / श्री कृष्ण अष्टमी (देशातील बहुतेक ठिकाणी सुट्टी)
  4. 9 सप्टेंबर 2023 : दुसरा शनिवार असल्याने बँकांचे कामकाज बंद
  5. 10 सप्टेंबर 2023 : रविवार असल्याने बँकेला सुट्टी असेल
  6. 17 सप्टेंबर 2023 : रविवार असल्याने बँकेचे शटर डाऊन असेल
  7. 18 सप्टेंबर 2023 : विनायक चतुर्थी (बंगळुरु, हैदराबाद)
  8. 19 सप्टेंबर 2023 : गणेश चतुर्थी (अहमदाबाद, बेलापूर, भुवनेश्वर, मुंबई, नागपूर, पणजी)
  9. 20 सप्टेंबर 2023 : गणेश चतुर्थी (दुसरा दिवस), भुवनेश्वर, पणजी
  10. 22 सप्टेंबर 2023 : श्री नारायण गुरु समाधी दिन (कोची, तिरूवनंतपुरम)
  11. 23 सप्टेंबर 2023 : चौथ्या शनिवारमुळे बँका असतील बंद
  12. 24 सप्टेंबर 2023 : रविवार असल्याने बँकेचे कामकाज होणार नाही
  13. 25 सप्टेंबर 2023 : श्रीमंत शंकरदेव यांची जयंती (गुवाहाटी)
  14. 27 सप्टेंबर 2023 : मिलाद-ए-शरीफ (जम्मू, कोची)
  15. 28 सप्टेंबर 2023 : ईद-ए-मिलाद / ईद-ए-मिलादुन्नबी (बारा वफत)
  16. 29 सप्टेंबर 2023 : ईद-ए-मिलाद-उल-नबी नंतर इंद्रजात्रा/शुक्रवार (गंगटोक, जम्मू, श्रीनगर)

ऑनलाईन बँकिंगचा फायदा

ऑनलाइन बँकिंग सेवेमुळे ऑनलाईन रक्कम हस्तांतरीत करता येईल. पण त्यासाठी बँकेचे नियम आहेत. त्यानुसार, मर्यादीत रक्कम हस्तांतरीत करता येईल. सुट्टीच्या दिवशी ग्राहकांना बॅंकेच्या शाखेत जाऊन त्यांचे पैसे जमा करता येणार नाहीत किंवा शाखेतून पैसे काढता येणार नाहीत. परंतु एटीएममध्ये अशा सेवा उपलब्ध राहतील. ऑनलाईन बँकिंग सेवा, एटीएम आणि मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून व्यवहार करता येईल. क्रेडिट, डेबिट कार्ड आणि युपीआयचा वापर करुन ऑनलाईन पेमेंट करता येईल.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.