Bank Holidays Alert: पुढच्या आठवड्यात विविध राज्यांमध्ये बँकांचे कामकाज सहा दिवस बंद राहणार
Bank Holiday | ऑक्टोबरच्या पहिल्या 15 दिवसात 11 दिवस बँका बंद होत्या. शनिवार, 16 ऑक्टोबर रोजी गंगटोक, सिक्कीम येथे दुर्गा पूजेच्या निमित्ताने बँका बंद राहिल्या, तर 17 ऑक्टोबर रोजी रविवार असल्याने देशभरातील बँका बंद होत्या.
नवी दिल्ली: ऑक्टोबर महिन्यातील सणांमुळे सलग अनेक दिवस देशातील विविध राज्यांमध्ये बँकांमध्ये काम होणार नाही. त्यामुळे तुम्हाला बँकेत एखादे महत्त्वाचे काम असेल तर येत्या आठवड्यातील सुट्ट्यांची यादी एकदा तपासा. पुढील आठवड्यातही देशाच्या विविध भागात अनेक सण साजरे केले जातील. यामुळे बँकांमध्ये सुट्टी असेल. यापैकी बहुतांश सुट्ट्या प्रादेशिक सुट्ट्या आहेत. याचा अर्थ असा की जर एखाद्या राज्यात बँका बंद राहिल्या तर दुसऱ्या राज्यात बँकिंगचे काम चालू राहील. या सगळ्या सुट्ट्या एकत्रित केल्यास देशाच्या विविध भागात येत्या आठवड्यात सलग सहा दिवस बँका बंद राहतील.
ऑक्टोबरच्या पहिल्या 15 दिवसात 11 दिवस बँका बंद होत्या. शनिवार, 16 ऑक्टोबर रोजी गंगटोक, सिक्कीम येथे दुर्गा पूजेच्या निमित्ताने बँका बंद राहिल्या, तर 17 ऑक्टोबर रोजी रविवार असल्याने देशभरातील बँका बंद होत्या.
कोणत्या सणांसाठी बँका बंद असतील?
* 18 ऑक्टोबर- आसामच्या गुवाहाटीमध्ये काटी बिहू उत्सवामुळे बँका बंद राहतील. * 19 October ऑक्टोबर-पैगंबर मुहम्मद यांची जयंती असलेल्या ईद-ए-मिलादच्या निमित्ताने नवी दिल्ली, भोपाळ, अहमदाबाद, बेलापूर, चेन्नई, डेहराडून, हैदराबाद, इंफाल, जम्मू, कानपूर, कोची येथे बँका बंद राहतील. लखनौ, मुंबई, नागपूर, रायपूर, रांची, श्रीनगर आणि तिरुअनंतपुरममध्ये बँकिंग ऑपरेशन्स होणार नाहीत. * 20 ऑक्टोबर – वाल्मिकी जयंतीनिमित्त बंगळुरू, चंदीगड, शिमला, कोलकाता आणि अगरतळा येथे बँका बंद राहतील. * 22 ऑक्टोबर-ईद-ए-मिलाद-उल-नबीनंतर जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील. * 23 ऑक्टोबर – चौथ्या शनिवारमुळे भारतभर बँका बंद राहतील. * 24 ऑक्टोबर – रविवारी बँका बंद राहतील.
ऑनलाईन सेवा सुरु राहणार
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या दिनदर्शिकेनुसार, या सुट्ट्या संबंधित प्रदेशातील सणांवर अवलंबून आहेत. त्यामुळे एका राज्यात बँका बंद असल्या तरी दुसऱ्या राज्यासाठी तोच नियम लागू असेलच असे नाही. या सगळ्याचा हिशेब करता ऑक्टोबर महिन्यात एकूण 21 दिवस बँका बंद राहतील. या काळात केवळ बँकेच्या शाखा बंद राहतील. मात्र, एटीएम आणि ऑनलाईन व्यवहार सुरु राहतील. परिणामी ग्राहकांना पैसे काढण्यात कोणतीही अडचण येणार नाही.
रिझर्व्ह बँकेकडून IMPS लिमिटच्या नियमात बदल
गेल्या आठवड्यात भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आर्थिक धोरण जाहीर करताना प्रत्येक व्यवहारासाठी IMPS मर्यादा 2 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये केली. या निर्णयाबाबत आरबीआयने म्हटले आहे की यामुळे डिजिटल व्यवहार वाढण्यास मदत होईल, तसेच त्यांना 2 लाखांपेक्षा अधिक रक्कमेचे व्यवहार करणे सोपे झाले आहे.
IMPS म्हणजे तत्काळ मोबाईल पेमेंट सेवा. सोप्या शब्दात, IMPS द्वारे, तुम्ही कोणत्याही खातेधारकाला कुठेही, कधीही पैसे पाठवू शकता. यामध्ये पैसे पाठवण्याच्या वेळेवर कोणतेही बंधन नाही. तुम्ही IMPS द्वारे पैसे काही सेकंदात, दिवसातील 24 तास, आठवड्याचे सात दिवस कधीही हस्तांतरित करू शकता. RTGS, NEFT किंवा IMPS सारख्या सुविधांसाठी इंटरनेट आवश्यक आहे. जर तुमच्याकडे संगणक किंवा लॅपटॉप नसेल, तर तुम्ही इंटरनेट सुविधा असलेल्या स्मार्टफोनवरूनही IMPS चा वापर करु शकता.
संबंधित बातम्या:
आधार कार्डामुळे फसवणूक टाळायची असल्यास लवकर हा क्रमांक अपडेट करा, अन्यथा…
पॅनकार्ड हरवल्यास काय कराल, जाणून घ्या नवं पॅनकार्ड मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया