Bank Holidays October : सुट्यांसाठी ऑक्टोबर सुपरहिट! इतक्या दिवस बँका बंद

Bank Holidays October : सप्टेंबरपासून सणांचा श्रीगणेशा झाला. ऑक्टोबर महिन्यात पण इतर सुट्यांसह सणांची रेलचेल असेल. त्यामुळे या काळात बँका बंद असतील. अर्थात राज्यानुसार, सुट्यांमध्ये फरक पडतो. आता डिजिटल युगामुळे पैशांचे व्यवहार ऑनलाईन होतात. पण अनेक कामे आजही बँकेत जाऊनच करावी लागतात.

Bank Holidays October : सुट्यांसाठी ऑक्टोबर सुपरहिट! इतक्या दिवस बँका बंद
Follow us
| Updated on: Sep 24, 2023 | 7:11 PM

नवी दिल्ली | 24 सप्टेंबर 2023 : ऑक्टोबर महिन्यात पण सुट्यांचा (Bank Holidays in October) सुकाळ आहे. या महिन्यात शनिवार-रविवारसह इतर दिवशी पण सुट्या आहेत. त्यामुळे काही महत्वाची कामे असतील तर ती पूर्ण करुन घ्या. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सुट्या जाहीर केल्या आहेत. त्यात काही सुट्ट्या प्रदेशानुसार बदलतात. त्या भागात सुट्टी असली तरी महाराष्ट्रात त्यादिवशी बँका सुरु असतील. देशभरात सर्वच ठिकाणी एकाचवेळी बँका बंद राहणार नाहीत.. याचा अर्थ काही राज्यांमध्ये काही दिवस फक्त बँका बंद राहतील पण इतर राज्यांमध्ये सर्व बँकांचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू राहील. आता डिजिटल युग असल्याने पैशांचे अनेक व्यवहार मोबाईलवरुनच होतात. पण अनेक व्यवहार आणि काम बँकेत जाऊनच करावे लागतात. तेव्हा सुट्यांची यादी पाहून त्यानुसार तुम्हाला नियोजन करता येईल.

ऑनलाईन बँकिंगचा फायदा

ऑनलाइन बँकिंग सेवेमुळे ऑनलाईन रक्कम हस्तांतरीत करता येईल. पण त्यासाठी बँकेचे नियम आहेत. त्यानुसार, मर्यादीत रक्कम हस्तांतरीत करता येईल. सुट्टीच्या दिवशी ग्राहकांना बॅंकेच्या शाखेत जाऊन त्यांचे पैसे जमा करता येणार नाहीत किंवा शाखेतून पैसे काढता येणार नाहीत. परंतु एटीएममध्ये अशा सेवा उपलब्ध राहतील. ऑनलाईन बँकिंग सेवा, एटीएम आणि मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून व्यवहार करता येईल. क्रेडिट, डेबिट कार्ड आणि युपीआयचा वापर करुन ऑनलाईन पेमेंट करता येईल.

हे सुद्धा वाचा

सुट्यांचे गणित काय

केंद्रीय बँक तीन श्रेणीत लक्षात घेत सुट्यांची यादी जाहीर करते. परक्राम्य संलेख अधिनियम (negotiable instrument act), तात्काळ पैसे पाठविणे (real time gross settlement) आणि बँक खाते व्यवहाराचा लेखाजोखा मांडण्यासाठी (Bank closing Account) याअंतर्गत बँकेच्या सुट्या असतात. तर राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर बँकांना सुट्टी आहे. या सुट्या शनिवारी आणि रविवार व्यतिरिक्त असतील. दिवाळी आणि दसऱ्यासारख्या सणाच्या दिवशी देशभरातील बँकांना सुट्टी असते.

  • 1 ऑक्टोबर 2023 – रविवार
  • 2 ऑक्टोबर 2023 – गांधी जयंती
  • 8 ऑक्टोबर 2023 – रविवार
  • 14 ऑक्टोबर 2023 – शनिवार
  • 15 ऑक्टोबर 2023 – रविवार
  • 22 ऑक्टोबर 2023 – रविवार
  • 24 ऑक्टोबर 2023 – दसरा/ विजयादशमी
  • 28 ऑक्टोबर 2023 – चौथा शनिवार
  • 29 ऑक्टोबर 2023 – रविवार
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.