Bank FD Rates: मुदत ठेवीवर सर्वाधिक व्याज कुठे मिळते? पाहुयात ‘या’ बँकांचे व्याजदर
बँक त्यांच्या धोरणानुसार, जमा रक्कमेवर व्याज दराची घोषणा करते. त्यामुळे मुदत ठेवमध्ये (FD rates) गुंतवणूक करताना अगोदर त्याची तुलना इतर बँकांशी करणे गरजेचे आहे.

Bank FD Rate:काही बँकांनी मुदत ठेवीवरील व्याजदरात वाढ केली आहे. त्यामुळे गुंतवणुकीसाठी ही एक चांगली बाब आहे. परतावा चांगला (Good Returns) मिळाला तर तो कोणाला नको आहे. त्यामुळे सुरक्षित हमी आणि जोखीम कमी म्हणून मुदत ठेवीत (Fixed Deposit) पैसे गुंतवणूक हा चांगला पर्याय आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), एचडीएफसी बँक(HDFC), आयसीआयसीआय (ICICI) बँक आणि कोटक महिंद्रा (KOTAK MAHINDRA) बँकेचा या यादीत समावेश आहे. मुदत ठेवीत गुंतवणुकीची तयारी केली असेल तर सर्वात अगोदर या बँकांचे व्याजदर एकदा तपासा. या बँकांच्या व्याजदराची तुलना करा आणि त्यानंतर तुमची गुंतवणूक करा. हा सर्व बँका ज्येष्ठ नागरिकांसाठी मुदत ठेवीवर सर्वाधिक व्याज देत आहेत. ब-याच बँकांनी दोन कोटी पेक्षा कमी मुदत ठेवीवर व्याजदर वाढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यामध्ये सरकारी बँकांसोबतच खासगी बँकांचाही समावेश आहे.
मुदत ठेवीवरील परतावा हा नेहमी दोन गोष्टींवर अवलंबून असतो. तुम्ही जमा करत असलेली रक्कम आणि किती कालावधीसाठी तुम्ही मुदत ठेव ठेवतात, तो कालावधी. याचा अर्थ किती रक्कम किती महिने अथवा किती वर्षांकरीता जमा करण्यात येत आहे, त्याआधारे ग्राहकाला परतावा मिळतो. कधी फायदा होतो तर कधी कमी परतावा मिळतो. बँक त्यांच्या धोरणानुसार जमा केलेल्या रक्कमेवर व्याज दरांची घोषणा करते. त्यामुळे कोणत्याही बँकेत गुंतवणूक करताना त्याची तुलना करा, म्हणजे तुम्हाला फायदा मिळेल. चला तर एसबीआय, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक आणि बँक ऑफ बडोदा मधील मुदत ठेवीवरील व्याजदरांचा आढावा घेऊयात…
स्टेट बँकेत किती मिळते व्याज
स्टेट बँकेत मुदत ठेवीवर 7 दिवस ते 10 वर्षांपर्यंत सामान्य ग्राहकांना 2.9 ते 5.5 टक्के व्याज मिळते. ज्येष्ठ नागरिकांना या जमा रक्कमेवर 3.4 ते 6.30 टक्के व्याज मिळते. सर्वसाधारण ग्राहकांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना 50 बेसीस पॉईंट अतिरिक्त व्याज मिळते. हे नवीन व्याजदर 15 फेब्रुवारी 2022 पासन लागू आहेत.
एचडीएफसीत किती मिळते व्याज
खासगी बँक एचडीएफसी बँकेत दोन कोटींपेक्षा कमी जमा रक्कमेवर मुदत ठेवीवरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. ही वाढ काही कालावधीसाठी असलेल्या मुदत ठेवीसाठी लागू करण्यात आली आहे. नवीन दर 6 एप्रिल 2022 पासून लागू करण्यात आली आहे. एचडीएफसी बँक 7 दिवस ते 10 वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवीवर साधारण ग्राहकाला 2.50 टक्के ते 5.60 टक्क्यांपर्यंत व्याज देते.
कोटक महिंद्रा बँकेचे व्याजदर
कोटक महिंद्रा बँकेने वेगवेगळ्या कालावधीसाठी दोन कोटींपेक्षा कमी रक्कमेवरील मुदत ठेवीवरील व्याज दरात वाढ केली आहे. नवीन व्याजदर 12 एप्रिल 2022 रोजीपासून लागू करण्यात आली आहे. या नव्या व्याज दरवाढीनंतर 7 दिवस ते 10 वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवीवर 2.50 ते 10 वर्षांकरीता मुदत ठेवीवर 2.50 ते 5.60 टक्के व्याज देण्यात येत आहे.
बँक ऑफ बडोदाचे काय आहेत व्याजदर
बँक ऑफ बडोदा ने मार्च महिन्यांत मुदत ठेवीवरील व्याजदरात वाढ केली आहे. ही वाढ दोन कोटींपेक्षा कमी असलेल्या जमा केलेल्या रक्कमेवर मिळेल. नवीन दरानुसार, 7 दिवस ते 10 वर्षांकरीता मुदत ठेवीवर सर्वसाधारण गुंतवणुकदाराला 2.80 ते 5.56 टक्के व्याज मिळेल.