Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवीन वर्षात एटीएम पैसे काढण्यासाठी अधिक चार्ज द्यावा लागणार, 1 जानेवारीपासून बँकिंग नियमात बदल होणार

नवीन नियमांनुसार ग्राहकांना फ्री एटीएम ट्रान्झेक्शन मर्यादेनंतरच्या ट्रान्झेक्शनवर 21 रुपये शुल्क आणि जीएसटी द्यावा लागणार आहे. सध्या हे शुल्क 20 रुपये इतके आहे.

नवीन वर्षात एटीएम पैसे काढण्यासाठी अधिक चार्ज द्यावा लागणार, 1 जानेवारीपासून बँकिंग नियमात बदल होणार
नवीन वर्षात एटीएम पैसे काढण्यासाठी अधिक चार्ज द्यावा लागणार
Follow us
| Updated on: Dec 04, 2021 | 1:53 PM

नवी दिल्ली : नवीन वर्षात एटीएममधून पैसे काढणे महागात पडणार आहे. एटीएममधून ट्रान्झेक्शनच्या नियमांमध्ये बँक 1 जानेवारीपासून बदल करणार आहे. यामध्ये ट्रान्झेक्शनच्या शुल्क वाढीचाही समावेश आहे. एटीएम फ्री ट्रान्झेक्शनच्या मर्यादेनंतर एटीएम ट्रान्झेक्शनवरील शुल्क वाढवण्यास रिझर्व्ह बँकेनेही मंजुरी दिली आहे. त्यानुसार एटीएमच्या फ्री लिमिटनंतर केल्या जाणाऱ्या ट्रान्झेक्शवर 1 जानेवारीपासून अधिक शुल्क भरावा लागणार आहे.

1 जानेवारीपासून 21 रुपये द्यावे लागणार

नवीन नियमांनुसार ग्राहकांना फ्री एटीएम ट्रान्झेक्शन मर्यादेनंतरच्या ट्रान्झेक्शनवर 21 रुपये शुल्क आणि जीएसटी द्यावा लागणार आहे. सध्या हे शुल्क 20 रुपये इतके आहे. RBI ने 1 जानेवारी 2022 पासून बँकांना रोख आणि नॉन-कॅश एटीएम व्यवहारांवर मोफत मासिक मर्यादेपेक्षा जास्त शुल्क वाढवण्याची परवानगी दिली आहे. RBI च्या सूचनेनुसार, बँकांनी आपल्या ग्राहकांना 1 जानेवारी 2022 पासून 21 रुपये शुल्क आणि रुपये GST भरावे लागतील याची माहिती देणारा एसएमएस पाठवणे सुरू केले आहे.

आरबीआयने बँकांच्या व्यवहारांवर शुल्क वाढवल्याने ही वाढ

या वर्षी 1 ऑगस्ट 2021 पासून, RBI ने आर्थिक व्यवहारांसाठी प्रति व्यवहार शुल्क 15 रुपयांवरून 17 रुपये आणि गैर-आर्थिक व्यवहारांसाठी प्रति व्यवहार 5 रुपयांवरून 6 रुपये केले आहे. जास्त इंटरचेंज फी आणि ऑपरेटिंग कॉस्टमध्ये वाढ झाल्यामुळे RBI ने बँकांना ग्राहकांकडून प्रति व्यवहार 21 रुपये शुल्क आकारण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे बँकांनी शुल्कात वाढ केली आहे.

मर्यादित व्यवहार करणाऱ्या ग्राहकांवर नव्या निर्णयाचा कोणताही परिणाम नाही

बँकांनी एटीएम व्यवहार शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला असला तरी, सामान्य ग्राहकांना या निर्णयाची फारशी काळजी करण्याची गरज नाही, कारण या निर्णयाचा परिणाम केवळ मोफत मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार करणाऱ्या ग्राहकांवरच होणार आहे. बँका त्यांच्या ग्राहकांना एका महिन्यात एटीएममधून आर्थिक आणि गैर-आर्थिक असे पाच मोफत व्यवहार देत राहतील. याशिवाय, महानगरांमध्ये राहणाऱ्या बँक ग्राहकांना इतर बँकांच्या एटीएममधून महिन्यातून तीन मोफत आणि छोट्या शहरांमध्ये 5 मोफत व्यवहार करण्याची सुविधाही सुरू राहणार आहे. म्हणजेच मर्यादित व्यवहार करणाऱ्या ग्राहकांवर नव्या निर्णयाचा कोणताही परिणाम होणार नाही. (Banks will have to pay more for ATM withdrawals from 1 january)

इतर बातम्या

वर्षाअखेरीस खाद्यतेल महागणार, खवय्यांच्या खिशाला कात्री लागणार

चांगली बातमी! बँक ऑफ बडोदा विकतेय स्वस्त घरे, कधी होणार लिलाव?

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.