सावधान! एक एसएमएस करू शकतो तुमचे बँक खाते रिकामे; तुम्हीही होऊ शकता फिशिंगचे शिकार
कोरोना (Corona) काळात जवळपास सर्वच कामे ही ऑनलाईन झाली आहेत. तुम्ही तुमचा अधिकाधिक वेळ हा लॅपटॉप (Laptop) किंवा मोबाईलवरच व्यतीत करत आहात. डिजिटायझेशन वाढल्यामुळे आता तुम्हाला कुठल्याही आर्थिक व्यवहारासाठी बँकेत (bank) जायची गरज राहिली नाही. मात्र यामुळे ऑनलाईन आर्थिक फसवणुकीचे प्रकार देखील वाढले आहेत.
मुंबई : कोरोना (Corona) काळात जवळपास सर्वच कामे ही ऑनलाईन झाली आहेत. तुम्ही तुमचा अधिकाधिक वेळ हा लॅपटॉप (Laptop)किंवा मोबाईलवरच व्यतीत करत आहात. डिजिटायझेशन वाढल्यामुळे आता तुम्हाला कुठल्याही आर्थिक व्यवहारासाठी बँकेत (bank) जायची गरज राहिली नाही. तुम्ही तुमचे बँकेशी संबंधित सर्व कामे जसे पैसे जमा करणे, पैसे काढणे, बिल भरणे, तिकीट बूक करणे असे सर्व कामे आता घरी बसल्या मोबाईच्या मदतीने करू शकता. मात्र हे सर्व करत असताना काळजी घेणे आवश्यक आहे. तुमची एक चूक तुम्हाला महागात पडू शकते. एक एसएम तुमचे बँक खाते रिकामे करू शकतो. सायबर गुन्हेगार नेहमीच संधीच्या शोधात असतात. ते विविध युक्त्यांच्या माध्यमातून तुमच्या बँकेतील पैशांवर डल्ला मारू शकता. त्यामुळे वेळीच सावध व्हा. आज आपण फसवणुकीच्या अशाच एका प्रकाराबद्दल जाणून घेणार आहोत. ज्याला आपण फिशिंग असे देखील म्हणतो. या प्रकारात तुमच्या मोबाईलवर एक एसएमएस पाठवून तुमची सर्व माहिती मिळवली जाते. माहिती मिळवल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन गंडा घातला जातो.
फिशिंग म्हणजे काय?
फिशिंगचा संबंध मासा गळाला लागण्याशी आहे. म्हणजे एखादा मच्छिमार हा मासा पकडण्यासाठी पाण्यात गळ टाकतो आणि त्यानंतर त्याच्या गळात मासा अडकतो, तसाच काहीसा हा प्रकार आहे. सायबर गुन्हेगार आपल्या सावजाला फसवण्यासाठी त्याच्या मोबाईलवर एखादा एसएमएस पाठवतात किंवा त्याला इमेल केला जातो. ज्यामध्ये तुमचे खाते लवकरच बंद होणार आहे, केवायसी अपडेट करा. किंवा तुम्हाला लॉटरी लागली आहे, पैसे बँकेत जमा करायचे आहे, असा दावा केला जातो. तसेच पैसे जमा करण्यासाठी एसएमएस द्वारे पाठवण्यात आलेल्या लिंकवर क्लीक करण्यास सांगितले जाते. एकदा का तुम्ही त्या लिंकवर क्लिक केले की तुम्हाला फटका बसलाच म्हणून समजा. त्यामुळे अशा परिस्थितीत काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.
काय काळजी घ्याल?
1) सगळ्यात पहिल्यांदा हे लक्षात घ्या की, तुम्ही एखाद्या अनोळखी फोन नंबरवरून आलेल्या लिंकवर क्लिक केल्यास तुमच्या मोबाईलमध्ये व्हायरस घुसू शकतो. त्यामुळे अशा लिंकवर क्लिक करणे टाळा.
2) तसेच जर तुम्हाला एखाद्या अनोळखी नंबरवरून फोन किंवा एसएमएस द्वारे तुमच्या बँक डिटेलसबाबत विचारणा करण्यात आली असेल तर चुकूनही आपली माहिती शेअर करू नका. असे केल्यास तुमची फसवणूक होऊ शकते.
3) नियमितपणे तुमचे बँक खाते तसेच खात्यावरील रक्कम चेक करत जा, काही संशयास्पद ट्रान्झेक्शन आढळल्यास तातडीने तुमच्या बँकेशी संपर्क करा. बँकेकडून ट्रान्झेक्शनची माहिती घ्या.
4) इंटरनेटचा वापर करत असताना ज्या लिंक संशायास्पद वाटतात त्यावर क्लिक करणे टाळा
संबंधित बातम्या
Russia Ukraine War : कच्च्या तेलाच्या दरात रेकॉर्ड ब्रेक तेजी, जाणून घ्या पेट्रोल डिझेलचे आजचे भाव
Gold Investment : सोन्यामध्ये गुंतवणूक कशी कराल? जाणून घ्या गुंतवणुकीचे विविध प्रकार