Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ITR Filling | आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख नजीक, मुदतीपूर्वी कर विभागाची ही सूचना अवश्य वाचा

कर विभागाने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) 1 एप्रिल 2021 ते 22 नोव्हेंबर 2021 पर्यंत करदात्यांना 1,23,667 कोटी रुपये परत केले आहेत. या कालावधीत सीबीडीटीने 1.11 कोटीहून अधिक करदात्यांना परतावा जारी केल्याचे कर विभागाने म्हटले आहे.

ITR Filling | आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख नजीक, मुदतीपूर्वी कर विभागाची ही सूचना अवश्य वाचा
Follow us
| Updated on: Dec 04, 2021 | 4:33 PM

नवी दिल्ली : इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची शेवटची तारीख जवळ येत आहे. या मुदतीपूर्वी कर विभागाने करदात्यांना नोटीस बजावली आहे. ही एक प्रकारची रिमाइंडर प्रक्रिया आहे ज्यामध्ये शेवटच्या तारखेची 31 डिसेंबरची वाट पाहू नका आणि आयटीआर फाइलिंगचे काम आजच पूर्ण करा, असे सांगण्यात आले आहे. नोटीसमध्ये कर विभागाचे म्हणणे आहे की, आयटीआर फाइलिंगचे काम जितक्या लवकर पूर्ण होईल तितके चांगले.

कर विभाग करदात्यांना विविध माध्यमांद्वारे ते भरण्यासाठी चेतावणी देतो. तुम्ही जर इन्कम टॅक्स रिटर्न भरला असेल तर हरकत नाही, असेही नोटीसमध्ये लिहिले आहे. मात्र ज्यांनी हे महत्त्वाचे काम केलेले नाही, त्यांनी ते प्राधान्याने करावे. मोबाईलवर मेसेज, ईमेल आणि इतर माध्यमातून करदात्यांना स्मरणपत्रे पाठवली जात आहेत. कर विभागाने 2021-2022 या आर्थिक वर्षासाठी रिटर्न भरण्यासाठी एक ट्विट देखील जारी केले आहे.

काय लिहिलेय ट्विटमध्ये?

एम्प्लॉयर (कंपनी) लक्ष द्या. कृपया तुमच्या कर्मचाऱ्यांना 2021-2022 या आर्थिक वर्षासाठी त्यांचा ITR दाखल करण्याची आठवण करून द्या. अॅसेसमेंट वर्ष 2021-2022 साठी ITR भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2021 आहे. आजच तुमच्या कर्मचाऱ्यांना आठवण करून द्या. शेवटच्या तारखेपर्यंत थांबू नका. या वर्षीचे आयकर रिटर्न हे मूल्यांकन वर्ष 2021-22 किंवा आर्थिक वर्ष 2020-21 साठी भरले जाईल. या वर्षी ITR 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 मधील उत्पन्नासाठी लागू आहे.

आयटीआर भरलेल्यांना परतावा दिला जातो

अनेकांनी त्यांचे आयटीआर भरले आहेत आणि बरेच लोक हे काम हाताळत आहेत. ज्यांनी आयटीआर भरला आहे, त्यांच्या आयटीआर रिफंडचे कामही सुरू आहे. आयकर विभागाने चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत करदात्यांना परतावा म्हणून 1.23 लाख कोटी रुपये परत केले आहेत. प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे की या रकमेत कर निर्धारण वर्ष 2021-22 अंतर्गत 75.75 लाख करदात्यांना दिलेला परतावा देखील समाविष्ट आहे. त्यांना 15,998.31 कोटी रुपये परत करण्यात आले आहेत.

कर विभागाने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) 1 एप्रिल 2021 ते 22 नोव्हेंबर 2021 पर्यंत करदात्यांना 1,23,667 कोटी रुपये परत केले आहेत. या कालावधीत सीबीडीटीने 1.11 कोटीहून अधिक करदात्यांना परतावा जारी केल्याचे कर विभागाने म्हटले आहे. यापैकी 41,649 कोटी रुपये 1.08 कोटी वैयक्तिक करदात्यांना परत केले गेले आहेत तर कॉर्पोरेट क्षेत्राला 82,018 कोटी रुपये परत केले गेले आहेत.

ITR दाखल न केल्यास काय होईल

जर तुम्ही जाणूनबुजून किंवा कोणतेही कारण न देता आयकर रिटर्न भरले नसेल आणि कर विभागाला कळले की तुम्ही कर भरल्यानंतरही आयटीआर भरला नाही, तर तुम्हाला दंड भरावा लागेल. जर तुम्ही चुकून ITR भरला नसेल, तर दंडाची रक्कम एकूण कर दायित्वाच्या 50% असेल. तो मुद्दाम दाखल केला नसेल तर 200 टक्के होईल. तुम्हाला हा दंड कर दायित्वाच्या वर भरावा लागेल. इतर काही आर्थिक कृती देखील असू शकतात. हे टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे टॅक्स रिटर्न वेळेवर भरणे आणि निश्चिंत राहणे. (Be sure to read this notice from the tax department before the deadline for filing ITR)

इतर बातम्या

Investment | निवृ्त्तीसाठी रक्कम जमा करायची आहे ? मग एसआयपीमध्ये करा गुंतवणूक, जाणून घ्या संपूर्ण कॅल्क्युलेशन

नवीन वर्षात एटीएम पैसे काढण्यासाठी अधिक चार्ज द्यावा लागणार, 1 जानेवारीपासून बँकिंग नियमात बदल होणार

मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका.
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना.
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज.
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका.
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण.
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश.
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप.
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर.
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल..
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल...
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका.