दिवाळीपूर्वी ‘या’ बँकेने ग्राहकांना दिले गिफ्ट, गृकर्जाच्या व्याजदरात केली कपात, आता ईएमआयवर भरावे लागतील इतके रुपये
बँकेने गृहकर्जाचे व्याजदर 0.15 टक्क्यांनी कमी केले आहेत. आता कोटक महिंद्रा बँकेत गृहकर्जाचे व्याज दर 6.50 टक्क्यांपासून सुरू होत आहेत. जर तुम्ही गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा एक चांगला पर्याय असू शकतो.
नवी दिल्ली : खासगी क्षेत्रातील बँक कोटक महिंद्रा बँके(Kotak Mahindra Bank)ने सणांपूर्वीच आपल्या ग्राहकांना भेट दिली आहे. बँकेने गृहकर्जावरील व्याजदर कमी करण्याची घोषणा केली आहे. आता गृहकर्जाचे दर 0.15 टक्क्यांनी कमी होऊन 6.50 टक्क्यांवर आले आहेत. नवीन दर 10 सप्टेंबरपासून लागू होतील. देशातील सर्व सरकारी आणि खाजगी बँकांमध्ये आयडीएफसी फर्स्ट बँक(IDFC First Bank) सर्वात कमी व्याजदराने गृहकर्ज देत आहे. (Before Diwali, these Bank gave gifts to customers and reduced interest rates on loans)
कोटक महिंद्रा बँकेने व्याजदरात कपात केली
बँकेने गृहकर्जाचे व्याजदर 0.15 टक्क्यांनी कमी केले आहेत. आता कोटक महिंद्रा बँकेत गृहकर्जाचे व्याज दर 6.50 टक्क्यांपासून सुरू होत आहेत. जर तुम्ही गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा एक चांगला पर्याय असू शकतो. कोटक महिंद्रा बँकेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गृहकर्जाचे नवीन व्याज दर गणेश चतुर्थीपासून सुरू होतील. यापूर्वी बँकेच्या गृहकर्जावर प्रारंभिक व्याज दर 6.65 टक्के होता. त्याच वेळी, पगारदार आणि स्वयंरोजगारांसाठी व्याज दर भिन्न आहेत.
सर्वात मोठी सरकारी बँक SBI चे गृहकर्ज
देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय किमान 6.9 टक्के दराने 30 लाख रुपयांपर्यंत आणि 30 लाख रुपयांवरील गृहकर्ज किमान 7 टक्के दराने देत आहे. योनो अॅपद्वारे कर्जासाठी अर्ज केल्यावर 0.05 टक्के (5 बीपीएस) ची अतिरिक्त सूट आहे. याशिवाय देशातील 8 शहरांमध्ये बँक 3 कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी 0.2 टक्के (20 बीपीएस) व्याज दरात सवलत देत आहे. 75 लाख रुपयांच्या वरच्या गृहकर्जावर 25 बेसिस पॉईंट्स (0.25 टक्के) सूट उपलब्ध असेल. तथापि, एक गोष्ट लक्षात ठेवा की व्याजदरातील शिथिलता क्रेडिट स्कोअरशी जोडलेली आहे.
पीएनबीकडून सर्व कर्जावरील सेवा शुल्क माफ
पीएनबीने सर्व किरकोळ कर्ज शुल्क माफ करण्याची घोषणा केली आहे. बँकेकडून असे सांगण्यात आले आहे की गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज, मालमत्ता कर्ज, पेन्शन कर्ज आणि सुवर्ण कर्ज यांसारख्या उत्पादनांवर प्रक्रिया शुल्क आकारले जाणार नाही. एवढेच नाही तर या सर्व कर्जावर सर्व्हिस चार्ज आणि डॉक्युमेंटेशन चार्जेसही माफ करण्यात आले आहेत. पीएनबीने सर्व किरकोळ कर्जावरील अनेक शुल्क माफ केले आहे. बँकेकडून असे सांगण्यात आले आहे की गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज, मालमत्ता कर्ज, पेन्शन कर्ज आणि सुवर्ण कर्ज यांसारख्या उत्पादनांवर प्रक्रिया शुल्क आकारले जाणार नाही. एवढेच नाही तर या सर्व कर्जावर सर्व्हिस चार्ज आणि डॉक्युमेंटेशन चार्जेसही माफ करण्यात आले आहेत.
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचेही मोठी घोषणा
अलीकडेच इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने (IPPB) एलआयसी हाऊसिंग (LICHFL) सह धोरणात्मक भागीदारी केली आहे जेणेकरून ग्राहकांना गृहकर्ज उत्पादनांची सुविधा उपलब्ध होईल. यामध्ये, LICHFL गृहकर्ज उत्पादने प्रदान करेल, तर कर्जाचा स्रोत IPPB असेल. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या मते, पगारदार वर्गाला 50 लाख रुपयांपर्यंतचे गृहकर्ज 6.66 टक्के दराने उपलब्ध होईल. (Before Diwali, these Bank gave gifts to customers and reduced interest rates on loans)
T 20 World Cup मध्ये धोनी विरुद्ध रवी शास्त्री वाद रंगला तर?, माजी क्रिकेटपटूने व्यक्त केली भिती https://t.co/BwJKaXDKnG#MSDhoni | #RaviShastri | #T20WorldCupsquad
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 9, 2021
इतर बातम्या
फेसबुकला टक्कर, Twitter चं नवीन फीचर रोलआउट, जाणून घ्या सर्वकाही