AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold in Mobile Phones : जुना ‘फोन’ फेकण्याआधी हे लक्षात घ्या…. तुमच्या ‘स्मार्टफोन’ मध्ये आहे, खरं सोनं ..!

Gold in Mobile Phones : जगभरात ‘सोन्या’ चे भाव (Gold prices) सातत्याने गगनाला भिडत आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का.. मोबाईल वापरणारा सामान्य माणूसही सोने सोबत ठेवतो. तुम्हाला खरे वाटत नसले तर हे सत्य आहे. प्रत्येक मोबाईल फोन आणि टॅबलेटमध्ये काही प्रमाणात सोने सापडते. वास्तविक, मोबाईल आणि ‘टॅबलेट’ बनवण्यासाठी सोन्याचा वापर केला जातो. हे जाणून […]

Gold in Mobile Phones : जुना ‘फोन’ फेकण्याआधी हे लक्षात घ्या.... तुमच्या ‘स्मार्टफोन’ मध्ये आहे, खरं सोनं ..!
‘स्मार्टफोन’ मध्ये आहे, खरे सोनंImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 22, 2022 | 10:13 PM

Gold in Mobile Phones : जगभरात ‘सोन्या’ चे भाव (Gold prices) सातत्याने गगनाला भिडत आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का.. मोबाईल वापरणारा सामान्य माणूसही सोने सोबत ठेवतो. तुम्हाला खरे वाटत नसले तर हे सत्य आहे. प्रत्येक मोबाईल फोन आणि टॅबलेटमध्ये काही प्रमाणात सोने सापडते. वास्तविक, मोबाईल आणि ‘टॅबलेट’ बनवण्यासाठी सोन्याचा वापर केला जातो. हे जाणून घेतल्यास, आपल्या स्मार्टफोनमधून (smartphone) सोने काढण्याचा प्रयत्न करू नका कारण त्याचे प्रमाण खूपच कमी आहे. UN च्या अहवालानुसार 1 ग्रॅम सोने काढण्यासाठी 41 मोबाईल फोन लागतात. म्हणूनच सोन्याचा वापर इलेक्ट्रॉनिक उपकरण जसे की संगणक, मोबाईल, टॅब्लेट इत्यादींमध्ये होतो. आपल्या मोबाईलमध्ये काही सर्किट असतात. हे सर्किट बनवण्यासाठी (To make a circuit) सोन्यासह अनेक धातूंचा वापर केला जातो.

सर्किट बनवण्यासाठी होतो वापर

एका मोबाइलमध्ये सुमारे 60 घटक असतात. यामध्ये सोन्याव्यतिरिक्त तांबे आणि चांदी देखील आढळतात. सर्किट बनवण्यासाठी सोने, तांबे आणि चांदीचा वापर केला जातो कारण हे तीन धातू विजेचे चांगले वाहक मानले जातात. सोन्याचा एक फायदा म्हणजे ते लवकर खराब होत नाही. जुना मोबाइल फेकून दिल्याने सोनेही हातातून निघून जाईल, असा विचार तुम्ही करत असाल तर, अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला सांगु इच्छितो की, मोबाईलमधून सोने काढण्याची प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट आहे.

व्यावसायिकच काढू शकतात मोबाईलचे सोने

मोबाईलमध्ये सोन्याचे प्रमाण खूपच कमी असते. मोठ्या प्रमाणात सोने काढण्यासाठी अनेक स्मार्टफोन्सची आवश्यकता असेल. पण हे तितके सोपे नाही कारण मोबाईल फोनमधून सोने काढण्याचे काम फक्त व्यावसायिकच करू शकतात. मोबाईलमधील सोने काढणे इतके अवघड का आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो. वास्तविक, सोने काढण्यासाठी काही विशेष रसायने वापरली जातात. ही प्रक्रिया खूप गुंतागुंतीची आणि लांबलचक आहे. अनेक टप्प्यांच्या प्रक्रियेनंतर सोने बाहेर येते. केवळ काही व्यावसायिकांनाच याबद्दल संपूर्ण माहिती आहे. मोबाईलमधून सोने बाहेर काढण्याचे काम हे व्यावसायिक करतात. तुम्हाला तुमच्या फोनमध्ये सध्या सोन्याची किंमत जाणून घ्यायची असेल, तर ती सुमारे 50-100 रुपये असेल.

इतर बातम्या :

Apple iPhone : ‘मोबाईल मार्केट’ मध्ये Apple iPhone 14 घेणार धमाकेदार एन्ट्री, डीटेल्स आलेत समोर

iPhone : ‘ॲपल’ आणू शकतो, पहिला ‘पोर्टलेस आयफोन? सत्य की अफवा… जाणून घ्या, संपूर्ण माहिती

‘वन प्लस’चा हा स्मार्टफोन फक्त पाच 5 मिनिटांत 50 टक्के होईल चार्ज; जाणून घ्या Oneplus Ace ची किंमत, वैशिष्टये!

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.