पत्नीला मालक बनवा, सोबत गृहकर्ज घ्या, लाखो रुपये वाचा
तुम्ही तुमच्या पत्नीसोबत जॉइंट गृहकर्ज घेतलं आहे का? पत्नीसोबत जॉइंट गृहकर्ज घेतल्यास लाखो रुपयांची बचत होऊ शकते. पत्नीसोबत गृहकर्ज घेतल्यास तुम्हाला आणखी अनेक फायदे होतील. चला तर मग जाणून घेऊया.
तुम्ही तुमच्या पत्नीसोबत जॉइंट गृहकर्ज घेतलं आहे का? असे असेल तर चिंता करू नका. कारण, यात तुमचा फायदा होऊ शकतो. फक्त ते तुम्हाला माहिती करून घ्यायचं आहे. पत्नीसोबत जॉइंट गृहकर्ज घेतल्यास लाखो रुपयांची बचत होऊ शकते. पत्नीसोबत गृहकर्ज घेतल्यास तुम्हाला आणखी अनेक फायदे होतील. चला तर मग जाणून घेऊया.
हक्काच्या, आपल्या स्वत:च्या घरात राहण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण, पैशांअभावी अनेकांना आपले स्वप्न पूर्ण करता येत नाही. अशा वेळी गृहकर्ज घेणे हा उत्तम पर्याय आहे. तुम्हीही गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे.
तुम्ही तुमच्या पत्नीसोबत जॉइंट होम लोन घेतल्यास लाखो रुपयांची बचत होऊ शकते. पत्नीसोबत गृहकर्ज घेतल्यास तुम्हाला आणखी अनेक फायदे होतील. चला तर मग जाणून घेऊया पत्नीसोबत जॉइंट होम लोन घेतल्यास काय फायदे होतात.
कर्ज मिळणे सोपे होईल
अनेकदा खराब क्रेडिट स्कोअर, इतर कर्जे किंवा कमी उत्पन्न यामुळे बँकेकडून कर्ज मिळणे अवघड होऊन बसते, पण पत्नीसोबत मिळून गृहकर्ज घेतल्यास कर्ज घेण्याची पात्रता वाढते. कर्ज भरण्यासाठी दोन व्यक्तींची पात्रता असते, त्यामुळे कर्ज मिळणे सोपे जाते.
कमी व्याजदराने मिळणार गृहकर्ज
गृहकर्ज घेताना पत्नीला सहअर्जदार केल्यास सुमारे 0.05 टक्के कमी व्याजदराने कर्ज मिळू शकते. महिला सहअर्जदारांसाठी गृहकर्जाचे व्याजदर वेगवेगळे आहेत. लक्षात ठेवा की, यासाठी तुमची पत्नी मालमत्तेची मालक असावी.
कर्जाची मर्यादा वाढणार
तुम्ही तुमच्या पत्नीसोबत मिळून होम लोन घेत असाल तर तुमची होम लोनची मर्यादाही सहज वाढेल. जॉइंट होम लोन घेतल्याने उत्पन्न वाढते. अशा वेळी मर्यादा वाढवणेही सोपे आहे.
कर बचत होणार
पत्नीसोबत गृहकर्ज घेतल्यास तुम्हाला इन्कम टॅक्समध्येही फायदा होईल. तुम्ही तुमच्या पत्नीसोबत जॉइंट होम लोन घेत असाल तर तुम्हाला दुप्पट टॅक्स बेनिफिट मिळेल. मूळ रकमेवर तुम्ही दोघेही 80 C अंतर्गत 1.5-1.5 लाख रुपये म्हणजेच एकूण 3 लाख रुपये क्लेम करू शकता.
त्याचबरोबर कलम 24 अंतर्गत व्याजावर तुम्ही दोघेही 2-2 लाख रुपये म्हणजेच 4 लाख रुपयांचा टॅक्स बेनिफिट घेऊ शकता. अशा वेळी तुमची बरीच बचत होईल. आपण किती कर्ज घेता यावरही ते अवलंबून असते.
आम्ही सांगितलेल्या पर्यायावर विचार करा. यातून तुमचा फायदा होऊ शकतो. पण, कोणताही निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.
(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)