एलआयसीची पॉलिसी आधारकार्डाला लिंक केल्यास मिळतात ‘हे’ फायदे

LIC Policy | एलआयसी पॉलिसी आधारशी लिंक करणे बंधनकारक नाही. पण तसे केल्यास जेव्हा पॉलिसीच्या मॅच्युरिटीचा कालावधी पूर्ण होतो तेव्हा पैसे काढणे आणखी सुलभ होते.

एलआयसीची पॉलिसी आधारकार्डाला लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे
TAFCOP च्या मते, या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या आधार कार्डवर आतापर्यंत किती सिम दिले आहेत हे सहजपणे शोधू शकता.
Follow us
| Updated on: Aug 23, 2021 | 9:24 AM

मुंबई: आपण आतापर्यंत पॅनकार्ड, पीएफ अकाऊंट किंवा बँक अकाऊंट आधारशी लिंक करण्यासंदर्भातील सूचना अनेकवेळा ऐकल्या असतील. या सर्व गोष्टी आधारशी लिंक केल्याने अनेक फायदे मिळू शकतात. केंद्र सरकारकडून पॅनकार्ड, पीएफ अकाऊंट आणि बँक खाते आधारशी लिंक करणे सक्तीचे करण्यात आले आहे. अन्यथा भविष्यात तुम्हाला आर्थिक व्यवहार करणे जवळपास अशक्य होऊन बसेल.

मात्र, तुम्ही एलआयसी पॉलिसी आधारशी लिंक करण्यासंदर्भात कदाचित ऐकले नसले. परंतु, यामुळे अनेक फायदे मिळू शकतात. एलआयसी पॉलिसी आधारशी लिंक करणे बंधनकारक नाही. पण तसे केल्यास जेव्हा पॉलिसीच्या मॅच्युरिटीचा कालावधी पूर्ण होतो तेव्हा पैसे काढणे आणखी सुलभ होते.

कोणत्या एलआयसी पॉलिसीसाठी आधारकार्ड बंधनकारक?

एलआयसीच्या केवळ दोन पॉलिसीसाठीच आधार कार्ड बंधनकारक आहे. यामध्ये एलआयसी आधार स्तंभ आणि एलआयसी आधार शिला या दोन योजनांचा समावेश आहे.

LIC पॉलिसी आधारशी लिंक केल्यास काय फायदे मिळणार?

LIC पॉलिसी आधारशी लिंक केल्यास तुमची ओळख पटवणे सोपे होते. तसेच एलआयसीलाही ग्राहकाची खात्रीशीर माहिती मिळते. समजा तुमची एलआयसी पॉलिसीची कागदपत्रे हरवली तर अशावेळी पॉलिसी आधारशी लिंक असल्यास फायदा होतो. याशिवाय, पॉलिसीवर कर्ज घेतानाही आधारमुळे फायदा होतो.

एलआयसी पॉलिसी आधारला लिंक कशी कराल?

तुम्हाला एलआयसी पॉलिसी आधारशी लिंक करायची असल्यास एक रिक्वेस्ट फॉर्म भरावा लागेल. नजीकच्या एलआयसी शाखेत हा फॉर्म मिळेल. तुम्ही ऑनलाईनही हा फॉर्म डाऊनलोड करु शकता. हा फॉर्म भरून एलआयसीच्या कार्यालयात जमा करावा.

संबंधित बातम्या:

आधार नंबर बँक खात्याशी लिंक करा आणि निश्चिंत राहा, बँक खात्याचा गैरव्यवहार रोखण्यास होईल मदत

पॅन-आधार लिंक करणे आवश्यक, परंतु ‘या’ लोकांना सूट, पाहा संपूर्ण यादी

PAN-AADHAR LINK : तुमचा पॅन आधारशी लिंक झाला की नाही? असे चेक करा स्टेटस

Non Stop LIVE Update
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.