फिक्स्ड डिपॉझिटच्या दहापट फायदा, जाणून घ्या काय आहे गुंतवणूकदारांना मालामाल करणारी स्कीम
Small cap Fund | गेल्या 3 वर्षातील स्मॉलकॅप फंडांची कामगिरी देखील नेत्रदीपक ठरली आहे. या तीन वर्षांमध्ये वेगवेगळ्या फंडांनी 33 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे आणि गुंतवणूकदारांचे पैसे येथे दुप्पट झाले आहेत.
स्मॉल कॅप फंड
Follow us
म्युच्युअल फंडांच्या स्मॉलकॅप श्रेणीने यावर्षी गुंतणूकदारांना चांगली कमाई करून दिली आहे. इक्विटी म्युच्युअल फंडांच्या या श्रेणीमध्ये गुंतवणूकदारांना एरा वर्षात सर्वाधिक परतावा मिळाला आहे. जिथे लार्जकॅप म्युच्युअल फंडाने 1 वर्षात 47 टक्के परतावा दिला आहे आणि मिडकॅप म्युच्युअल फंडाने 72 टक्के परतावा दिला आहे.
स्मॉलकॅप म्युच्युअल फंड श्रेणीने गुंतवणूकदारांना सरासरी 100% परतावा दिला आहे. गेल्या 3 वर्षातील स्मॉलकॅप फंडांची कामगिरी देखील नेत्रदीपक ठरली आहे. या तीन वर्षांमध्ये वेगवेगळ्या फंडांनी 33 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे आणि गुंतवणूकदारांचे पैसे येथे दुप्पट झाले आहेत.
गेल्या पाच वर्षातील आकडेवारीवर नजर टाकल्यास स्मॉलकॅप श्रेणीने चांगली कामगिरी केली आहे. त्याने 2017 मध्ये 57%, 2018 मध्ये -29 टक्के, 2019 मध्ये -10 टक्के, 2020 मध्ये 21 टक्के आणि यावर्षी आतापर्यंत 50 टक्के बंपर परतावा दिला आहे. अशा परिस्थितीत, ज्या गुंतवणूकदारांना उच्च जोखमीसह मोठे परतावा मिळवायचा आहे ते तेथे पैसे गुंतवू शकतात.
शेअर बाजार नियामक सेबीच्या नियमांनुसार, स्मॉल कॅप फंडात जमा केलेल्या एकूण रकमेपैकी 65 टक्के रक्कम स्मॉल कॅप स्टॉकमध्ये (छोट्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये) गुंतवली जाते. उर्वरित 35 टक्के लार्जकॅप, डेट किंवा ऑफर डॉक्युमेंटमध्ये करता येतात. मार्केट कॅपच्या दृष्टीने टॉप 250 कंपन्यांच्या यादीबाहेरील कंपन्यांच्या समभागांना स्मॉल कॅप शेअर्स म्हटले जाते.
स्मॉल कॅप फंडांमध्ये चांगला परतावा हवा असल्यास कमीतकमी पाच वर्षे आणि त्यापेक्षा जास्त काळासाठी गुंतवणूक करणे गरजेचे आहे. जे गुंतवणूकदार त्यांच्या विद्यमान इक्विटी पोर्टफोलिओला अधिक बळकट करू इच्छितात त्यांच्यासाठी स्मॉल कॅप फंडातील गुंतवणूक हा एक चांगला पर्याय आहे.